पणजी: गोव्याच्या निवडणुकीत (Goa Election Result 2022) सत्तेत कोण बसणार याच्यापेक्षा पणजीचा (Panaji) निकाल काय लागणार याची उत्सुकता सर्वांना होती. कारण या मतदार संघातून गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar Defeat) यांनी भाजपमधून बंडखोरी केली होती. त्यांनी हट्टाने पणजी मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांची लढत भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात (Atanasio Monserrate) यांच्याशी होती. या हाय व्होल्टेज लढतीत उत्पल पर्रिकरांचा 800 मतांनी पराभव झाला आहे.
पणजीतील पराभवानंतर उत्पल पर्रिकरांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'एक अपक्ष उमेदवार म्हणून पणजीची लढत चांगली झाली. मी लोकांचे आभार मानतो. मी दिलेल्या लढतीवर समाधानी आहे. मात्र निकाल थोडा निराशाजनक आहे.'
पणजीत दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पलने (Utpal Parrikar) बंडखोरी केल्याने देशाचे लक्ष येथे लागले होते. भाजपचे उमेदवार बाबुश मोन्सेरात व अपक्ष उत्पल यांच्यातच तुल्यबळ लढत झाली. गेल्या निवडणुकीत मोन्सेरात अवघ्या 1758 मतांनी विजयी झाले होते. पणजीचे दोनदा आयुक्त राहिलेले सनदी अधिकारी एल्विस गोम्स काँग्रेसचे उमेदवार होते.
गोव्यात अंतान्सिओ उर्फ बाबुश मोन्सेरात हे एक बडी आसामी म्हणून ओळखले जातात. 2002 च्या निवडणुकीपासूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. बाबुश मोन्सेरात यांनी युनायटेड गोवन्स डेमोक्रॅटिक पक्षातून निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांनी 2 हजार मतांनी विजय मिळवला होता.
बाबुश मोन्सेरात
2002 च्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात भाजपला 17 जागा मिळाल्या होत्या. सत्तास्थापन करण्यासाठी त्यांना तीन जागांची गरज होती. यावेळी बाबुश मोन्सेरात यांच्यासह त्यांच्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीने सरकार स्थापन केले. पर्रिकर मुख्यमंत्री झाले. पण हे सरकार फार काळ टिकले नाही. 2005 मध्ये बाबुश मोन्सेरात यांनी पर्रिकरांना दिलेला पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे मनोहर पर्रिकरांची खुर्चा गेली आणि भाजपने सत्ता गमावली होती. पर्रिकरांची साथ सोडून मोन्सेरात यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर प्रतापसिंह राणे यांनी सरकार स्थापन केले. त्यांच्या सरकारमध्ये मोन्सेरात हे मंत्रीही राहिले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.