गर्भधारणेदरम्यान कोरोनाची लस घेतल्याने जन्माला आलेल्या बाळांचे संरक्षण करू शकतात. तसेच या बाळांना रूग्णालयातही दाखल करावे लागत नाही. यासंदर्भात युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका सरकारने केलेला अभ्यास मंगळवारी प्रसिद्ध झाला आहे. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (Centres for Disease Control and Prevention) संशोधकांनी याविषयी माहिती दिली, ते म्हणाले, गर्भधारणेदरम्यान (pregnancy) फायझर किंवा मॉडर्ना लसींचे (vaccine) दोन डोस घेतलेल्या महिलांच्या अर्भकांना होणारे संभाव्य फायदे दर्शविणारा असा हा पहिला अभ्यास (Study) आहे.
कोविड-19 लसींद्वारे विकसित प्रतिपिंडे नाळेद्वारे गर्भात हस्तांतरित होतात हे माहिती आहेच. पण जन्मानंतर त्याचा लहान मुलांवर कसा परिणाम होईल हे मात्र, अनिश्चित होते. याविषयी प्रसूती तज्ञ आणि CDC संशोधक डॉ. दाना मेनी डेलमन ( Dr Dana Meaney-Delman) म्हणाल्या की, या अभ्यासापर्यांत आमच्याकडे ऍन्टीबॉडीज या बाळाला कोविड -19 विरूद्ध संरक्षण देऊ शकतात, हे सांगणारा डेटा अद्याप उपलब्ध नाही.
असा केला अभ्यास
डेल्टा - ओमिक्रॉनचे रूग्ण वाढत असतानाच जुलै २०२१ ते जानेवारी २०२२ पर्यंत १७ राज्यांमधील २० रुग्णालयांमध्ये अर्भकांवर उपचार करून अभ्यास करण्यात आला. संशोधकांनी मुलांचा संसर्ग दर किती आहे ते तपासले नाही. तर, ६ महिन्यांखालील १७६ मुलांच्या डेटा त्यांनी पाहिला. कारण या मुलांना कोरोना आणि इतर २०३ आजारांसाठी रूग्णालयात दाखल केले होते. तसेच त्यांनी या मुलांच्या आईची लसीकरणाची स्थितीही पाहिली.
अभ्यासात काय आढळले?
कोरोना झालेल्या अर्भकांच्या आईचे लसीकरणाचे प्रमाण खूप कमी होते. त्यामुळे या मुलांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची टक्केवारी ३२ टक्के होती. पण लसीकरण झालेल्या आयांच्या मुलांना मात्र फायदा झाला. त्याची आकडेवारी १६ टक्के होती. म्हणूनच संशोधनाचे परिणाम हे गर्भवती महिलांना लसीकरण करण्याविषयी आग्रह धरतात, असे संशोधकांनी सांगितले. सीडीसी डेटानुसार, युनायटेड स्टेट्समधील सुमारे दोन तृतीयांश गर्भवती महिलांचे पूर्णपणे लसीकरण केले जाते. तर बहुतेक महिलांना गर्भधारणेपूर्वी शॉट्स मिळाले आहेत.
असे आहेत निष्कर्ष
गरोदरपणात फ्लू, खोकल्यावरील लसींसह इतर शॉट्स हे आई- अर्भकांचे संरक्षण करण्यासाठी दिले जातात तसेच ते त्यासाठीच ओळखले जातात. याविषयी एमोरी युनिव्हर्सिटीच्या डॉ. डेनिस जेमीसन(Dr Denise Jamieson) म्हणाले. लहान मुलांसाठी शॉट्सचा अभ्यास केला जात आहे, 6 महिन्यांपेक्षा लहान मुलांसाठी अद्याप कोणतीही लस नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.