Dental Care : दात चांगले ठेवायचेत तर हिरड्या जपा! अशी घ्या काळजी

पायोरिया किंवा पेरियडॉन्टायटीस हा हिरड्यांचा गंभीर आजार आहे
dental care
dental caresakal
Updated on

दात हे आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. दात स्वच्छ राहावेत यासाठी दोनदा ब्रश करण्याचा सल्ला डॉक्टर (Doctor) देतात. शिवाय आपण खाऊन झाल्यावर नियमित चूळ भरणे गरजेचे असते. पण फक्त दोनदा ब्रश करूनही दातांना (Teeth) काही समस्या यायला लागतात. जेवता जेवता एखादवेळी अचानक दात दुखायला लागतात. आपण दुर्लक्ष करतो. मग असं लक्षात येतं की आपला दात हलतोय. असं का होतंय ते कळत नाही. पण आपण रोजच्या धावपळीत याकडे फारसं लक्ष देतोच असं नाही. त्यानंतर एकेदिवशी हा दात पडतो तेव्हा एकदम धक्काच बसतो. दुखणं थांबलेला हा दात असा अचानक कसा पडला. आपण दंतवैद्यांकडे जातो. तेव्हा आपल्याला या समस्येचं कारण कळतं.

dental care
ऐकावं ते नवलच! १० वर्षांच्या मुलाच्या तोंडात होते ५० दात! डॉक्टरही हैराण

पायोरियाची समस्या

पायोरिया किंवा पेरियडॉन्टायटीस हा हिरड्यांचा गंभीर आजार (Gum Disease)आहे. या आजाराची नीट माहिती नसल्याने उपचार काय घ्यावेत ते कळत नाहीत. अशावेळी दंतवैद्यांकडे गेल्यावर तुम्हाला नीट माहिती मिळते. आपण दात घासताना ते अनेकदा नीट घासले जात नाहीत, तसेच प्रत्येकवेळी खाल्ल्यावर योग्य प्रकारे खळखळून चुळ भरली जात नाही. त्यामुळे अनेक बॅक्टेरिया(Bacteria)हळूहळू दातांच्या आसपास जमा होऊ लागतात.खाल्लेल्या अन्नातून ते जास्त वाढतात. त्यामुळे तुमच्या हिरड्या आणि जबड्यांची हाडं खराब होतात. ही हाडं आणि पर्यायाने हिरड्या कमजोर होऊन दातांवर परिणाम होतो. त्याला पायोरिया म्हणतात. ही बाब वेळीच लक्षात आली नाही तर चांगले दात हलायला लागून पडतात. तर काहीवेळा दातावर काळा थर साचून अवस्था वाईट झाल्याने चांगले दात काढायला लागतात.

dental care
गोऱ्या लोकांना कर्करोग होण्याचा धोका जास्त, अभ्यासात स्पष्ट
gums problem
gums problem

पायोरियावर उपचार

डॉक्टर तुमची परिस्थिती पाहून ट्रीटमेंट सुरू करतात. दात आणि हिरड्यांची परिस्थिती बरी असली तरी नुसतं स्केलिंग, पॉलिशिंग पुरतं. पण हिरड्यांचा रंग लाल झाला असेल, सतत रक्त येत असेल तर मग काम आणखी करावं लागतं. खराब झालेल्या दातावरील प्लाक स्केलिंगच्या साहाय्याने काढले जातात. दात वाचणं किंवा त्याखाली असलेल्या हिरडीला जास्त त्रास असेल तर पर्यायाने हिरडीखाली जमा झालेला पू काढण्यासाठी छोटसं ऑपरेशन म्हणजे फ्लॅप सर्जरी करावी लागते. काहीवेळा डॉक्टर खराब झालेले हे दात काढून टाकतात. आणि उपचार करून त्या जागे खोटे दात लावतात. काही दाढांना अशावेळी रूट कॅनलही करावं लागतं. पण तुमच्या तोंडाची आणि हिरड्यांची परिस्थीती पाहून व्यक्तीपरत्वे डॉक्टर हा निर्णय घेतात.

dental care
मुलं जास्त वेळ TV पाहताहेत? समजावून सांगा या महत्त्वाच्या गोष्टी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.