अशी कोणती गोष्ट आहे जी आपण कुठेही गेलो किंवा झोपलो तरीदेखील आपल्यासोबत असते? माणूस जिवंत असेपर्यंत ती कधीच त्यापासून अलिप्त होत नाही. ती गोष्ट म्हणजे अर्थात आपला श्वास. जोपर्यंत आपल्या शरीराचं कार्य सुरळीत सुरू आहे तोपर्यंत आपला श्वास सुरु असतो. मात्र, श्वास घेण्याच्या पद्धतीवरही आपली शरीराची कार्यप्रणाली अवलंबून असते. थोडक्यात काय तर दोन्ही गोष्टी परस्परांवर अवलंबून आहेत. परंतु, श्वास घेणं म्हणजे केवळ नाकावाटे हवा आत घेणं नव्हे. श्वास घेण्याचीही एक पद्धत आहे. श्वासावर योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात नियंत्रण ठेवलं तर अनेक शारीरिक समस्यांचं निराकारण होतं. म्हणूनच, जर आपण योग्य पद्धतीने श्वास घेतला नाही तर शरीरावर त्याचा कसा परिणाम होतो ते पाहुयात. (breathing-exercises-for-better-health)
१. उथळ आणि जलद -
६ लिटर हवा साठवली जाईल इतकी आपल्या फुफ्फुसांची क्षमता असते. मात्र, आपल्या नैसर्गिक उथळ श्वासोच्छवासामध्ये त्याची बहुतांश क्षमता वापरलीच जात नाही. नैसर्गिक उथळपणामुळे आपण केवळ ५०० मि.ली इतकाच श्वास घेतो. त्यामुळे, उरलेल्या फुफ्फुसांची क्षमता न वापरल्यामुळे पूर्ण शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे वापरात नसलेल्या फुफ्फुसांच्या भागात इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणूनच, घरातील प्रत्येक कोपरा ज्याप्रमाणे स्वच्छ व वापरात असतो. तसंच फुफ्फुसांचादेखील वापर झाला पाहिजे.
२. मनाचा श्वासावर होणारा परिणाम -
कोणतीही सुखद किंवा त्रासदायक भावना ही सर्वप्रथम आपल्या श्वासाच्या गती आणि नियमिततेवर आघात करते. राग, भीती, स्ट्रेस यामुळे श्वास जलद आणि अनियमित होतो. तसेच आवडीचे काम करताना, आनंदात असताना, शांततेत किंवा झोपेत श्वासही संथ आणि लयबद्ध असतो. मनाच्या अवस्थेवर श्वास अवलंबून असतो. पण, श्वास कायम असाच उत्तेजित राहिला तर, मनही शांत करणे अवघड होते आणि हे दृष्टचक्र चालूच राहते. अशाने चयापचयही नियंत्रित राहण्यास अडथळा येऊ शकतो. क्रॉनिक फटिग, पाठ-मान दुखणे, फायब्रोमायल्जिया, डिप्रेशन, अँगझायटीसारखे त्रास उद्भवू शकतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.