ऐकावं ते नवलचं! सर्दीवरील उपचारासाठी गेला अन् नाकात आढळला दात

अनेक वर्षांपासून श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले.
breathing problems
breathing problemsesakal
Updated on
Summary

अनेक वर्षांपासून श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले.

breathing problems
सर्दी, खोकल्याने मुले बेजार! घाबरु नका या ३ गोष्टी ठेवा लक्षात

प्राथमिक तपासणीत असे आढळले की, त्या माणसाचं एक वेगळच कारण होतं, याचा अर्थ नाकाच्या आतील बाजूला विभाजित करणारे हाड विस्थापित झाले होते. टेस्टमध्ये सेप्टमच्या मागील बाजूस कॅल्किफाइड ब्लॉकेज देखील आढळला. नाकाच्या आतील भागाची तपासणी करण्याचे उपकरण घेऊन पुढील तपासणी केली असता, त्या माणसाच्या नाकपुड्यात कठीण वस्तू असल्याचे स्पष्ट झाले. अखेर सीटी स्कॅनमध्ये आश्चर्याचा धक्का बसला. त्यावेळी नाकाच्या आत एक दात वाढत असल्याचं समोर आलं. वैद्यकीय दृष्टिकोनातून विचार केला तर त्या माणसाच्या नाकाच्या आत एक "उलटा दात" वाढत होता.

breathing problems
एकीकडे करोना, दुसरीकडे ताप, सर्दी-खोकल्याची साथ;

चिकित्सक सागर खन्ना आणि मायकेल टर्नर यांनी न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये म्हणजेच लॅडबिलने दिलेल्या वृत्तानुसार लिहिले, "राइनास्कोपीवर उजव्या नाकपुडीच्या खालच्या भागात एक कठीण, पांढरा गोळा आढळून आला." "पॅरानल सायनसच्या संगणकीय टोमोग्राफीमध्ये अनुनासिक पोकळीतील उलट्या एक्टोपिक दाताशी संबंधित एक विशिष्ट, रेडिओडान्स द्रव्यमान दिसला."

डॉक्टर तोंडी आणि ओटोलॅरींगॉजिक शस्त्रक्रियेद्वारे दात काढून टाकण्यात यशस्वी झाले. "शस्त्रक्रियेच्या तीन महिन्यांनंतर, रुग्णाच्या नाकातील अडथळ्याची लक्षणे दूर झाली होती," अभ्यासात असे दिसून आले आहे की, शस्त्रक्रियेनंतर कोणतीही गुंतागुंत नव्हती. रुग्णाला आता कोणत्याही त्रासाशिवाय श्वास घेता येतो. एक्टोपिक दात असे दात आहेत जे चुकीच्या स्थितीत विकसित होतात. मेडिकल एक्सप्रेसच्या मते, एक्टोपिक दात अत्यंत दुर्मिळ आहेत, जे सुमारे 0.1 टक्के लोकसंख्येमध्ये आढळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.