तुमचा मास्क अपग्रेड करण्याची वेळ आलीय का

कोरोनानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात मोठे बदल झाले आहेत
mask
mask
Updated on

कोरोनानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात मोठे बदल झाले आहेत. लोकं आता घराबाहेर पडताना काही गोष्टींशिवाय पडेनासा झाले आहेत. आता घराबाहेर पडताना मास्क(Mask), सॅनिटायझर आणि फोन या तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या ठरतात. २०२२ मध्येही हीच स्थिती पाहायला मिळते आहे. पण आता नियमांमध्ये जरा शिथिलता आली असली तरी मास्क वापरणे अजून सुरूच आहे. पण आथा काही नियमांमध्ये बदल करणे गरजेचे आहे. त्यात मास्कविषयी बदल करणे गरेजेचे आहे. मास्क कसा घालायचा हे माहित असले तरी, कोणत्या प्रकारच्या वापरायचा हा वादाचा मुद्दा आहे. सध्या, बाजारात घरगुती कापडाच्या मास्कपासून ते ≥0.3 मायक्रॉनचे N95/FFP2 पर्यंतचे मास्क उपलब्ध आहेत. FFP2 S मास्क भारतीय मानक ब्युरो (BIS) ने प्रमाणित केले आहे. पण, N95/FFP2 S मास्कच्या तुलनेत प्रमाणित नसलेले मास्क किती परिणामकार आहेत याचा कधी विचार केला आहे का?

mask
महिन्यात ५ किलो वजन कमी करायचंय? हा घ्या डाएट प्लॅन
cotton masks
cotton masks sakal

कॉटन मास्क सुरक्षित आहेत का?- तुम्ही कॉटन मास्क वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. कारण, ACGIH ने केलेल्या अभ्यासानुसार, जर N95 मास्क (किंवा BIS प्रमाणित FFP2 मास्क) घातला तर, संक्रमित व्यक्ती आजूबाजूला असली तरीही आपण 25 तासांपर्यंत व्हायरसपासून सुरक्षित राहू शकतो. पण दर दोघांनी कापडाचे मास्क घातले तर 27 मिनिटांनी हे अंतर कमी होते.

mask
ऐकावं ते नवलं! बाजारात आलायं फक्त नाक झाकणारा मास्क
 N95 Mask
N95 Mask sakal

N95 मास्कविषयी - कोरोना सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी लोकांना N95 मास्कविषयी कळले. हे मास्क नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ (NIOSH), युनायटेड स्टेट्स फेडरल एजन्सीद्वारे प्रमाणित केले जातात. N95 मास्क किमान 95% हवेतील कण फिल्टर करतो. या N95 मास्कमध्ये 0.3 मायक्रॉन आकारापर्यंत व्हायरस आणि बॅक्टेरियाचे कण अडकवण्याची क्षमता आहे. आज दोन वर्षांनंतरही, हा मास्क नवीन प्रकारांविरूद्ध प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.

mask
मेडिकल मास्क वाढवतो चेहऱ्याचे आकर्षण, अभ्यासात स्पष्ट
Mask
MaskSakal

FFP2 S मास्क - N95 मास्क हे कोरोनाव्हायरस विरूद्ध संरक्षणासाठी अतिशय योग्य मानले जातात. पण या मास्कला दुसरा पर्याय म्हणजे FFP2 S मास्क. हे मास्क भारतीय मानक ब्युरो (BIS) ने प्रमाणित केले आहे. या मास्कमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिकली चार्ज केलेले मेल्ट-ब्लोन फिल्टर्स आहेत. ते संसर्गजन्य कणांना थांबवतात. त्यामुळे हे मास्कही परिणामकारक मानले जातात. हे मास्क हवेला मास्क फिल्टर न करता बाहेर जाऊ देतात. याचा अर्थ हा विषाणू संक्रमित (अगदी लक्षणे नसलेल्या) व्यक्तीपासून इतरांमध्ये पसरू शकतो. म्हणून, इतरांच्या सुरक्षिततेसाठी छिद्र नसलेले मास्क वापरणे चांगले असते.

mask
ओमिक्रॉन नंतर 'डेल्टाक्रॉन' वाढवणार चिंता? वाचा काय म्हणाले शास्त्रज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.