कोरोना काळात सेक्स लाईफ कसं असायला हवं?

corona couple
corona couple
Updated on

नवी दिल्ली- कोरोना काळ हा सर्वांसाठीच आव्हानाचा ठरला आहे. २०२० च्या सुरुवातीला सुरु झालेल्या या महामारीने सर्व जगाला एकप्रकारे वेढीस धरलं आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी किंवा तिसरी लाट आलीये. त्यामुळे कोरोनाचा धोका टळलेला नाही आणि पुढील काही काळ तो टळण्याची शक्यता नाही. अशावेळी कोरोना संसर्गपासून वाचण्यासाठी वैयक्तीक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यात मास्क लावणे, वारंवार हाथ धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे अशा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोरोना महामारीने लोकांच्या जीवनमानावरही प्रभाव टाकला आहे. विशेषत: आपल्या सेक्स लाईफवर कोरोना महामारीने अनेक निर्बंध आणले आहेत. महामारीच्या काळात शारीरिक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे. पण, सेक्स करताना दोन शरीर जवळ येणे अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत सेक्स करण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक बनले आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपल्या पार्टनरबाबत आपल्याला पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. विशेष करुन कॉलेजचे विद्यार्थी किंवा सिंगल असणाऱ्या व्यक्तींसाठी हे खूप महत्त्वाचे आहे. आपला पार्टनर कोण आहे, तो काय करतो, शिवाय तो कोणाच्या संपर्कात आला आहे का, याची माहिती ठेवणे फायद्याचे ठरु शकते. तज्ज्ञांकडून शक्यतो कोरोना काळात सेक्स न करण्याचा सल्ला दिला जातोय. विषाणूला दूर ठेवण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. असे असले तरी सेक्स करणे किंवा रिस्क घेणे वैयक्तिक निर्णय आहे. 

सेक्स करतेवेळी दोन्ही पार्टनरला कोरोना संसर्गाविषयी माहिती असणे आवश्यक आहे. शिवाय याबाबत आधी बोलूण घेणे, चर्चा करणे महत्त्वाचे ठरते. कॉलेजचे विद्यार्थी अनेकदा डेटिंग अॅपच्या माध्यमातून पार्टनरशी भेटतात. यावेळी त्यांना पार्टनरची नेमकी ओळख नसते. अनोळखी पार्टनरशी सेक्स केल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे कोरोनाकाळात अनोळखी व्यक्तींशी भेटणे टाळा. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पार्टनरशी संपर्क साधू शकता. किंवा सेक्ससाठी इतर पद्धतींचा वापर करु शकता.

कोरोना काळात सेक्ससाठी दुसऱ्या पार्टनरसोबत गुंतण्याऐवजी स्वत: हस्तमैथून करण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय अशावेळी तुम्ही सेक्स टॉईजचा वापर करु शकतात. सर्वांत महत्त्वाचं आहे तुमचे आरोग्य. तुमचे आरोग्य ठीक असेल, तर सर्वकाही चांगलं होईल. त्यामुळे या काळात दुसऱ्यांची संपर्क टाळा. कारण, हे केवळ तुमच्यापर्यंतच मर्यादीत नाही. याचा प्रभाव तुमच्या कुटुंबावरही पडू शकतो. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.