रक्ताभिसरण नीट आहे? कोणी घ्यावी काळजी अन् कसा असावा आहार

रक्ताभिसरण नीट आहे? कोणी घ्यावी काळजी अन् कसा असावा आहार
Updated on

नागपूर : अभिसरणाच्या प्रक्रियेमार्फत शरीरातल्या विविध अवयवांना आणि पेशींना रक्त, ऑक्सिजन तसेच पोषक घटकांचा पुरवठा होतो. एखाद्या अवयवाला कमी प्रमाणात रक्तपुरवठा होऊ लागल्यावर काही लक्षणे दिसून येतात. रक्ताभिसरण प्रक्रियेत येणारे अडथळे ही व्याधी नाही तर इतर शारीरिक व्याधींमुळे निर्माण होणारी समस्या आहे. त्यामुळे वरवरच्या लक्षणांवर उपचार करण्याऐवजी रोगाचे समूळ उच्चाटन होणे गरजेचे आहे.

मधुमेह, स्थूलपणा, हृदयविकार तसेच धमन्यांशी संबंधित विकारांमुळे रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो. रक्ताभिसरण प्रक्रियेतल्या अडथळ्यांमुळे अवयव लुळा पडणे, हातापायांमध्ये वेदना जाणवणे, स्नायूंमध्ये गोळे येणे अशी लक्षणे दिसू लागतात. रक्ताभिसरणातल्या अडथळ्यांना कारणीभूत ठरणाऱ्या व्याधींची वेगळी अशी काही लक्षणे दिसू शकतात.

रक्ताभिसरण नीट आहे? कोणी घ्यावी काळजी अन् कसा असावा आहार
आंबेडकर म्हणाले, धर्म हा व्यक्तिगत विषय, सरकारने ढवळाढवळ करू नये

रक्ताभिसरणाच्या कार्यात विविध कारणांमुळे अडथळे येतात. पेरिफेरल आर्चरी डिसिजमुळे (पीएडी) पायांना कमी प्रमाणात रक्तपुरवठा होतो. या विकारामुळे धमन्या आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. अँथेरॉस्क्लॅरॉससमुळे धमनीकाठण्याची समस्या निर्माण होते. या विकारात धमन्या आणि रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक साठल्यामुळे हात आणि पायांना कमी प्रमाणात रक्तपुरवठा होतो. परिणामी, या अवयवांमध्ये वेदना जाणवतात.

वेळेत उपचार होणे गरजेचे

रक्ताच्या गुठळ्यांमुळे रक्तपुरवठ्यात अडथळे येतात. शरीराच्या कोणत्याही भागात रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. मात्र, हातापायांमधल्या गुठळ्या अधिक धोकादायक असतात. यामुळे रक्ताभिसरणात अडथळे येतात. रक्ताच्या गुठळ्यांना अनेक बाबी कारणीभूत ठरतात. पायातल्या रक्ताची गुठळी फुटल्यास विविध अवयवांपर्यंत पसरू शकते. ही गुठळी हृदय आणि फुफ्फुसापर्यंतही जाऊ शकते. यामुळे पक्षाघाताचा धोका निर्माण होतो. म्हणूनच रक्ताच्या गुठळ्यांवर वेळेत उपचार होणे गरजेचे असते.

मधुमेहींनी घ्यावी विशेष काळजी

शरीरातल्या काही अवयवांना कमी प्रमाणात रक्तपुरवठा होतो. यामुळे पायात गोळे येणे, पोटऱ्या, मांड्यांमध्ये वेदना जाणवणे अशा समस्या जाणवतात. मधुमेहींना या वेदना जाणवत नाहीत. यामुळे रक्ताभिसरणातले दोष त्यांच्या लक्षात येत नाहीत. म्हणूनच रक्तातल्या साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. मधुमेहामुळे रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मधुमेहींनी विशेष काळजी घ्यायला हवी.

रक्ताभिसरण नीट आहे? कोणी घ्यावी काळजी अन् कसा असावा आहार
गावाला दिले संगणक साक्षरतेचे धडे; महिलांना केले आत्मनिर्भर

आहारात करा लोह असलेल्या पदार्थांचा समावेश

लोह हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. हिमोग्लोबिनचे काम योग्य पद्धतीने होण्यामध्ये लोहाची महत्त्वाची भूमिका असते. लोहामुळे रक्तावाटे शरीराला मिळणारा ऑक्सिजन योग्य पद्धतीने मिळतो. परंतु, रक्तात लोहाची कमतरता असेल तर व्यक्तीला ॲनिमियाचा त्रास होतो. त्यामुळे लोह मिळतील अशा पदार्थांचा आहारात समावेश असायला हवा. यामध्ये पालेभाज्या, बीट, सर्व कडधान्ये यांचा समावेश होतो.

स्निग्ध पदार्थ कमी प्रमाणात घ्या

आहारात प्रमाणापेक्षा जास्त स्निग्ध पदार्थांचा समावेश असल्यास रक्ताभिसरण क्रियेत अडथळे येण्याची शक्यता असते. त्यामुळे डेअरीतील पदार्थ योग्य प्रमाणात घ्या.

रक्ताभिसरण नीट आहे? कोणी घ्यावी काळजी अन् कसा असावा आहार
‘श्रीकृष्ण’ राहतात आयुर्वेदिक वेलींच्या छायेत

फॉलेटचे प्रमाण ठेवा योग्य

रक्ताभिसरण सुरळीत करायचे असल्यास आहारात फॉलेटचे प्रमाण योग्य असणे आवश्यक असते. जीवनसत्त्व ब मध्ये फॉलेटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तपेशी तयार होण्यास तसेच हिमोग्लोबिनचे कार्य सुरळीत होण्यासही मदत होते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.