निवडणुकीदरम्यान काँग्रेसनं दोन्ही पक्ष भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप केला होता.
पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) निकालानंतर काँग्रेस राज्यात भाजपविरोधी पक्षांसोबत युती करण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसनं याआधीच भाजपविरोधी पक्षांना एकत्र येण्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे, काँग्रेस गोव्यात आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस सोबत युती करण्यास तयार आहे.
यापूर्वी काँग्रेसनं दोन्ही पक्ष भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप केला होता. पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये मतदान पूर्ण झालं असून 10 मार्चला मतमोजणी होणार आहे. (Congress Ready to Alliance with AAP TMC)
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे गोवा डेस्क प्रभारी दिनेश गुंडू राव (Dinesh Gundu Rao) यांनी सांगितलं की, कोणताही पक्ष भाजपच्या विरोधात असेल, तर त्यांच्याशी आम्ही संपर्क साधणार आहोत. मी कोणत्याही एका पक्षाबद्दल बोलत नाहीय. परंतु, जो पक्ष भाजपला पाठिंबा देऊ इच्छित नाही, त्यांना आम्ही जागा देण्यास तयार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलंय.
ते पुढे म्हणाले, निवडणुकीदरम्यान आप आणि टीएमसीनं (TMC) आमच्यावर विविध प्रकारचे आरोप केलेत. परंतु, निकालानंतर आम्ही कोणासोबत जायचं ते लवकरच ठरवणार आहोत. भाजपला पाठिंबा न देणाऱ्या पक्षांसोबत आम्हाला काम करायचं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राव यांनी आप आणि टीएमसीवर चर्चा केलीय. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष काँग्रेसच्या संपर्कात आहे. MGP नं TMC सोबत युती करून निवडणूक लढवलीय. विशेष म्हणजे, तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि पक्षाचे गोवा प्रभारी महुआ मोईत्रा यांनी एका ट्विटद्वारे गोव्यात भाजपला तोंड देण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, काँग्रेसनं याला कोणताही प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळं युती होणार की, नाही हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, 40 सदस्यांच्या गोवा विधानसभेत 17 जागा जिंकून 2017 मध्ये काँग्रेस अपयशी ठरली होती. तर, 13 जागा जिंकणाऱ्या भाजपनं एमजीपी, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि अपक्ष आमदारांसह आघाडी सरकार स्थापन केलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.