Brain Awareness Week : कोरोना लसी घेतल्यानंतर डोकेदुखीचा त्रास कमी!

कोरोना लस घेतलेल्या काही रुग्णांचा डोकेदुखीचा त्रास कमी झाल्याचे एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे.
Brain Awareness Week 2022 health headache reduce after taking corona vaccine nagpur
Brain Awareness Week 2022 health headache reduce after taking corona vaccine nagpur sakal
Updated on

नागपूर : कोरोना काळात नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. हृदय आणि फफ्फूसां विकार अनेकांना झाले. म्यूकर मायक्रोसिसमुळे कित्येकांचे जबडे खराब झाले. मात्र, काही सकारात्मक गोष्टीही घडल्या आहेत. कोरोना लस घेतलेल्या काही रुग्णांचा डोकेदुखीचा त्रास कमी झाल्याचे एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे.

जागतिक मेंदू सप्ताहाचे निमित्त साधून आयोजित केलेल्या जागतिक स्तरावरील चर्चासत्रात मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. डेव्हिड ग्रॅशिया अझोरिन यांनी कोरोना रुग्णांच्या डोकेदुखीवर सादर केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आलेली माहिती येथे सादर केली. ९०० हून अधिक कोविड रुग्णांवर त्यांनी अभ्यास केला. विशेष असे की, कोरोना लसीकरणानंतर डोकेदुखीचा त्रास कमी झाला. लसीकरणामुळे डोकेदुखीचा कालावधी १० दिवस कमी झाला, असेही ते म्हणाले.

जगभरात दरवर्षी न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरमध्ये होणारी वाढ पाहता उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सर्वांसाठी उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. काही रुग्णांची डोकेदुखी कमी झाली असली तरी कोरोनाच्या बाधेतून मुक्त झाल्यानंतर डोकेदुखी दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस टिकून राहिल्यानंतर अशा रुग्णांमध्ये डोकेदुखीची तीव्रता अधिक असून फोटोफोबिया दिसून आल्याचे निरीक्षणही मेंदूरोगतज्ज्ञांनी नोंदविले आहे.

मेंदूरोगात १० टक्के मज्जातंतूसंबंधित आजार

न्यूरोलॉजिकल आजारांमध्ये १० टक्के आजार मज्जातंतू आणि स्नायूसंबंधित रोग असतात. स्नायू आणि मज्जातंतूंचे रोग (न्यूरोमस्क्युलर डिसीज ) आणि न्यूरोपॅथी आजार हे मधुमेह आणि अल्कोहोलच्या समस्यांवर वेळेवर आणि प्रभावीपणे उपचार केले तर टाळता येऊ शकतात. भारतीय प्राचीन विवाहपद्धतीत सामुदायिक विवाह आणि कुटुंबातील दूरच्या सदस्यांमध्ये विवाहाच्या आणि इतर परंपरा हे जनुकीय आजार वाढण्यास कारणीभूत ठरतात, असे मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. सतीश खाडिलकर म्हणाले.

मधुमेह हे जगभरातील न्यूरोपॅथीचे सर्वांत सामान्य कारण आहे. मधुमेह असलेल्या ६०-७० व्यक्तींमध्ये न्यूरोपॅथीची लक्षणे असतात. कोरोनासारख्या विषाणूंच्या संपर्कात आल्यानंतर शरीरातील नसांवरही परिणाम होतो. रोगप्रतिकारशक्ती हा या विकारांवर उपचार ठरतो. टीबी आणि कर्करोगाची औषधेदेखील अशा न्यूरोपॅथीस प्रवृत्त करू शकतात.

-डॉ. स्वाती शाह, मेंदूरोगतज्ज्ञ.

मेंदूरोगाचे कारण समजून घेऊन आणि योग्य औषधोपचार करून मज्जातंतू आणि स्नायूंच्या आजारांवर उपचार करता येतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मेंदूरोग तज्ज्ञांकडून मिळालेल्या अंतर्दृष्टीमुळे न्यूरोमस्क्युलर रोगाचे ज्ञान आणि त्यावर योग्य प्रकारच्या उपचारांची दिशा माहीत होते. यावरून रुग्ण बरा होण्यास नक्कीच हातभार लागेल.

-डॉ. चंद्रशेखर मेश्राम, विश्वस्त,न्यूरोलॉजिस्ट आणि वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()