डोळस व्हा! स्क्रीन टाईमच्या वाढत्या युगात अशी घ्या डोळ्यांची काळजी

कोरोना काळात सर्वच कामासाठी मोबाइल, लॅपटॉपचा वापर वाढला
screen time
screen time
Updated on

गेल्या दोन वर्षात कोरोना काळापासून लोकं जास्तीत जास्त वेळ घरात आहे. ऑफिसचं काम, शाळा हे सगळं घरातूनच (Work From home) सुरू आहे. मनोरंजनासाठी (Entertainmen) सुद्धा घराचाच आधार होता. या काळात सर्व लोकांचा स्क्रीन टाईम वाढला. आपले जीवनच डिजिटल झाले. या डिजिटलच्या जगात घरातूनच सर्व काम चालत असल्याने लोकांना वेळेचे गणितच उरले नाही. भरपूर वेळ स्क्रीनवर जाऊ लागला. दैनंदिन जीवनात २४ तासापैकी १५ तासतरी लोकं सतत स्क्रीनवर घालवत आहेत. याचा साहजिकच डोळ्यांवर परिणाम झाला आहे. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जवळपास 23% भारतीय लोकसंख्येला साथीच्या आजारादरम्यान केलेल्या वर्क फ्रॉम होममुळे अनेकांना दृष्टीदोषाचा परिणाम झाला. परिणामी आरोग्यावर (Health) परिणाम झाला.

screen time
Weight Loss Tips: नाश्त्याला हे 5 पदार्थ खाऊ नका, वजन होईल कमी
work from home
work from home

घरातून काम करताना डोळ्यांना आराम कुठे?

घरातून-कामाचा वाढता वेळ हा डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वाधिक आहे. लॅपटॉप, मोबाईल फोन, टॅब्लेट, ई-रीडर आणि अगदी टिव्हीसह डिजिटल स्क्रीनवर आपण अधिकाधिक वेळ घालवतो, त्यामुळे डोळ्यांना या स्क्रीन्सच्या एक्सपोजरच्या वेळेत विपरित परिणाम होतात, असे व्हिजन आय सेंटरचे वैद्यकीय संचालक डॉ तुषार ग्रोव्हर यांनी सांगितले. वाढलेला स्क्रीन टाईम आणि त्यामुळे निर्माण झालेल्या डोळ्यांच्या समस्या ओळखण्यासाठी अनेक लक्षणे असू शकतात. डोळ्यावर आलेला ताण, अंधुक किंवा दोन गोष्टी दिसणे, डोकेदुखी, कोरडे डोळे, खांदेदुखी अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात. काहीवेळा झोपेच्या पद्धतीतही अडथळे येतात. तसेच एकाग्रतेत अडशळे येतात, असे तज्ज्ञ सांगतात.

screen time
आलेपाक खा, निरोगी राहा! जाणून घ्या १० फायदे

कंप्युटर व्हिजन सिंड्रोमची समस्या( Computer Vision Syndrome, the big eye problem)

जास्तीत जास्त वेळ स्क्रीनवर घालविल्यामुळे ‘कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम’ किंवा ‘डिजिटल आय स्ट्रेन’ या समस्या निर्माण होतात. आपल्याला डोळ्यांच्या हालचालींव्यतिरिक्त, संगणक किंवा इतर डिजिटल स्क्रीनवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि पुन्हा फोकस करण्यासाठी डोळ्यांच्या स्नायू आणि दृष्टी प्रणालीवर अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. जर स्क्रीनची चमक, कॉन्ट्रास्ट आणि फ्लिकरचा विचार केला तर ते आपल्या डोळ्यांसाठी अधिक कठीण होते. तसेच, जेव्हा तुम्ही स्क्रीनमध्ये मग्न असता, तेव्हा तुम्ही डोळे कमी मिचकावता. त्यामुळे परिणाम होऊन डोळे कोरडे होतात. चाळीशीतील लोकांना त्यांच्या नैसर्गिक लेन्स कमी लवचिक झाल्यामुळे अधिक परिश्रम करावे लागतात.

screen time
Weight Loss Tips: नाश्त्याला हे 5 पदार्थ खाऊ नका, वजन होईल कमी

चष्मा घालणाऱ्यांनाही येतात समस्या (Those wearing eyewear also have problems)

अ‍ॅड्रेस्ड किंवा अ‍ॅड्रेस्ड व्हिजन समस्या असलेल्या लोकांना काही स्पष्ट कारणांमुळे जास्त समस्या असू शकतात. तसेच, तर चष्मा घालणाऱ्यांनीही तितकीच काळजी घेणे गरेजचे आहे. अयोग्य जागी कंप्युटर ठेवल्याने उजेड नीट तीथवर पोहोचत नाही. त्यामुळे मग कॉम्पुटरचा प्रकाश वाढवावा लागतो. अशा गोंधळामुळे युजरला अनेकदा डोक्याचा विचित्र वापर करावा लागतो. परिणाम डोके तर दुखतेच. शिवाय पाठ आणि मान दुखते.

screen time
अपुऱ्या झोपेमुळे होतोय स्मरणशक्ती, प्रतिकारशक्तीवर परिणाम, अभ्यासात स्पष्ट

यावर उपाय काय? (What should do?)

यासाठी काही उपाय करता येतील. पहिलं म्हणजे, स्क्रीनचा वेळ कमी करण्यावर विचार करणे गरेजेचे आहे. दुसरे, संगणक किंवा इतर स्क्रीन पुरेशा प्रमाणात प्रकाश असलेल्या जागेत ठेवणे ही प्राथमिक गरज आहे. तिसरे म्हणजे पुरेसे अंतर. शक्यतो व्यक्ती आणि स्क्रीन यांच्यातील योग्य दृश्य कोन राखला गेला पाहिजे. चौथे, निळ्या किरणांना फिल्टर करणारे आणि अतिनील संरक्षणासह चष्मा आणि लेन्सचा आधार घ्यावा. पाचवे आणि महत्त्वाचे म्हणजे, 20-20-20 नियम पाळणे आवश्यक आहे, म्हणजे दर 20 मिनिटांनी स्क्रीन वापरणाऱ्या व्यक्तीने किमान वीस सेकंदांसाठी सुमारे 20 फूट स्क्रीनपासून दूर राहिले पाहिजे. यामुळे डोळ्यांना नियमितपणे आवश्यक विश्रांती मिळेल, असे तज्ज्ञ सांगतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()