गोव्यात सत्ता स्थापनेपूर्वीच राणेंची नाराजी चव्हाट्यावर.. सावंतांचा पत्ता कट?

goa cm pramod sawant
goa cm pramod sawant
Updated on

गोव्यात भाजपला सत्ता राखण्यात यश मिळत असल्याचं दिसतंय. मागील निवडणुकीत १३ जागा मिळालेल्या भाजपला मतदारांनी पुन्हा संधी दिली आहे. भाजप स्वत:च्या जीवावर 'मॅजिक फिगर' क्रॉस करणार असल्याचं दिसतंय. (BJP won in goa assembly election 2022)

भाजपचे 18 उमेदवार आतापर्यंत पूर्ण बहुमताने निवडून आले आहेत. तर, अन्य दोन जण अद्याप अघाडीवर आहेत. त्यामुळे गोव्यात भाजपा सत्ता स्थापन करणार आहे स्पष्ट झालंय. याव्यतिरिक्त तीन अपक्षांमधील दोघे भाजपला पाठिंबा देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचं पॉलिटिकल प्लॅनिंग परफेक्ट जमल्याने काँग्रेसचा 'करेक्ट कार्यक्रम' करण्यात यश मिळालं. (Vishwajit Rane taunts Pramod Sawant over Chief Minister Candidate)

goa cm pramod sawant
विश्लेषण : गोव्यातील विजयामुळे फडणवीसांचं भाजपातील वजन वाढणार

दरम्यान, भाजप सत्ता स्थापनेच्या तयारीत असताना मंत्री विश्वजीत राणे यांची पक्षांतर्गत नाराजी समोर आलीय. राणे याचे वडील गोव्याचे सर्वाधिक वेळा निवडून आलेले मुख्यमंत्री होते. राणे यांनाही भाजपात राजकीय महत्वकांक्षा आहेत.

पार्सेकरांनंतर राणेंचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत होतं. मात्र, प्रमोद सावंत यांना संधी देण्यात आल्याने सरकारचा गाडा हाकताना त्यांच्यातील मतभेद बाहेर आले होते. आता भाजपला अन्य अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. तसेच भाजप बहुमत सिद्ध करून सत्तास्थापनेचा दावा करणार हे स्पष्ट असताना अंतर्गत गटबाजीचा सामना करावा लागू शकतो.

goa cm pramod sawant
'आमच्याकडे 'नोटा' कमी असल्याने...', गोव्यात डिपॉझिट जप्त झाल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया

आज निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतरही राणेंनी मुख्यमंत्रीपदाबद्दल नाराजी व्यक्त केल्याचं दिसतं. मुख्यमंत्रीपदासाठी प्रमोद सावंत यांना थेट पाठिंबा देण्यापेक्षा त्यांनी या विषयावर बोलणं टाळलंय. हा विषय संवेदनशील असल्याचं राणेंनी म्हटलं. त्यामुळे मी आत्ता काहीही बोलणार नाही, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.