घोरण्याच्या आजारामुळे झाले बप्पीदा यांचे निधन; जाणून घ्या नेमका आजार

ऑब्सट्रक्टिव स्लीप एपनिया हा आजार झोपेदरम्यान श्वास घेण्यात अडचणी येण्याच्या संदर्भात आहे
Obstructive Sleep Apnea
Obstructive Sleep Apnea esakal
Updated on
Summary

बप्पी लहरी यांना आरोग्याच्या अनेक समस्या होत्या. झोपेशी संबधित ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (ओएसए) या आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला.

८० आणि ९० च्या दशकात डिस्को म्युझिक लोकप्रिय करणारे संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरी (६९) यांचे आज निधन झाले, बप्पी लहरी यांना आरोग्याच्या (Health) अनेक समस्या होत्या. क्रिटिकेयर हॉस्पिटलचे संचालक डॉ. दीपक नामजोशी यांनी सांगितले की, बप्पीदा गेल्या महिन्याभरापासून रूग्णालयात (Hospital) दाखल होते. त्यांना झोपेशी संबधित ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (ओएसए) हा आजार असल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा आजार नेमका काय आहे?, त्याची लक्षणे कोणती? आणि त्याचा सर्वाधिक धोका कोणाला आहे हे यानिमित्ताने जाणून घेणे गरजेचे आहे. (Bappi Lahiri Health Problem)

Obstructive Sleep Apnea
होमिऑपेथी औषध नुसते का चघळायचे? जाणून घ्या यामागचे शास्त्र
Obstructive Sleep Apnea
Obstructive Sleep Apnea

Obstructive Sleep Apnea म्हणजे काय?

मेयो क्लिनीकच्या मते, ऑब्सट्रक्टिव स्लीप एपनिया हा झोपेदरम्यान श्वास घेण्यात अडचणी येण्याच्या संदर्भात आहे. .स्लीप एपनिया या प्रकारात रूग्णाला झोपताना योग्य प्रकारे श्वास घेता येत नाही. तसेच हे लोक जसे झोपतात किंवा आरामाच्या स्थितीत असतात, तेव्हा गळ्यात मांसपेशी श्वसननलिका ब्लॉक करतात. याचा प्रभाव शरीराच्या ऑक्सिजन सप्लायवर होतो, यामुळे असे रूग्ण रात्री अनेकदा जागतात. ऑब्सट्रक्टिव स्लीप एपनिया चे प्रमुख लक्षण म्हणजे घोरणे.

ही आहेत लक्षणे

ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया असलेल्या लोकांना दिवसा खूप झोप येते. ते जोरात घोरतात. झोपेच्या वेळी त्यांचा श्वास लागतो. गुदमरल्यासारखे होऊन अचानक जाग येते. तोंड कोरडे पडणे, घसा खवखवणे, सकाळी डोके दुखणे, दिवसा लक्ष केंद्रीत करताना अडचणी, नैराश्य किंवा चिडचिडेपणा असे मूड सतत बदलणे, रक्तदाब वाढणे अशी लक्षणे आणि संकेत अशा रूग्णांमध्ये दिसायला लागतात.

Obstructive Sleep Apnea
Obstructive Sleep Apnea

कोणाला जास्त धोका

हा आजार कोणालाही होऊ शकतो. पण, डॉक्टरांच्या मते, लठ्ठपणा असलेले लोकं, वृद्ध, उच्च रक्तदाब असलेले रूग्ण, दिर्घकाळ नाक बंद होणे, मधुमेह, धुम्रपान करणारे आणि या आजाराचा कौटुंबिक इतिहास असलेल्या लोकांना धोका जास्त असतो. लहान मुलांनाही याचा धोका असतो.

Obstructive Sleep Apnea
Water Weight म्हणजे काय? यामुळे वाढलेलं वजन असं करा कमी

डॉक्टरांकडे कधी जाल?

जर तुम्हाला अशी लक्षणे दिसायला लागली तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. काही वेळा घोरणे हे सामान्य आहे. पण तुम्ही नेहमीच घोरत असाल आणि त्यामुळे दुसऱ्यांना झोपायला अडचणी येत असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे. जर तुम्ही श्वास लागल्याने उठत असाल, झोपेत गुदमरल्यासारखे वाटत असेल किंवा श्वास घेण्यास अडचणी येत असतील तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा. तसेच दिवसभरात काम करताना, टिव्ही बघताना किंवा गाडी चालवताना जास्त झोप येत असेल तर आजार झाल्याचे लक्षण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.