सोयाबीनमुळे पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावर होतो परिणाम? दाव्यावरून वाद

soya seeds
soya seeds
Updated on

प्लांट बेस्ड प्रोटीन, एमीनो एसिड आणि आरोग्यासाठी फायदेश ठरणारे कित्येक गुणकारी तत्व असूनही सोयाबीनवरुन न्युट्रीशन्सिटमध्ये नवा वाद सुरु झाला आहे. काही एक्सपर्टनुसार, पुरुषांनी सोयाबीन खाऊ नये. सोयाबीन खाल्यामुळे पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो, असा दावा त्यांनी केला आहे. पण काही एक्सपर्ट मात्र या दाव्याला विरोध करत आहे.

सोयाबीन विरोधात बोलणारे एक्सपर्ट म्हणतात की, सोयाबीनमध्ये पॉलीफेनॉनचे भरपूर प्रमाण असते, ज्याला आपण आयसोफ्लेवोन्स किंवा फायटोएस्ट्रौजेन म्हणतो. हे पॉलीफेनॉल फिमेल एस्ट्रोजेन हार्मोनची नक्कल करताना आढळतात. एक्सपर्टनुसार, यामध्ये उपलब्ध फायटोएस्ट्रोजनमुळे पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे त्याचे सेवन करू नये.

soya seeds
कुणी स्पेस देतं का स्पेस...कपल्सना हवा स्वतःसाठी वेळ 

पण, संशोधनानुसार, सोयाबीन आयसोयफ्लेवोन्स आणि एस्ट्रोजनचे मेकॅनिझम एकदम वेगळे आहे आणि आयसोफ्लाव्होनचे सेवन पुरुषांच्या प्रजननक्षमतेशी संबधीत आहे याचे फारसे पुरावे नाहीत. यातील अनेक पुरावे वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचे आहे. २००८ मध्ये झालेल्या एक क्रॉस सेक्शनल स्टडीमध्ये सोयाबीनचे जास्त सेवन पुरुषांमध्ये स्पर्म कॉन्सट्रेशन कमी होण्यामुळे दावा केला होता पण, वैज्ञानिकदृष्ट्या हा दावा स्वीकार करणे जरा अवघड आहे.

2015 मध्ये, त्याच संशोधन गटाने एक समान डेटा जारी केला ज्यामध्ये संशोधक सोयाबीन वापरास पुरुष प्रजननक्षमतेशी जोडण्यात अयशस्वी झाले. एका संशोधनानुसार, दोन महिन्यांपर्यंत रोज ४० ग्रॅम सोयबीन सप्लीमेंटचे सेवन केल्यास हेल्दी पुरषांमध्ये सीमेन क्वालिटीवर काही वाईट परिणाम होत नाही असे स्पष्ट झाले.

अलीकडे, फिटनेस इंडस्टीमध्ये सोया आणि त्याची उत्पादने नवीन स्तरावर पोहचले आहेत. भाजी, कोशिंबीर, करी, स्मूदी, दूध आणि प्रोटीन सप्लिमेंटमध्ये लोक याचा भरपूर वापर करतात. स्नायूंना बळकट करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. प्लांट प्रोटीन, अमीनो अॅसिड, फायबर, विटॅमिन्स, मिनरल्स आणि पॉलीफेनॉल्स सारख्या एन्टीऑक्सीडेंट फक्त कोशिकांमध्ये डॅमेज होण्यामुळे होऊ शकते, ते हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यास देखील समर्थन देतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()