सकाळी उठल्या उठल्या ही चार पानं खा! मधुमेह, उच्च रक्तदाबापासून आराम मिळवा

मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची समस्या ही अनेकांमध्ये आढळते
Leaves For Diabetes
Leaves For Diabetes google
Updated on

मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची समस्या ही अनेकांमध्ये आढळते. या समस्या असल्याने अनेकांना आरोग्याच्या तक्रारी (Health Problem) निर्माण होतात. त्यामुळे उच्च रक्त शर्करा पातळी (Diabetes)आणि रक्तदाब (Bp) नियंत्रित करणे खूप महत्वाचे आहे. त्यासाठी काही घरगुती उपाय (Home Remedies) करायला हवेत. तुम्ही सकाळी (Morning) उठल्या उठल्या हे उपाय केलेत, तर नक्कीच तुम्ही तुमच्या आजारावर योग्य नियंत्रण मिळवू शकता. कारण मधुमेह आणि उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी घरगुती उपचार हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. (Leaves For Diabetes Bp Patients)

Leaves For Diabetes
Blood Sugar Level वयानुसार किती असावी? जाणून घ्या
Tulsi
Tulsi esakal

ही पाने खाउन पाहा

तुळशीची पाने

तुळस सर्वात प्रभावी आहे. ती आपल्या शरीराला अनेक आजारांपासून वाचवते. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्ल्याने टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी होते. तुळशीची पाने लिपिड सामग्री कमी करून, इस्केमिया, स्ट्रोक आणि उच्च रक्तदाब कमी करतात. त्यामुळे हृदयविकारापासून बचाव केला जाऊ शकतो.(Leaves For Diabetes Bp Patients)

Leaves For Diabetes
बटाटा खाल्ल्यामुळे वजन होते कमी! कसे ते जाणून घ्या
Curry leaves
Curry leavesesakal

कढीपत्ता

भारतीय स्वयंपाकात वापरला जाणारा हा एक महत्वाचा घटक आहे. कढीपत्यामुळे तुमच्या जेवणात सुगंध तर येतोच पण त्याचबरोबर त्याचे अनेक चांगले गुणधर्मही आहेत. कढीपत्त्याच्या नियमित सेवनाने इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींना उत्तेजित करायला मदत करते. तसेच, या पेशी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी मदत करतात.(Leaves For Diabetes Bp Patients)

Leaves For Diabetes
महिलांनो, PCOS त्रास होतोय? आहारात खा 'या' सुपर सीड्स
कडूलिंब
कडूलिंब

कडूलिंबाची पाने

कडुलिंबाच्या पानांचेही अनेक फायदे आहेत. कडुलिंबाचे पान दररोज खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. मधुमेह असल्यास, तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे निरीक्षण करा कारण जास्त प्रमाणात सेवन केल्याने काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये तुमच्या रक्तातील साखरेची पातळी खूप कमी होऊ शकते. तसेच कडुनिंबाच्या पानांचा अँटीहिस्टामाइन प्रभाव रक्तवाहिन्या पातळ करू शकतात. यामुळेच ही पाने रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.(Leaves For Diabetes Bp Patients)

Leaves For Diabetes
घसा खवखवतोय, तीन घरगुती उपायांनी त्रास होईल कमी
ऑलिव्हची पाने
ऑलिव्हची पाने google

ऑलिव्हची पाने

मधुमेह असलेल्या रूग्णांनी ऑलिव्हची पाने खाल्ल्यास त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. या पानांचा रक्तदाबाच्या रुग्णांनाही फायदा होतो. ऑलिव्हच्या पानांमधील अँटिऑक्सिडंट्स रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतात. तसे मधुमेह स्थिर ठेवण्यास मदत करतात.

Leaves For Diabetes
डार्क चॉकलेट खाल्ल्याने कर्करोगापासून होऊ शकतो बचाव, अभ्यासात स्पष्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.