गोव्यात भाजपाला २० जागा मिळाल्याने सत्तास्थापनाचा मार्ग मोकळा झाला आहे. २१ ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी आता अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचा पाठिंबा मिळाल्याची माहिती गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गोव्यातील मोठ्या विजयानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आता निवडणुकीचा आढावा घेणार असून लवकरच सत्तास्थापनेसाठी दावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. (Devendra Fadnavis hold press conference after goa assembly election results)
प्रमोद सावंत यांचे सरकार गोव्यात पाच वर्षे लोकांनी अनुभवलं. त्यांच्याबद्दलच्या विश्वासार्हतेमुळे गोव्याच्या जनतेनं भाजपला प्रचंड मतं दिली. मला सांगायला आनंद वाटतो की तीन अपक्षांनी भाजपला समर्थन दिलं आहे. आम्ही कालच सांगितंल होतं की आम्ही २१ जागा जिंकल्या तरी काही लोकांना सोबत घेऊन जाणार आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीनेही भाजपला समर्थनाचं पत्र दिलं आहे. मगोपसुद्धा आमच्यासोबत असणार आहे. एमजीपी आणि तीन्ही अपक्षांचे आभार मानतो. आम्ही सत्ता स्थापन करू.
आता आमच्या केंद्रीय संसदीय समितीची बैठक होईल. त्यानंतर केंद्रीय पर्यवेक्षक नियुक्त केले जातील. त्यानंतर चर्चा होऊन आम्ही राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करू. आम्हाला बहुमत मिळाल्यामुळे धावपळ करण्याची आवश्यकता नाही.
राज्यपाल वाटच पाहत होते की कोण येतंय. पण इतर कोणी तिकडे गेले नाहीत. गोव्यात आमच्या सरकारने अतिशय चांगलं काम केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि अध्यक्षांच्या नेतृत्वाखालील पार्टी यांनी समन्वय साधून काम केलं. त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे विजय मिळाला आहे. हा विजय गोव्याच्या टीमचा आणि त्यांच्या कामाचा विजय आहे. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, पदाधिकारी या सगळ्यांनी निवडणुकीसाठी वेळ दिला त्यासाठी मनापासून आभार मानतो
पुढची पाच वर्षे गोव्याच्या समृद्धीची, गोव्याला समृद्धीकडे घेऊन जाऊ असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.