Dehydration Symptoms: बहूतेक लोक (Water)हिवाळ्यामध्ये कमी पाणी पितात. त्यांना वाटते की, तहान लागली नाही म्हणजे शरीराला पाण्याची गरज नाही. पण असे आजिबात नाही. शरीरामध्ये पाण्याची गरज केवळ उन्हाळ्यामध्ये नव्हे तर हिवाळ्यामध्ये किंवा तहान लागल्यावर देखील होते. तुम्ही जर पाण्याचे सेवन कमी केले तर शरीरामध्ये पाण्याची कमतरता म्हणजे डिहाईड्रेशनमुळे (dehydration) कित्येक समस्या निर्माण होतात. पाणी आपल्या शरीराच्या आत होणाऱ्या सर्व जैव-रासायनिक प्रक्रियांचे माध्यम म्हणून काम करते. त्यामुळे त्याची प्रक्रिया कमीमुळे आपल्या जीवन-प्रक्रिया बाधित होऊ शकतात. पाणी केवळ आपल्या आरोग्यासाठी शरीरामध्ये ओलावा टिकूवन ठेवत नाही तर आपली पचनक्रिया आणि श्वसन प्रणाली देखील व्यवस्थित ठेवतो.
पाण्याची कमतरता झाल्यास शरीर आपल्याला संकेत देत असतो. त्यामुळे गरज असते त्यांना ओळखण्याची, ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण न झाल्यास डिहाड्रएशनच्या गंभीर स्थितीपर्यंत पोहचू शकतो. शरीरात पाण्याची कमतरता आहे हे कोणत्या लक्षणांवरून दिसते, जाणून घेऊ या.
त्वचा कोरडी पडणे / रुक्ष होणे
शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाल्यास आपली त्वचा कोरडी पडून लागते, ओठोवर पापुद्रे दिसू लागतात ज्यामधून रक्तही येऊ शकते. तुमची कोमल-मुलायम त्वचा अचानक रुक्ष आणि खरबडीत होऊ लागते आणि त्यावर रॅशेज येतात किंवा खाज सुटटे. त्यामुळे ही लक्षण दिसल्यास समजून जा की शरीरामध्ये पाण्याची कमतरता आहे.
लघवी संबधीत त्रास
जर तुमच्या लघवीचा हलका पिवळा आणि पारदर्शी असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कोणतीही कमतरता नाही. लघवीचा रंग गडद पिवळा झाल्यास तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता आहे हे समजून जा. तसेच डिहायड्रेशनच्या स्थितीमध्ये लघवीची प्रमाण कमी होते आणि लघवी करताना आग होत असल्याचे जाणवू शकते.. ही सर्व लक्षण शरीरामध्ये पाण्याची कमतरता असल्याचे संकेत देतात.
तोंडातून दुर्गंधीची समस्या
शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाल्यामुळे तोंड आणि घसा कोरडा पडतो ज्यामुळे श्वास घेण्याच्या त्राससोबतच तोंडाला दुर्गंध येऊ शकतो. पाण्याच्या कमतरतेमुळे लाळ म्हणजे सलाईव्हा पर्याप्त प्रमाणात तयार होत नाही. जे तोंडाचा वासासाठी जबाबदार बॅक्टेरियाला निंयत्रित ठेवण्याचे काम करते. त्याशिवाय बॅक्टेरियाची संख्या तोंडामध्ये वाढू शकते आणि तोंडाचा घाण वास येऊ शकतो.
डिहायड्रेशनच्या स्थितीमध्ये पाणी पिण्यानंतर वारंवार तहान लागते कारण पाणी शरीरामध्ये साठून राहत नाही. यापासून सुटका मिळविण्यासाठी साधे पाण्याऐवजी लिंबू पाणी किंवा इेलक्ट्रॉल टाकून पाणी पिऊ शकता. तसेच डिहाड्रेशनच्या त्रासामुळे जास्त भूक लागल्याचे जाणवू शकते. पण अजून हे स्पष्ट होत नाही असे का होते पण हे सर्व लक्ष तुमच्या शरीरात पाण्याचे कमतरत ा असल्याचे दर्शवितात.
जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा आपल्या रक्ताचे एकूण प्रमाण कमी होते. ज्यामुळे रक्तदाबाची समस्या निर्माण होते. त्यामुळे घाबरल्यासारखे वाटणे किंवा डोकेदुखी होऊ शकते. तसेच पाण्याच्या कमतरतेमुळे झाल्यास प्रत्येक व्यक्ती आळस आणि थकवा असल्याचे जाणवते. कारण पाण्याच्या कमतरतेमुळे मेटाबोलिज्मवर परिणाम होऊ शकतो जे शरीराणध्ये उर्जा निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे घाबरल्या सारखे होणे, डोके दूखी, किंवा थकवा हे लक्षण पाण्याच्या कमतरतेचे आहे.
पाण्याच्या कमतरतेमुळे रक्तामचे प्रमाण देखील कमी होते त्यामुळे सर्वांगाला पुरेसे रक्त पंप करण्यासाठी ह्रदयाला जास्त मेहनत करावी लागते त्यामुळे त्याच्यावर ताण येऊ शकतो आणि अतिरिक्त ताणामुळे ह्रदयावर भार वाढतो आणि ठोके व श्वासाची गती वेग वाढतो. त्यामुळे असे काही लक्षण दिल्यास सावध रहा, हे शरीरामध्ये पाण्याच्या कमतरतेचे लक्षण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.