गोव्यात सुरू असणाऱ्या ४० जागांच्या महासंग्रामात यंदा शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत लढत होते. गोव्यात शरद पवार, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनीही तळ ठोकला होता. गोव्यातील पारंपारिक राजकारण, कोकणी माणूस आणि बाळासाहेब ठाकरे यांचे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री बांदोडकरांसोबत असलेले संबंध अधोरेखित करत शिवसेना मैदानात उतरली होती.
यंदाच्या निवडणुकीत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. पण आदित्य ठाकरेंच्या सभेला गर्दी झाली, तेवढीच मतंही पक्षाला मिळाली. काही ठिकाणी नोटा पेक्षा शिवसेनेला कमी मतं पडली आहेत. (Goa Assembly Election Results 2022)
शिवसेनेला गोव्यात निवडून येण्याच्य अपेक्षा होत्या. याआधी महाविकास आघाडी पॅटर्नसाठी प्रयत्न सुरू होते. ते असफल ठरले. संजय राऊत यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे संबंध अधोरेखित केले होते. त्या पक्षाचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर आणि बाळासाहेबांची जिवलग मैत्री होती, असं राऊत म्हणाले.
तर आदित्य ठाकरेंना प्रचाराआधी फोन आले होते. आमच्या वार्डात प्रचाराला येऊ नका, असा धसका काही स्थानिक नेत्यांनी घेतल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. मात्र, पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. जवळपास १२ जागांवर निवडणूक लढताना शिवसेनेच्या वाट्याला मोठा पराभव आला आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही प्रचारासाठी दाखल झाल्या होत्या. सेनेच्या प्रचारासाठी कोकणातील नेत्यांनीही उपस्थिती लावली. मात्र, अजून शिवसेनेला गोव्यात खातं उघडता आलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला २०१७ च्या निवडणुकीत एक आमदार निवडून आणण्यात यश आलं होतं. बानावली मतदारसंघातून चर्चिल आलेमाओ राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते. मात्र, यंदा त्यांनाही पराभवाचं तोंड पाहावं लागलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.