वाढत्या वयात करिअरची निवड करणं हा प्रत्येक मुलासाठी असतो महत्त्‍वाचा निर्णय; मुलांमधील 'अशी' ओळखा क्षमता, स्वभाव गुण

आपल्या मुलाच्या अंतर्गत प्रेरणा समजावून घेऊन त्यांना मदत केली तर मुलांच्या भवितव्यासाठी चांगले ठरते.
Counselling News
Counselling Newsesakal
Updated on
Summary

मुलाच्या क्षमता, शक्‍तिस्‍थाने, कमकुवत स्थाने यांचा विचार महत्त्‍वाचा आहे. मुलात काय कौशल्ये आहेत, गुण कुठले आहेत, अवगुण कुठले आहेत, ही स्वभाव ओळख होणे गरजेचे असते.

-श्रुतिका कोतकुंडे, सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण

sajagclinic@gmail.com

रजत हा २३ वर्षांचा. तो माझ्याकडे समुपदेशनासाठी (Counselling) आला होता. त्याचा शैक्षणिक प्रवास थांबला होता. बारावीनंतर हुशार कवी मनाच्या रजतने वडिलांच्या आग्रहाखातर इंजिनिअरिंग निवडले; पण त्याला त्यात अजिबात रस वाटेना. प्रयत्न करूनही तो त्यात रमू शकला नाही. बरेच विषय मागे राहिल्यामुळे त्याला यंदा ड्रॉप लागला होता. त्याची खूप चिडचिड होत असे आणि त्याला स्वतःची लाज वाटू लागली होती. तो आता घरात स्वतःला कोंडून घेत असे, तासनतास मोबाईलवर असे. करिअरबद्दलच्या गोंधळामुळे तो नैराश्येच्या गर्तेत सापडला होता.

वाढत्या वयात करिअरची निवड करणे हा प्रत्येक मुलासाठी खूप महत्त्‍वाचा निर्णय असतो. यात पालक व शिक्षक महत्त्‍वाचे मार्गदर्शक ठरतात. ही निवड करताना पालकांनी जर आपल्या मुलाच्या अंतर्गत प्रेरणा समजावून घेऊन त्यांना मदत केली तर मुलांच्या भवितव्यासाठी चांगले ठरते; पण प्रत्यक्षात पालक स्वतःचा निर्णय मुलांवर लादताना दिसतात. यातून मुलांची कुचंबना होते व कुटुंबात ताण निर्माण होऊ शकतो.

Counselling News
Dizziness Symptoms : चक्कर येण्याची कोणती आहेत कारणे? यावर कसा करता येईल उपाय? जाणून घ्या..

दिवसाचा एक तृतीयांश वेळ ज्या कामासाठी आपण देणार असतो अशा संपूर्ण जीवनशैलीची निवड म्हणजेच करिअर. प्रवासाला निघताना जसे आपण पूर्ण नियोजन करतो. त्‍याचप्रमाणे कुठे जायचे? कसे जायचे? प्रवासासाठी किती वेळ लागणार? खर्च किती येणार? या प्रश्नांची जशी उत्तरे शोधतो त्याचप्रमाणे आपले करिअरही एक अत्यंत महत्त्‍वाचा आणि दीर्घ प्रवास समजावा. करियर निवडताना खालील महत्त्‍वाचे टप्पे समजून घ्यावेत.

मुलाला नेमका कशात रस आहे?

शालेय जीवनात विविध खेळ, कला, वक्तृत्व, सांघिक व वैयक्तिक उपक्रमांत मुलांनी भाग घेतल्याने त्यांना त्यांचा कल, स्वभाव आणि आवड समजण्यासाठी मदत होते. पालकांनी मुलाला विविध संधी देऊन त्याला कुठल्या गोष्टीत आनंद वाटतो. तसेच मुलाला कुठले काम करायला जास्त आवडते, याचे आकलन करावे. शाळेत आणि कॉलेजमध्‍ये कुठला विषय आवडतो यावरून आपल्या मुलाची आवड समजायला मदत होते.

Counselling News
Health Tips : कुमारवयीन मुलं व्यसन का करतात? काय आहेत कारणं? जाणून घ्या..

