वजन कमी करण्यासाठी खा आरोग्यदायी ओट्स स्मूदी! जाणून घ्या फायदे

स्मूदीज ही अशी गोष्ट आहे, जी बनवायला सोपी आणि पौष्टिक असते.
Healthy Oats Smoothie
Healthy Oats Smoothieesakal
Updated on
Summary

स्मूदीज ही अशी गोष्ट आहे, जी बनवायला सोपी आणि पौष्टिक असते.

स्मूदीज (Smoothie) ही अशी गोष्ट आहे, जी बनवायला सोपी आणि पौष्टिक असते. स्मूदी बनवण्याची पद्धतदेखील मनोरंजक आहे. ज्या लोकांना निरोगी आहार घ्यायचा आहे, परंतु व्यस्त वेळापत्रकामुळे जेवण बनवायला वेळ मिळत नाही आणि नेहमी गडबडीत असतात, त्यांच्यासाठी स्मूदी हा खरोखर चांगला पर्याय असू शकतो. स्मूदीज वजन (Weight) नियंत्रणात ठेवण्यास आणि जास्त प्रमाणात खाणे टाळायला मदत करतात. फळे आणि भाज्यांच्या अधिक सेवनास हातभार लावतात, उत्तम जेवण म्हणूनदेखील काम करू शकतात कारण ती पोषक तत्त्वांनी परिपूर्ण आहे. तुम्हाला स्मूदीच्या प्रेमात पाडण्यासाठी ही एक साधी रेसिपी (Recipe).

आरोग्यदायी ओट्स स्मूदी

सर्व्हिंग- 1 व्यक्ती, 200-250ml

साहित्य

- 1/4 कप रोल केलेले किंवा सामान्य ओट्स

- 1 गोठलेले चिरलेले केळे

- 1 चमचा पीनट बटर

- 1/2 टीस्पून व्हॅनिला अर्क

- 1/2 टीस्पून दालचिनी पावडर

- 1/2 कप बदामाचे दूध (गोड न केलेले)

कृती

- ब्लेंडर घ्या आणि त्यात ओट्स घालून ब्लेंड करा

- ओट्स बारीक होईपर्यंत मिक्स करा

- यामध्ये दूध, पीनट बटर, केळीचे तुकडे, दालचिनी पावडर घाला.

- वरील सर्व घटक एकजीव आणि घट्ट होईपर्यंत किंवा आपल्या इच्छित सुसंगत होईपर्यंत मिक्स करा. तयार झाल्यावर स्मूदी एका काचेच्या ग्लासमध्ये किंवा मेसन जारमध्ये घाला, आणि लगेच सेवन करा.

टीप

- हेल्दी ओट्स स्मूदीची चव दिवसभर चांगली राहते आणि ती 1 दिवस रेफ्रिजरेटरमध्ये ठेवली तर टिकते.

प्रति सर्व्हिंग पोषण

- ऊर्जा : 325 किलो कॅलरी

- फॅट : 10 ग्रॅम

- कर्बोदके : 52 ग्रॅम

- प्रथिने : 7 ग्रॅम

- फायबर : 6 ग्रॅम

ओट्स स्मूदी खाण्याचे फायदे

- ओट्स अत्यंत पौष्टिक असतात

- अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात

- ते बीटा ग्लुकन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शक्तिशाली विद्रव्य फायबरने समृद्ध आहेत, जे घातक कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर आणि इन्सुलिनचा प्रतिसाद कमी करण्यास मदत करतात.

- अधिक वेळ पोट भरलेले असल्याची भावना वाढवतात

- तुमच्या आतड्यात चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीला प्रोत्साहन देतात.

- रक्तातील साखरेचे नियंत्रण सुधारतात

- वजन नियंत्रणात मदत करतात

- उत्तम फायबरचा स्रोत असल्यामुळे बद्धकोष्ठता आणि पचन समस्या दूर करण्यास मदत करतात.

- स्मूदीमधील केळी हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात

- केळी इन्सुलिन संवेदनशीलता आणि किडनीचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात

- व्यायाम झाल्यावर शरीराला ऊर्जा देण्यास मदत करते

- ही स्मूदी आपल्या दैनंदिन आहारामध्ये समाविष्ट करणे अगदी सोपे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.