A रक्तगट असणाऱ्यांनी चुकूनही खाऊ नका नॉनव्हेज!

A रक्तगट असणाऱ्यांनी का खाऊ नये नॉनव्हेज?
blood
blood Sakal Media
Updated on

निरोगी आणि सुदृढ आरोग्य हवं असेल तर आपल्या आहारात सकस व पौष्टिक पदार्थांचा समावेश करा, असा सल्ला कायमच डॉक्टर देतात. मात्र, सध्याच्या काळात आपण प्रत्येक जण फास्ट फूडच्या (fast food) आहारी गेलो आहोत. त्यामुळे हे सकस व पौष्टिक पदार्थ आपोआप आपल्या आहारातून बाहेर सारले गेले आहेत. त्यामुळे नियमित योग्य डाएट करणं अत्यंत गरजेचं आहे. विशेष म्हणजे आजकाल आपण डाएट आपल्या शरीराच्या आकारमानानुसार ठरवत असतो. मात्र, डॉ. जे.डी. एडॅमो यांनी डाएट हे शरीरानुसार न करता रक्तगटानुसार करणे गरजेचं असल्यासं म्हटलं आहे. म्हणूनच, A रक्तगट असणाऱ्यांनी व्यक्तींनी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा व कोणते पदार्थ टाळावेत ते पाहुयात. (a-blood-group-people-should-eat-less-chicken-mutton-to-stay-healthy)

blood
ऑफिस कलिगवर क्रश आहे?; तर 'ही' खबरदारी नक्की घ्या

या पदार्थांचा करा आहारात समावेश -

A रक्तगट असणाऱ्या व्यक्तींची पचनक्षमता बेताची असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी जेवणात खासकरुन पालेभाज्या, टोफू, मासे, डाळी यांचा समावेश केला पाहिजे. तसंच ऑलिव्ह ऑइल, दूध, दुग्धजन्य पदार्थ, मका हे पदार्थदेखील A रक्तगट असणाऱ्या व्यक्तींसाठी फायद्याचे आहेत.

blood
तुमचा पार्टनर बालिशपणे वागतो का? जाणून घ्या त्या मागचं कारण

हे पदार्थ चुकूनही खाऊ नका -

A रक्तगट असणाऱ्या व्यक्तींची पचनक्षमता नाजूक असल्यामुळे त्यांनी हलका आहार घ्याव्या. पचनास जड असणारे पदार्थ कटाक्षाने टाळावेत. यात खासकरुन मांसाहार टाळावा. कोणताही नॉनव्हेज पदार्थ पचायला वेळ लागतो. त्यामुळे या व्यक्तींनी शक्यतो मांसाहार टाळावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.