Alpilean Weight Loss : एका गोळीने खरंच वजन कमी होतं का?

वजन कमी करण्याच्या चिंतेने अनेक लोक ग्रस्त असतात. जळी-स्थळी, काष्ठी पाषाणी आपलं वजन कसं कमी होईल, हाच विचार त्यांच्या मनात असतो.
Weight Loss
Weight LossSakal
Updated on
Summary

वजन कमी करण्याच्या चिंतेने अनेक लोक ग्रस्त असतात. जळी-स्थळी, काष्ठी पाषाणी आपलं वजन कसं कमी होईल, हाच विचार त्यांच्या मनात असतो.

वजन कमी करण्याच्या चिंतेने अनेक लोक ग्रस्त असतात. जळी-स्थळी, काष्ठी पाषाणी आपलं वजन कसं कमी होईल, हाच विचार त्यांच्या मनात असतो. गंमत म्हणजे कधीकधी या विचारामुळेच त्यांचं वजन आणखी वाढतं. अर्थात औषधे आणि आहारातील सप्लीमेंट करणाऱ्या कंपन्यांसाठी असे ग्राहक आणि कथित आरोग्याग्रही लोक म्हणजे वरदानच असतं. त्यांच्यासाठी निरनिराळी हेल्थ सप्लीमेंट्स आणि औषधं तयार केली जातात.

सध्या चर्चेत असलेलं असंच एक औषध खरंतर डाएटरी सप्लीमेंट म्हणजे अ‍ॅल्पाइन. Alpilean Weight Loss हिमालयातील आणि प्राचीन ग्रंथांतील सूत्रे वापरून हे सप्लीमेंट तयार केल्याचा दावा केला जातो आहे. वेबसाईट्सवर या औषधाच्या जाहिराती झळकत असल्याने औषधाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. हे औषध नेमकं काय आहे, तज्ज्ञांचं याबाबत मत काय हे जाणून घेऊया...

औषध तयार करणारी कंपनी कोणती?

झॅक मिलर आणि डॉ मॅथ्यू गिब्ज यांनी तयार केलेले हे सप्लीमेंट यूएसएमध्ये उत्पादित केले जाते. त्यांच्या अधिकृत संकेतस्थळानुसार अ‍ॅल्पाइन हे हिमालयातील प्राचीन औषधांच्या रचनेनुसार तयार केले आहे. या फॉर्म्युलामुळे वजन कमी होण्याबरोबरच दीर्घायुष्यही मिळते असा दावा केला गेला आहे.

अ‍ॅल्पाइन वेट लॉस फॉर्म्युला नेमका आहे तरी काय?

हे एक डाएटरी सप्लीमेंट आहे. जे आरोग्यपूर्ण पद्धतीने वजन कमी करते. लठ्ठपणाबरोबरच उच्चरक्तदाब, कोलेस्टेरॉल, मधुमेह, ह्दयविकार अशा अनेक समस्या येतातच. वजन कमी करताना साधारणत: आहारावर नियंत्रण आणलं जातं, व्यायामाच्या निरनिराळ्या पद्धती वापरल्या जातात. वजन कमी करण्याच्या निरनिराळ्या युक्त्या प्रयुक्त्या वापरल्या जातात. पण तरीही काहींचं वजन कमी होतच नाही. त्याला काही विशिष्ट घटक कारणीभूत असतात. अ‍ॅल्पाइनमध्ये अशा काही घटकांचा समावेश आहे, जे एकत्रित मिळून वजन कमी करण्यास उपयुक्त ठरतात. शिवाय या घटकांचं सेवनही सोपं आहे कारण त्यापासून एक गोळी तयार केली गेली आहे. ही गोळी घेतल्यानंतर पोटावरील अतिरीक्त चरबी नाहीशी होते. वजन कमी होते आणि उत्तम शरीरयष्टी राखता येते, असा दावा उत्पादक कंपनी करते.

अ‍ॅल्पाइन फॉर्म्युलाचे कार्य कसे चालते?

  • यूएसमध्ये तयार केल्या जाणाऱ्या अ‍ॅल्पाइनमुळे झटपट वजन कमी होते. काहीजणांना कितीही खाल्लं तरी सहज पचतं त्याचं चरबीत रुपांतर होत नाही. पण काहींच्या बाबतीत तसं होत नाही. अशाच व्यक्तींसाठी अ‍ॅल्पाइन काम करते. शरीरातील वजन घटवण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला चालना देण्यासाठी या सप्लीमेंटचा वापर होतो.

  • शरीराचे अंतर्गत तापमान हा वजन घटवण्यातला कळीचा मुद्दा असतो. शरीराचं योग्य तापमान राखलं गेल्यास चयापचय क्रिया, कॅलरी जाळण्याची आणि वजन घटवण्याची नैसर्गिक यंत्रणा व्यवस्थित काम करते.

  • एका शास्त्रीय संशोधनाप्रमाणे जेव्हा शरीरातील अवयवांचं तापमान जेव्हा अगदी योग्य असतं तेव्हा चरबी जाळली जाण्याची प्रक्रिया अगदी योग्य पद्धतीने चालते, त्यामुळे तुम्हाला छान हलकं वाटतंच शिवाय आकारात राहायला मदत होते.

  • परंतु जेव्हा हे तापमान कमी होते तेव्हा वजन वाढते आणि त्याबरोबरच बाकीच्या तक्रारी सुरू होतात.

  • याचसाठी अ‍ॅल्पाइन फॉर्म्युला तयार केला गेला आहे. शरीरातील चयापचय क्रियेला उर्जा देण्याचे पर्यायाने चरबी कमी करणाऱ्या यंत्रणेला चालना देण्याचे काम केले जाते.

