गर्भारपणात प्रत्येक स्त्रीने women स्वत:ची व होणाऱ्या बाळाची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे दररोज पौष्टिक आहार आणि नियमित योग करणं गरजेचं आहे. परंतु, गरोदरपणात योग कसा करावा? किंवा कोणत्या प्रकारचा करावा? याविषयी स्त्रियांमध्ये अनेक संभ्रम असतात. त्यामुळेच वेदिक्युअर हेल्थकेअर एण्ड वेलनेसच्या आयुर्वेदाचार्य डॉ .ज्योत्सना गोखले-कदम यांनी प्रेग्नंसीमध्ये स्त्रियांनी नेमका कोणता योग yoga करावा व त्याचे फायदे काय हे सांगितलं आहे. (Benefits-of-yoga-for pregnant-women )
सुरुवातीला आई-बाबा होऊ इच्छिणा-या जोडप्यांनी बाळासाठी प्रयत्न करण्याआधी किमान तीन महिने जीवनशैलीत योग्य बदल, व्यायाम, आहार-विहारासंबंधी चांगल्या सवयींचे पालन करणे आवश्यक आहे. केवळ आई होऊ इच्छिणा-या महिलांनीच चांगल्या सवयी आत्मसात न करता बाबांनीदेखील महत्त्वाचे बदल करणे आवश्यक आहे. कारण निरोगी बाळाकरिता आई आणि बाबा हे दोघेही निरोगी असणे आवश्यक आहे. या काळात व्यसनांपासून दूर राहणे देखील तितकेच महत्वाचे आहे. दोघांचेही वजन वय आणि उंचीच्या गुणोत्तरानुसार अचूक असणे गरजेचे आहे. अतिशय कृश असणे अथवा लठ्ठ असणे हे दोन्ही घटक दुष्परिणामकारक ठरतात.
गरोदरपणात योग करण्याचे फायदे -
१. कमरेच्या वेदना, पायाला आलेली सूज यांपासून आराम मिळतो.
२. मूड सुधारतो आणि शरीरातील उर्जा वाढते.
३. झोप चांगली लागते.
४. वजन वाढत नाही. परिणामी स्थूलपणा येत नाही.
५. शरीर लवचिक होते व स्नायू बळकट होतात.
६.गरोदरपणात महिलांच्या शरीरात बरेच हार्मोनल बदल घडत असतात.
शरीरात वेदना आणि मूड स्विंगची समस्या सामान्य असते. जर महिलांनी गरोदरपणात काही ठराविक योगासन केले तर बऱ्याच समस्या दूर होतात. योग आणि व्यायाम गर्भवती महिलांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या कणखर व सशक्त बनवत असतो. रोग प्रतिकारशक्ती वाढते. आणि, सकाळी होणाऱ्या उलट्या, सिकनेस, बद्धकोष्ठता त्यांच्यावरही मात करते. बाळंतपण नॉर्मल व्हायला अडचण येत नाही. गर्भाशय आणि गर्भनलिका यांच्यातील तणाव कमी करून बाळंतपण सुखकर पार पाडण्यास मदत करते.
कोणती योगासने करावीत?
सुरुवातीचे तीन महिने अतिशय महत्त्वाचे असून या महिन्यांमध्ये बाळाचा विकास होत असतो. या काळात हलके-फुलके व्यायाम करण्यास हरकत नाही. जसे की मानेचे व्यायाम (मान गोलाकार फिरविणे), खांद्याचे व्यायाम (गोलाकार फिरविणे) तसेच आपल्या पायाचे तळवे गोलाकाररित्या फिरविणे असे व्यायाम करण्यास हरकत नाही. मात्र शिर्षासन, सर्वांगासन, पोटावर ताण येईल, उड्या मारण्यासारखे कोणतेही व्यायाम करू नये.
त्यानंतरच्या पुढच्या तीन महिन्यात आपण बाध कोनसाणा (बटरफ्लाय पोज), कॅट-काऊ पोज (मार्जारी आसन), मंडुकासन, ताडासन, त्रिकोणासन, विरभद्रासन, बालासन, शवासन आदी आसनं फायदेशीर ठरतात. पोटावर दाब येणारी आसने, पोटावर झोपून केली जाणारी आसने चुकूनही करु नयेत.
शेवटच्या तीन महिन्यांमध्ये हिप तसेच छातीशी संबंधित आसन करणे फायदेशीर ठरते. तीन ते सहा महिन्यांमध्ये केलेल्या व्यायामाची पुनरावृत्ती करणे गरजेचे आहे. या काळात प्राणायम करणे देखील फायदेशीर ठरते. या काळात पाठीच्या कण्यावर ताण येईल अशी आसनं, पोटाची योगासने टाळावीत. गरोदरपणात योगासन केल्याने पायांची सूज कमी होणे, तणावासारख्या समस्येपासून दूर राहता येणे, श्वासासंबंधीच्या अडचणी दूर करण्यास मदत होते. शरीराला झेपेल असेच व्यायाम करणे फायदेशीर ठरते हे लक्षात असू द्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.