मधुमेह (डायबेटिस)

Diabetes
Diabetes
Updated on

मधुमेह हा आजार सर्व साधारण आनुवंशिक आहे. परंतु काही जणांना आनुवंशिकता नसताना ही होऊ शकतो. साखरेचे पदार्थ खाण्यामुळे मधुमेह होतो. हा एक गैरसमज आहे. मुळतः ज्यांच्या शरीरातील पॅनक्रिया (स्वादुपिंड) ग्रंथीच्या कार्यामध्ये दोष उत्पन्न झाल्यामुळे होणारा हा आजार आहे.

डॉ. सुनीलकुमार व्होरा यांनी ३० वर्षाच्या अनुभवातून संशोधन करून औषध प्रणाली तयार केली आहे. आयुर्वेदिक शास्त्राप्रमाणे आयुर्वेदात वर्णन केलेली कटू, तिक्त, रसात्मक द्रव्ये, तुळस, कारले, गुडमार, निम्बपत्र, जांभूळ इ. चा वापर केल्याने पॅनक्रिया या ग्रंथीचे कार्य सुधारण्यास मदत होते. व हळूहळू मधुमेह नियंत्रणात होण्यास सुरुवात होते. त्याचप्रमाणे मधुमेहामुळे सप्तधातु क्षीण झालेले असतात. त्यामध्ये बदल जाणवतो. डायबेटिस न्युरॉलजिया कमी होतो. पचन क्रिया सुधारते. 
शरीरातील सर्व अवयवयांचे इंद्रियाचे कार्य सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वजन नियंत्रित रहाते. हृदयविकार, किडनीचे आजार यांचे कार्य सुधारण्यास मदत होते. डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये फायदा होऊ शकतो.

डायबेटिस अनियंत्रित राहिल्यामुळे होणारे दुष्परिणाम व आजार हे जखमा लवकर बऱ्या न होणे, पुढे त्याचेच गॅंगरिनमध्ये रूपांतर होणे, दृष्टी कमी होते. हृदयरोग, मेदरोग, पुरुषांमध्ये लैगिंक समस्या, स्त्रियांमध्ये गर्भधारणा होण्यास अडचणी व प्रसुतीकाळी रक्तस्राव अति होणे संभव असते. आयुर्वेदिक शास्त्रात सांगितल्याप्रमाणे मधुमेही व्यक्तीने आहार, विहार, दिनचर्या व औषध उपचार यामध्ये सातत्य ठेवल्यास मधुमेह नियंत्रित ठेवून आनंददायी, सुखकर जीवन जगू शकतो.

आहार -
मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने साधारणत : खालीलप्रमाणे आहार घ्यावा. दूध, गोड ताक (अदमुरे), फळभाज्या, टोमॅटो, पालक, स्विटकॉर्न (मका) यांचे सूप, साळीच्या लाहया, ज्वारीच्या लाहया, उपिट, खाकरा, चुरमुरे, गहू, ज्वारी, बाजरीचे पीठ भाजून त्याच्या चपात्या, भाकरी करावी. फळांमध्ये अननस, सफरचंद, पपई, स्ट्रॉबेरी, संत्री, मोसंबी, कैरी, आवळा. मांसाहार सारखे पचनास जड पदार्थ, वातुळ पदार्थ टाळावेत. रात्री झोपण्यापूर्वी  ते  तास आधी जेवण करावे. दुपारी झोपू नये.

व्यायाम -
रोज सकाळी  ते  कि. मी. (३० ते ५० मिनिटे) चालावे. प्राणायाम, कपालभाती. योगासने. सूर्यनमस्कार करावे. मन : स्वास्थ्य चांगले ठेवावे. मानसिक त्रास, 
टेंशन, घेऊ नये.

उपचार डॉ. सुनील व्होरांनी ३० वर्षांच्या अनुभवातून आयुर्वेदिक उपचार पद्धतीने काढा व गोळ्या बनवल्या आहेत. त्या घेतल्यावर मधुमेह नियंत्रित होण्यास व किडनीच्या तक्रारीमध्ये उपयुक्तता होते असे निर्दशनास येते.

- डॉ. सुनीलकुमार व्होरा, आयुर्वेदिक तज्ञ
www.voraclinic.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.