प्रमोद सावंत यांची पीएम मोदींसोबतची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
नवी दिल्ली : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी राज्याच्या निवडणुकीच्या (Goa Assembly Election 2022) निकालापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतलीय. 40 सदस्यीय विधानसभेच्या जागा असलेल्या गोव्यात 14 फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान झालं; पण काल (सोमवार) झालेल्या बहुतांश एक्झिट पोलनं गोव्यात त्रिशंकू जनादेश वर्तवला आहे, त्यामुळं भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे.
एक्झिट पोलच्या (Exit Poll) एका दिवसानंतर प्रमोद सावंत यांची पीएम मोदींसोबतची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. प्रमाद सावंत यांनी पंतप्रधानांना गोव्यात सत्ता टिकवण्याच्या पक्षाच्या संभाव्यतेची माहिती दिल्याचं समजतंय. परंतु, पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर स्वत: प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान मोदींशी निवडणुकीबाबत चर्चा केल्याचं कळतंय. 'एएनआय'च्या वृत्तानुसार, मी आज पंतप्रधान मोदींना भेटलो असून निवडणुकीसंदर्भात चर्चा केलीय. गोव्यात आम्ही जास्तीत-जास्त जागा मिळवून सरकार स्थापन करू. मला वाटतं की, मला पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी दिली जाईल, त्यामुळं गोव्याचा मुख्यमंत्री मीच असणार आहे, असं त्याच्या देहबोलीवरुन समजतं.
गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले, भाजपला (BJP) 20 पेक्षा जास्त जागा मिळतील. सर्वच एक्झिट पोल भाजपला बहुमत दाखवत आहेत. मला खात्री आहे की, भाजप पुन्हा एकदा गोव्याच्या सत्तास्थानी असेल. या निकालाबाबत केंद्रीय नेतृत्वाशीही माझं बोलणं झाला असून पक्ष कोणता निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल, असंही त्यांनी शेवटी स्पष्ट केलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.