सर्दी, खोकल्याचा घरोघरी ताप; लहान बालकांना सर्वाधिक लागण

cough
cough
Updated on

नागपूर : सुमारे दीड वर्षापासून सुरू असलेले कोरोनाचे सावट अद्याप संपलेले नाही. असे असताना डेंगी, सर्दी, खोकल्याने नागरिक बेजार झाले आहेत. घरोघरी सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. लहान बालकांची याची सर्वाधिक लागण झाली आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली आहे.

वातावरणातील बदल, सकाळी पाऊस, दुपारी ऊन आणि रात्री उकाडा असे विचित्र वातावरण झाले आहे. जागोजागी पाणी साचले असल्याने डासांची संख्या वाढली आहे. त्यामुळे लहान मुले आजारी पडत असल्याचे बालरोगतज्ञांचे म्हणणे आहे. कोरोनाचे दुष्परिणाम सर्वांनीच अनुभवले आहे. त्यामुळे कोणी जोखीम घ्यायला तयार नाही. थेट डॉक्टरांकडे धाव घेत आहे.

cough
वीस वर्षांनंतर पहिल्याच पतीशी पुनर्विवाह; पत्नीने केला होता दुसरा विवाह

कोरोनाची तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनांसह राज्य कृती दलाच्यावतीने देण्यात आला आहे. कोरोनाच्या मागील दोन लाटांचा अनुभव पाहता तिसरी लाट लसीकरण अभावी बालकांना धोकादायक ठरेल, अशी भीती व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत काही दिवसांमध्ये थंडी, ताप या कारणांमुळे बाल रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

महिनाभरापासून रोजत पाऊस पडत आहे. ढगाळ वातावरण आणि सूर्यप्रकाशाचा अभाव असल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होते. परिणामी बालकांना थंडी, तापसह अन्य साथीचे आजार होत आहे. दिवसाकाठी १०० बालकांमध्ये २८ बालरुग्ण आढळत आहे. हे टाळण्यासाठी पालकांनी खबरदारी घ्यावी. पाणी उकळून प्यावे, गरम अन्न खावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

cough
रात्रीच्या अंधारात बोकड चोरला, कापला अन् मालकालाच विकला
ताप, कोरडा खोकला, घसा खवखवणे, धाप लागण ही सामान्य लक्षण असली तरी लहान मुलांमध्ये पोट बिघडणे, उलट्या होणे, डोकेदुखी, बेशुद्ध पडणे, सतत चिडचिड करणे अशी बदललेली लक्षण दिसू शकतात. अशावेळी उशीर न करता डॉक्टरकडून मुलांची तपासणी करून घ्या. गढूळ पाणी आणि डासांमुळे आजार वाढलेले आहेत. अन्नाकडे दुर्लक्ष करणे, त्यांनी खाणे कमी करणे हे कोरोनाचे लक्षण असू शकते. त्यामुळे जोखीम घेऊ नये.
- डॉ. अविनाश गावंडे, बालरोगतज्ज्ञ, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.