महिलांमध्ये १४ टक्के स्तन कॅन्सर; लक्षणे व उपाय जाणून घ्या

Breast Cancer
Breast CancerBreast Cancer
Updated on

नागपूर : धकाधकीच्या, स्पर्धेच्या युगात कळत-नकळत विविध आजारांचा विळखा पडतो. बदलत्या जीवनशैलीने कॅन्सरसारख्या दुर्धर आजार अधिकच घट्ट होत आहे. त्यातही महिलांमध्ये आरोग्यविषयी जागरूकता नसते, यामुळे स्तन कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. एकूण कॅन्सरपैकी महिलांमध्ये स्तन कॅन्सरचे प्रमाण १४ टक्के आहे. दरवर्षी एक लाख ८० हजार महिला स्तन कॅन्सरच्या विळख्यात अडकत आहे. विशेष असे की, महिलांनी थोडं जागरूक राहून स्व-परिक्षणातून स्तन कॅन्सरवर मात करू शकतात.

ऑक्टोबर महिना हा स्तन कॅन्सर जनजागृती महिना म्हणून साजरा करण्यात येतो. पुरुषांमध्ये हेड ॲण्ड नेक कॅन्सरनंतर महिलांमध्ये स्तन कॅन्सरचे प्रमाण १४ टक्के आहे, अशी माहिती कॅन्सर शल्यचिकित्सक डॉ. नितीन बोमनवार यांनी दिली. दरवर्षी १,८०,००० नव्या रुग्णांची भर पडत असल्यामुळे भविष्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण होण्याचा धोका वर्तविण्यात येत आहे.

स्टेज ३ व स्टेज ४ अर्थात उशिराने स्तन कॅन्सरचे निदान होत असल्याने मृत्यूचा टक्का वाढला आहे. स्तन कॅन्सरसाठी वय, पूर्वेतिहास, आनुवंशिकता, किरणतोत्सारा प्रादुर्भाव, लठ्ठपणा, लवकर पाळी येणे, उशिरा रजोनिवृत्ती, उशिरा गर्भधारणा होणे, स्तनपान न करणे, रजोनिवृत्तीनंतरची हॉर्मोनल थेरपी, मद्यपान ही जीवनशैली कारणीभूत ठरत असल्याचेही डॉ. बोमनवार म्हणाले.

Breast Cancer
‘मम्मी-पप्पा, सॉरी मी आत्महत्या करतेय’ मुलीने लावला गळफास

लक्षणे

  • स्तनात किंवा काखेत गाठ येणे

  • स्तनाच्या त्वचेची जाडी वाढणे

  • स्तनांचा आकार व ठेवण बदलणे

  • स्तनाग्रातून रक्तस्राव

  • स्तनाची त्वचा लालसर होणे

टाळण्यासाठी हे करा

  • मद्यपान टाळा

  • मर्यादित हॉर्मोनल थेरपी

  • आरोग्यदायी जीवनशैली

  • नियमित व्यायाम

  • संतुलित आहार

  • लठ्ठपणा नियंत्रणात ठेवा

Breast Cancer
कडधान्य निवडताना घ्या काळजी; वाचा यामागचे कारण
नियमित तपासणी केली तर होणारे बदल सहजतेने कळतात. स्तनांमध्ये गाठ आली, स्तनाग्रातून रक्त येत आहे किंवा स्तनांमध्ये कुठलाही बदल झाला तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वयाच्या तिशी-पस्तीशीनंतर वर्षातून एकदा मॅमोग्राफी करा.
- डॉ. नितीन बोमनवार, कॅन्सर, शल्यचिकित्सक, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.