अ‍ॅल्पाइन फॉर्म्युलाचा नक्की उपयोग कसा होतो?

  • अ‍ॅल्पाइन गोळ्या शरीराचे तापमान योग्य राखतात, ज्याचा वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो.

  • चयापचन क्रियेला या गोळ्या उर्जा पुरवतात जी वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची असते.

  • दिवसभर उर्जेचा आरोग्यपूर्ण आणि अत्यावश्यक असा प्रवाह चालू ठेवण्यात अॅल्पाइन मदत करते.

  • अ‍ॅल्पाइन कॅलरी जाळण्यास मदत करते आणि शरीरातील उर्जाप्रवाह वाहता ठेवते.

  • अन्नपदार्थांबाबतची तीव्र इच्छा आणि भूक नियंत्रणात राहण्यासाठी अ‍ॅल्पाइन मदत करते.

  • ह्दयाचे आरोग्य चांगले राखण्यास तसेच कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास आणि चांगली प्रतिकारक शक्ती राखण्यास हे मदत करते.

  • अ‍ॅल्पाइनमुळे त्वचासुद्धा ताजीतवानी राहते.

  • एकूण रक्ताभिसरण, चयापचय क्रिया सुधारण्यास, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि डिटॉक्सीफिकेशनसाठी

अ‍ॅल्पाइन फॉर्म्युला अधिक यशस्वी बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी उपयुक्त ठरतात?

  • अ‍ॅल्पाइनमध्ये शरीराचे तापमान वाढवणारे सहा परिणामकारक घटक असतात.

  • गोल्डन अ‍ॅलगी - हा प्राचीन घटक आहे. शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी गोल्डन अ‍ॅलगीचा उपयोग होत असतो. आरोग्याच्या दृष्टीने त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. यकृत आणि मेंदूचे कार्य सुरळीत राखण्यासाठी ही गोल्डन अ‍ॅलगी मदत करते.

  • डिका बिया - वजन कमी करण्याच्या अनेक पदार्थांत किंवा औषधात याचा वापर होतो. शरीराचे तापमान योग्य राखण्याबरोबरच डिका बियांचे अनेक इतर उपयोगही आहेत. त्यातला महत्त्वाचा म्हणजे शरीराला अनुकूल अशी पचनशक्ती विकसीत करण्यासाठी, आरोग्यपूर्ण कोलेस्टेरॉल राखण्यासाठी आणि पोटफुगीपासून सुटका करून घेण्यासाठी डिका उपयोगी पडतो.

  • शेवग्याची पाने - शेवगा आरोग्यदायी आहेच पण त्याची पाने उत्तम अँटीऑक्सिडंटचं काम करतात. ज्यामुळे अ‍ॅल्पाइन फॉर्म्युलात त्याचा वापर महत्त्वपूर्ण ठरतो.

  • कडू संत्रे - शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी हे मदत करतेच परंतु शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठीसुद्धा याचा उपयोग होतो आणि फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

  • आल्याची मूळे - वजन कमी करण्यासाठी वापरला जाणारा हा महत्त्वाचा घटक. स्नायूंना ताकद देणारा हा घटक दात आणि हिरड्यांसाठीसुद्धा उपयुक्त ठरतो

  • हळदीची मूळे - आरोग्याच्या दृष्टीकोनातून हळदीइतकेच महत्त्व हळदीच्या मूळांना आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तर शरीराचे तापमान नीट राखण्यासाठी त्याचा उपयोग होतो. दुसरे म्हणजे त्वचा ताजीतवानी, टवटवीत राखण्यासाठी हे उपयोगी ठरते. शिवाय ह्दयाचे आरोग्य आणि कार्य चांगले राखण्यासाठी हळदीच्या मूळांचा उपयोग होतो.

डॉक्टर काय म्हणतात?

फक्त एका गोळीने वजन कधी कमी होऊ शकत नाही. कारण ते शक्यच नसते. आपल्या वजनातील घट दीर्घकाळ टिकवायची असेल तर आहार आणि व्यायाम दोन्हीचा योग्य तो संगम करणे गरजेचे आहे. केवळ क्रॅश डाएट केल्यामुळे तुम्ही वजन झटपट कमी करू शकाल पण वजनातील ही घट जास्तकाळ टिकवायची असेल तर व्यायामाची जोड हवीच. कारण नुसतेच डाएट करत असाल तर ते सोडल्यानंतर वजन भराभर वाढत जाते. ते आटोक्यात ठेवण्यासाठी व्यायामाचा उपयोग होतो. नुसतेच क्रॅश डाएट केले तर शरीरातील स्नायूंचे प्रमाण कमी होते. बीएमआर कमी होतो आणि म्हणुन डाएट प्लॅन सोडल्यावर वजन पुन्हा पूर्वस्थितीत येते. घटलेले वजन कायम ठेवण्यासाठी व्यायामाची जोड हवीच. व्यायामामुळे चरबीचे प्रमाण कमी होते आणि स्नायूंचे प्रमाण कायम राहते त्यामुळे वजनातील घट कायम राखण्यासाठी त्याचा उपयोग होतो. म्हणूनच केवळ एक गोळी घेऊन वजन कमी होते, हा दावा चुकीचा आहे.

- डॉ. वैशाली जोशी, होमिओपॅथिक फिजिशिअन आणि आहारतज्ज्ञ

(संकलन - स्वाती केतकर पंडित)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.