मुलामधील क्षमता ओळखा

मुलाच्या क्षमता, शक्‍तिस्‍थाने, कमकुवत स्थाने यांचा विचार महत्त्‍वाचा आहे. मुलात काय कौशल्ये आहेत, गुण कुठले आहेत, अवगुण कुठले आहेत, ही स्वभाव ओळख होणे गरजेचे असते. मुलाला लोकांमध्ये राहायला आवडते की, यंत्रांबरोबर राहायला आवडते की कलेमध्ये रस आहे हे प्रत्येक पालकाने जाणून घेणे जरुरीचे असते. कारण, या सर्वांचा नोकरींवर अथवा व्यवसायावर परिणाम होत असतो. यालाच हल्ली सामाजिक कौशल्ये, सोशल स्किल्स म्हणतात.

मुलाचा स्वभाव गुण कसा आहे?

आपण मुळात कुठल्या प्रकारचे व्यक्ती आहोत हे मुलांनी जाणून घ्यावे. यासाठी पालक, मित्र, शिक्षक मदत करू शकतात. मुलाने आपले सामाजिक गुण जाणून घ्यावेत. मुलाला एकटं राहायला आवडतं की समूहात, स्वभाव बोलका आहे की अबोल, त्याला बोलून छाप पाडायला आवडते की लोकांबद्दल तो बेफिकीर आहे, तसेच मुलात इतर चरित्रगुण कुठले? तो महत्त्‍वाकांक्षी आहे का? त्याला ताणाखाली काम करायला आवडते का? नवीन कल्पनेमुळे त्याला ऊर्जा वाटते की, मळलेल्या वाटेवरून त्याला जायला आवडते? या सर्व गुणांचा विचार करून करिअरची निवड करणे आवश्यक असते.

करिअर करण्यासाठी उपलब्ध साधने

कुठलेही करिअर करण्यासाठी आर्थिक परिस्थिती हवी तसेच बुद्धी व कुवत हवी. उदाहरण, मुलाला जर सर्जन बनायचं असेल तर त्याच्यामध्ये ती कुवत आहे का? मुलाला पोलिस व्हायचे असेल तर त्याच्यात ती शारीरिक क्षमता आहे का, हे जाणणे आवश्यक ठरते.

Counselling News
Health News : पौगांडावस्थेतील तीव्र मानसिक त्रास काय आहे? कुमारवयात उद्‌भवू शकतात 'हे' आजार

व्यवसाय मार्गदर्शनासह कार्यक्षेत्राची तोंडओळख :

या वळणावर एक खूप महत्त्‍वाची गोष्ट म्हणजे विविध नोकरी किंवा व्यवसायांची माहिती असणे. ही माहिती आपल्या शिक्षकांकडून, वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून, कुटुंबाकडून, मित्रमंडळीकडून, अधिकाऱ्यांकडून इंटरनेटवरून गोळा करता येते. या सर्व बाबींचा अभ्यास व माहिती जमा केल्यानंतर स्वभाव, कल आणी कुवतीप्रमाणे विविध करिअरचा प्राधान्यक्रम ठरवावा. या क्रमवारीमध्ये आवड, पूर्वानुभव, व्यक्तिमत्त्‍व, कुवत, काम करण्याची जिद्द तसेच हातोटी या सगळ्यांचा विचार करावा आणि मग किमान तीन विकल्प ठरवावेत. एकापेक्षा जास्त विकल्प असण्याचे कारण हल्लीची वाढती स्पर्धा. विकल्प ठरवताना घाई करू नये, वेळ घ्यावा.

विकल्प ठरल्यानंतर एकावेळी एकाच विकल्पावर लक्ष केंद्रित करावे. तसेच सातत्याने विविध क्षेत्रांची माहिती व संधीबद्दल सजग राहावे. हल्लीच्या स्पर्धेच्या जगात विकल्पांच्या लवचिकतेचे महत्त्‍व जाणावे व आपल्या विविध कलाकौशल्य व क्षमतांचा विकास करत राहावा. न जाणो, कुठल्या क्षमता व कौशल्यांचा कुठे उपयोग होऊ शकेल? रजतच्या नैराश्येवर उपचार झाल्यावर त्याने इंजिनिअरिंग सोडले व मराठीमधून बी.ए. पूर्ण केले. सध्या त्याने व त्याच्या मित्राने हस्तकलेसंदर्भात एक छोटा ऑनलाईन व्यवसाय सुरू केला आहे.

(लेखिका मनोविकार व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.