मधुमेह असलेल्या रूग्ण जे अन्न खातात त्यामुळे त्यांच्या शरीरातील ग्लुकोजच्या पातळीच्या प्रमाणावर त्याचा परिणाम होतो. ग्लुकोजची पातळी वाढल्याने अनेक आरोग्य (Health) समस्या निर्माण होतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काजू खाणे गरजेचे आहे. काजू (Cashew) खाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी (Diabetes Patient)फायदेशीर मानले जाते. जेवणात काजूचा समावेश केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. वजन कमी होते तसेच तणावही कमी होतो. तसेच इतरही फायदे होतात. त्यामुळे मधुमेहाच्या रूग्णांनी आवर्जून काजू खाल्ले पाहिजेत.
१) इन्सुलिनची पातळी वाढते- जेव्हा स्वादुपिंड शरीरात इन्सुलिन हार्मोन्स बनवत नाही, तेव्हा लोकांना मधुमेह होतो. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे, ब्रेन स्ट्रोक, अवयव निकामी होणे, मूत्रपिंड निकामी होणे, हृदयविकाराचा झटका यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. जर तुम्ही आहारात काजूचा समावेश केला तर इन्सुलिनची पातळी वाढते.
२) तणाव कमी होतो- काजूमध्ये पॉटेशिअम, फायबर, व्हिटॅमिन सी असते. ही पोषकतत्त्वे मधुमेहामुळे निर्माण होणारी तणावाची पातळी कमी करण्यास मदत करतात. मधुमेहात अनेक लोकांमध्ये तणावाची लक्षणे दिसून येतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काजू खाणे फायद्याचे ठरते. तसेच काजूमध्ये असलेल्या काही घटकांमुळे इन्सुलिनची पातळी वाढते.
३) वजन कमी होते- मधुमेह असलेल्या लोकांना वजन कमी करण्यासाठी अडचणी येतात. पण काजू खाल्ल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते. म्हणून मधुमेह असलेल्यांनी काजू खाल्ले पाहिजेत. काजूत मॅग्नेशिअम, फायबर, कर्बोदके असतात. ते वजन कमी करण्यास मदत करतात. कार्ब्स आणि फायबर शरीरातील चयापचय वाढवतात. त्यामुळे वजन कमी होते.
४) उर्जा मिळते- काजू खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. त्यासाठी 2 ते 4 काजू पुरतात. आहारतज्ञ मधुमेही रुग्णांसाठी डाएट चार्ट बनविताना काजू खाण्याचा सल्ला देतात. कारण काजू कमी प्रमाणात खाल्ले तरी त्यातून जास्तीत जास्त ऊर्जा मिळते.
५) उच्च रक्तदाबाची समस्या दूर होते- काजूमध्ये वनस्पतीजन्य प्रथिनं असतात. काजू खाल्ल्याने उच्च रक्तदाबाची समस्या कमी होते. काजू खाल्ल्याने किडनीही निरोगी राहते. मधुमेहाच्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्तीही चांगली नसते. त्यामुळे ती वाढवण्यासाठी काजू फायदेशीर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच काजू खाल्ले पाहिजेत. एका दिवसात फक्त 4 ते 5 काजू खाल्ले पाहिजेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.