Goa Election : 'मी हरलो तर राजकारण सोडेन, पण जिंकलो तर..'

Goa Assembly Election
Goa Assembly Electionesakal
Updated on
Summary

'मला तिकीट नाकारण्याचा डाव गोव्यात आखला आणि दिल्लीपर्यंत कट शिजवलाय'

Goa Election 2022 : ऐन थंडीत गोव्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापायला सुरुवात झालीय. ज्या पद्धतीनं माझी अहवेलना झाली. लक्ष्मीकांत पार्सेकर निवडून येऊ शकत नाही, असं भाकीत केलं गेलं म्हणून, मला भाजपनं (BJP) तिकीट दिलं नाही. 14 तारखेनंतर पार्सेकर किती मतांनी निवडून येईल हे बघावंच, असा थेट इशारा गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar) यांनी भाजपला दिलाय.

भारतीय जनता पार्टीतर्फे (Bharatiya Janata Party) गोवा विधानसभेचं (Goa Assembly Election) तिकीट न मिळाल्यामुळं गोव्याचे माजी मुख्यमंत्री पार्सेकर नाराज होतेच, त्यामुळं त्यांनी काही दिवसांपूर्वी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांनी कोणत्याही पक्षाशी हातमिळवणी न करता अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णयही घेतलाय. पार्सेकर पुढे म्हणाले, हा अपप्रचार आहे, की मी निवडून येऊ शकत नाही. मी निवडून आलो तर त्यांनी राजकीय सन्यास घ्यावा, असं खुलं आव्हान पार्सेकर यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलंय. मला तिकीट नाकारण्याचा डाव गोव्यात आखला आणि दिल्लीपर्यंत कट शिजवलाय, असा आरोपही त्यांनी भाजप नेत्यांवर केलाय.

Goa Assembly Election
अर्ज भरण्यास 5 मिनिटं उरली असताना घडली नाट्यमय घडामोड अन्..

निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळं नाराजी

माजी मुख्यमंत्री पार्सेकर हे 14 फेब्रुवारी रोजी गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्ष भाजपच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष होते. ते म्हणाले की, राजीनामा दिल्यानंतर त्यांनी इतर राजकीय पक्षांशी संपर्क साधला होता. परंतु, त्यांनी अखेर अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, गोव्याचे माजी मुख्यमंत्री पार्सेकर मांद्रेम मतदारसंघातून (Mandrem constituency) निवडणूक लढवण्यास तिकीट न देण्यात आल्यामुळं नाराज होते. या मतदार संघात भाजपनं विद्यमान आमदार दयानंद सोपटे (Dayanand Sopte) यांना उमेदवारी दिलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.