पूर्णपणे बरा न होऊ शकणारा आजार म्हणजे कर्करोग. आजही या आजाराविषयी नागरिकांमध्ये काही समज-गैरसमज आहेत. याच गैरसमजातून हा आजार आणखी बळावल्याचंही दिसून येतं. सध्याच्या घडीला कर्करोगग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असून यात स्त्रियांमध्ये कर्करोग होण्याचं प्रमाण जास्त असल्याचं पाहायला मिळतं. साधारणपणे स्त्रियांमध्ये होणारा ब्रेस्ट क्रॅन्सर याविषयी साऱ्यांनाच माहित असेल. परंतु, अंडाशयाच्या कर्करोगाविषयी म्हणजेच ovarian cancer विषयी महिलांमध्ये फारशी सजगता किंवा जागृकता नाही. त्यामुळेच ovarian कॅन्सर म्हणजे काय? हा आजार टाळण्यासाठी किंवा त्याच्याशी लढा देण्यासाठी आहारात कोणते बदल करावेत जे जाणून घेऊयात.
मुख्यतः चाळीशी ओलांडल्यानंतर अनेक महिलांमध्ये अंडाशयाच्या कर्करोगाचे निदान झाल्याचं पाहायला मिळतं. मात्र, आता तरुण मुलींमध्येही अंडाशयाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. अनेक रुग्णांमध्ये या कर्करोगाचे निदान फारच पुढच्या टप्प्यात होते. त्यामुळेच अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी काही टिप्स -
१. वजन नियंत्रणात ठेवा –
वजन जास्त असल्यास अंडाशयाचा कर्करोग होऊ शकतो असा एक समज आहे. मात्र, याविषयी कोणतंही ठाम व्यक्तव्य करता येत नाही. कारण,मुळात वाढीव वजन आणि अंडाशयाचा कर्करोग या दोघांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. परंतु, अतिरिक्त वजनामुळे हृदयावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शारीरिक वजन नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे.
२. शारीरिक हालचाली करा –
तुम्हाला व्यायाम करायला आवडत नसेल तर शरीराची हालचाल होईल, अशा गोष्टींमध्ये
मन रमवण्यचा प्रयत्न करा. आठवड्यातील पाच दिवस तुम्हाला काय करायच आहे, याबाबत एक वेळापत्रक तयार करा. याशिवाय निरोगी राहण्यासाठी शरीराचे वजन टिकवून ठेवण्याकडे लक्ष केंद्रीत करा. नियमितपणे व्यायाम केल्यास शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत मिळते, शरीराला ऊर्जा मिळते आणि मनावरील तणाव कमी होतो.
३.आहाराकडे लक्ष द्या –
जंकफूड, तेलकट आणि मसालेदार पदार्थाचे सेवन करणे शक्यतो टाळावेत. दररोज जेवणात ताजे फळे, भाज्या, शेंगदाणे, सोयाबीन, गाजर, कडधान्य, संपूर्ण धान्य आणि बियाणे यांचा समावेश करा. बेकरी उत्पादनांपासून दूर रहा. शरीराला पुरेसे व्हिटॅमिन डी मिळतील असे खाद्यपदार्थांचे सेवन करा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन डी ची औषध घ्या. याशिवाय जीवनशैलीत योग्य तो बदल करण्यासाठी सर्वप्रथम मदयपान आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणं टाळणे गरजेचं आहे.
४. गर्भधारणा आणि स्तनपान -
तुम्हाला माहिती आहे का? गर्भधारणा आणि स्तनपान यामुळे स्त्रियांमधील अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी करू शकतो. स्तनपान केल्याने आईला पुढील आयुष्यात मुख्यतः अंडाशयाचा, स्तनाचा व गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका कमी होतो. स्तनपान सुरु असताना महिलेचा शरीरात बरेच संप्रेरके हार्मोनल बदल होत असतात. शरीरातील इस्ट्रोगेन हार्मोनची पातळी कमी राहते. स्तनाचा कॅन्सरचा बहुतांश वेळा या हार्मोनवर अवलंबुन असल्याने गर्भधारणा व कॅन्सरचा रोग टाळू शकतो.
(लेखक डॉ.राजेंद्र केरकर हे मुंबईतील एसीआय-कंबाला हिल हॉस्पिटलमध्ये प्राध्यापक आणि प्रमुख स्त्रीरोग कर्करोगतज्ज्ञ आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.