हृदयविकाराव्यतिरिक्त हृदयाचे ठोके अनियमित झाल्याने झटका आल्याचे दिसते.
कोल्हापूर : व्यायाम आरोग्यासाठी हिताचा असला तरी शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त व्यायामाने काहींना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. तीन महिन्यांत अति व्यायामानंतर चौघांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिममध्ये व्यायामाला जाण्यापूर्वी स्वतःची तंदुरुस्ती, जिममधील सुविधा, खबरदारी व उपाययोजना जाणून घेणे महत्त्वाचे ठरते, असे मत हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अक्षय बाफना यांनी व्यक्त केले.
व्यायामानंतर मृत्यूच्या वाढत्या घटना विचारात घेऊन डॉ. बाफना यांनी हृदयरुग्णांवर अति व्यायामाचा होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला. त्या आधारे चुकीच्या सवयी, अति व्यायामातून निर्माण होणारा जीवाचा धोका टाळण्यासाठी उपाययोजना आखल्या आहेत. त्याचे निवेदन डॉ. बाफना यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिले.
डॉ. बाफना यांचे निरीक्षण असे, अतिरिक्त व्यायामातून झटका आल्यास उपचाराला पोहोचण्यास होणारा विलंब किंवा वैद्यकीय तज्ज्ञाशिवाय घेतली जाणारी औषधे यातून होणारी गुंतागुंत हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी वेळीच उपाययोजना राबवणे गरजे आहे. शरीर सुदृढ बनवण्यासाठी प्रोटीन्स, सप्लिमेंटचे सेवन, ॲनॉबॉलिक स्टेरॉईडचा वापर, बेकायेदशीर औषधांचे सेवन सोबत अति व्यायाम यातून हृदयविकाराचा झटका येण्याचा संभव वाढतो. हृदयविकाराव्यतिरिक्त हृदयाचे ठोके अनियमित झाल्याने झटका आल्याचे दिसते.
व्यायामाला जाण्यापूर्वी
- हृदयाची तपासणी आवश्यक
- इसीजी, इको चाचणी करावी
- पल्स, रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळीची चाचणी
- अनुवंशिक आजाराची किंवा संबंधित व्यक्तीची लक्षणे
- जिमला जाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला बंधककारक
- रोज किमान ४० मिनिटे व्यायाम
- प्रोटिन पावडर धोकादायक
- जिममध्ये प्रशिक्षित फिजिओथेरपिस्ट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.