भारतात डेल्टा सगळ्यात प्रभावी स्ट्रेन बनला आहे. तर युकेमध्ये डेल्टाक्रोन नावाचा नवा व्हॅरियंच पसरतो आहे. कोरोनाचा हा प्रकार अधिक धोकादायक असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.
कोरोना महामारीला दोन वर्ष होत आहेत. भारतात दुसऱ्या लाटेवेळी डेल्टा विषाणू खूप मोठ्या प्रमाणात पसरला होता. आता डेल्टाला मागे सारून ओमिक्रॉन(Omicron) जास्त वेगाने पसरणारा विषाणू बनला आहे. देशभरात जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवलेल्या ९५ टक्क्यांपेक्षा जास्त नमुन्यांमध्ये ओमिक्रॉनचे प्रकार आढळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. पण, त्याच वेळी, शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की कोविडचे (Corona) पुढील प्रकार अधिक धोकादायक असू शकतात. WHO ने सांगितले आहे की ओमिक्रॉनपेक्षा अधिक वेगाने पसरणारे नवीन विषाणू येऊ शकतात. यादरम्यान युकेमधून एक नवीन प्रकार मिळाल्याची बातमी आहे. डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या मिश्रणातून तयार झालेला 'डेल्टाक्रॉन' हा विषाणूचे संकट ओढावू शकते. हा विषाणू प्रयोगशाळेतील त्रुटीमुळे निर्माण झालेला प्रकार समजले जायचे. पण आता त्याच्या केसेसमुळे तणाव आणखी वाढला आहे. (Deltacron: Corona New Variant Updates)
भारतात डेल्टापेक्षा ओमिक्रॉन वरचढ
जीनोमिक्सवरील कंसोर्टियमनुसार (INSACOG) फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत घेतलेल्या ९५ टक्क्यांपेक्षा जास्त नमुनांच्या जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये ओमिक्रॉन प्रकार आढळलेला आहे. तज्ज्ञांच्या मते, डेल्टा हा प्रकार पसरत असताना, ओमिक्रॉन एकाचवेळी देशभर पसरला. INSACOG ने जानेवारीमध्ये सांगितले की, भारतातील ओमिक्रॉन हा संक्रमणाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. पण आकडेवारी पाहिल्यास महाराष्ट्रात ओमिक्रॉनची रुग्णसंख्या जास्त होती.
नव्या विषाणूबाबात वैज्ञानिकांचा इशारा
कोरोनाचा पुढचा प्रकार हा ओमिक्रॉनपेक्षा जास्त धोकादायक असू शकतो, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. अनेक देशात रूग्णसंख्या घटल्याने निर्बंध हटवले आहे. एडिनबर्ग युनिव्हर्सिटीचे फ्रोफेसर मार्क वूलहाऊस म्हणाले की, कोरोनाचा पुढचा प्रकार कुठल्या देशातून येईल हे आता सांगणे अवघड आहे. ओमिक्रॉन डेल्टामुळे आलेला नाही, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. हे व्हायरल कोरोनाच्या शृंखलेतील पूर्णपणे वेगवेगळ्या भागातून आले आहेत. त्यामुळे पुढचा प्रकारही कुठून येईल याची आपल्याला माहितीच नसल्यामुळे तो किती धोकादायक आहे किंवा नाही याचीही आपल्याला माहिती नाही. तर, वॉरविक युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक लॉरेन्स यंग हे वूलहाऊस यांच्या मताशी सहमत आहेत. यंग म्हणाले, 'लोकांना वाटतंय की कोरोना व्हायरस अल्फा ते बीटा, नंतर डेटा आणि नंतर ओमिक्रॉनमध्ये विकसित झाला आहे. पणं असं नाही. व्हायरसची रूपे कमी धोक्याची असतील, असे म्हणणे चुकीचे आहे. नवीन प्रकार अधिक धोकादायक असू शकतो.
डेल्टाक्रॉन प्रकार कसा आहे?
युनायटेड किंग्डममध्ये डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या मिश्रणातून तयार झालेला 'डेल्टाक्रॉन' ची प्रकरणे आढळली आहेत. यात सुरूवातीला लॅब टेस्टमध्ये चूक झाल्याचे समजले होते. मात्र आता या नव्या स्ट्रेनबाबात खुलासा झाला आहे. आतापर्यंत युकेमधील अधिकाऱ्यांनी त्याचा संसर्ग आणि लसीवरील परिणामांबाबत काहीही सांगितलेले नाही.
एक्सपर्ट्स काय सांगतात जाणून घ्या
सेंटर ऑफ एडव्हान्स रिसर्ज इन वायरोलॉजीचे माजी संचालक विषाणूशास्त्रज्ञ टी. जेकब जॉन यांच्या मते, याबद्दल अत्ताच अंदाज बांधणे कठीण आहे. तसेच ओमिक्रॉनपेक्षा संसर्गजन्य आणि डेल्टा पेक्षा अधिक धोकादायक असा दुसरा प्रकार समोर येण्याची शक्यता कमी आहे. पण ज्याप्रमाणे ओमिक्रॉनच्या वाढीमुळे आम्हाला आश्चर्य वाटले त्याचप्रमाणे हा प्रकार आपल्याला पुन्हा आश्चर्यचकित करू शकतो.
दिल्लीच्या फाऊंडेशन फॉर पीपल-सेंट्रिक हेल्थ सिस्टीमचे कार्यकारी संचालक डॉ चंद्रकांत लहरिया म्हणाले की, कोरोना भारतात स्थानिक पातळीवर प्रवेश करतोय का हे सामान्य लोकांच्या दृष्टीकोनातून बघण्याासाठी त्याची प्रासंगिकता मर्यादित आहे. लोकांना जोखीम घेत व्हायरससह जगणे शिकून घ्यावे लागेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.