काँग्रेसनं गोव्यातील गरीबांच्या कल्याणासाठी ऐतिहासिक निर्णय घेतलाय.
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election 2022) जोरदार प्रचाराला सुरुवात झालीय. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसताहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे नेते (BJP) आणि गोव्याचे मुख्यमंत्री (Goa Chief Minister) प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या दौर्यावर हल्लाबोल केलाय. सावंत म्हणाले, राहुल गांधींकडं फारसं लक्ष देण्याची गरज नाही, कारण त्यांना कोणीही गांभीर्यानं घेत नाही असा त्यांनी निशाणा साधलाय. कालच राहुल गांधी यांनी, गोव्यातील गरीबांसाठी 'न्याय' योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर सावंतांनी माजी अध्यक्षांवर टीकेची झोड उठवलीय.
राहुल गांधींच्या गोवा दौऱ्यावर (Rahul Gandhi visits Goa) सीएम सावंत म्हणाले, मला वाटतं राहुल गांधी पर्यटक म्हणून सुट्टीवर गोव्यात आले आहेत. पण, हरकत नाही. त्यांना कोणीही इथं गांभीर्यानं घेत नाही. काँग्रेस-गोवा फॉरवर्ड पक्षाच्या (Goa Forward Party) उमेदवारांना उद्देशूनही सावंतांनी टीका केलीय. लोकांचा भाजपवर जास्त विश्वास आहे, त्यामुळं जनता भाजपलाच पुन्हा साथ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
गोवा दौऱ्यात राहुल गांधींनी मतदारांना आपल्या पक्षाला मत देण्याचं आवाहन केलंय. इतर पक्षांना पाठिंबा देऊन आपली मतं वाया घालवू नका, असं आवाहनही त्यांनी जनतेला केलंय. 2016 मध्ये नोटाबंदीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर (Central Government) निशाणा साधत गांधींनी दावा केलाय की, नोटाबंदीचा संपूर्ण फायदा फक्त श्रीमंतांनाच झाला, तर छोट्या व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसलाय. संखालिम येथील जाहीर सभेला संबोधित करताना गांधींनी ही माहिती दिलीय. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत संखालिम विधानसभा मतदारसंघाचे (Sanquelim Assembly constituency) प्रतिनिधित्व करतात. गोव्यात 40 जागांसाठी 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. दरम्यान, काँग्रेसनं गोव्यातील गरीबांच्या कल्याणासाठी ऐतिहासिक निर्णय घेतलाय. आम्ही गोवावासियांसाठी न्याय योजना तयार केली असून, त्याअंतर्गत राज्यातील गरीब लोकांच्या खात्यात दरमहा 6,000 रुपये दिले जातील, असं राहुल गांधींनी सांगितलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.