शोध स्वत-चा: माझी डायरी, माझे रेझोल्युशन्स...

शोध स्वत-चा: माझी डायरी, माझे रेझोल्युशन्स...
Updated on

कोणत्याही गोष्टीची सुरुवात खूप महत्त्वाची असते. सुरुवातीला आपली ऊर्जा, मनोबल, इच्छाशक्ती, उत्साह भरून वाहत असतो, ही तीव्रता हळूहळू कमी होते आणि म्हणूनच मी कायम सर्वांना सांगते की, आपली स्वत-ची अशी डायरी असावी. लिहिण्याने आपल्या भावना व विचार यांना वाट मिळते. प्रतिबिंबात्मक लिखाणाने वैचारिक स्पष्टता येते, जी ध्येयनिश्चिती व ध्येयपूर्तीसाठी गरजेची आहे. अनेक लोकांना लिहिण्याची एलर्जी असते. सगळेच आपण डोक्यात ठेवू शकतो, असा भाबडा ओव्हर कॉन्फिडन्स तुमच्या प्रगतीच्या आड येऊ देऊ नका. पुण्याहून मुंबईला जायचे असल्यास नुसते मुक्कामाचे ठिकाण माहीत असून उपयोग नाही, तिथे पोहोचायला डोळे उघडे ठेवून, रस्त्यावर पूर्ण लक्ष ठेवावे लागते. तसेच, आपल्या उद्दिष्टांपासून आपण भरकटू नये आणि अडथळे आले तरी मार्ग काढून वाटेवर चालत राहू, यासाठी आपली डायरी व त्यात लिहिलेले रेझोल्युशन्स आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यात साथ देतात.

आता पाहूया लिहायचं काय?
आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास कसा होईल, असा विचार कायम असावा. व्यावसायिक, आर्थिक, वैयक्तिक, कौटुंबिक, कला, क्रीडा, नवीन काहीतरी शिकणे, सवयी, छंद, वाचन, प्रवास, आरोग्य आणि आंतरिक प्रगती, या सर्व पैलूंचा विचार झाल्यास या वर्षअखेरीस डायरीच्या याच पानाकडे पाहून आपण एकाच दिवसासारखे ३६५ दिवस न जगता, खरेच या वर्षाचे सोने केले आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध झाले, असे वाटेल. आपले आयुष्य पाण्याच्या प्रवाहासारखे असते. नदी जरी एकसंध वाहते आहे असे वाटले, तरी त्यातील पाण्याचा प्रत्येक थेंब स्वतंत्रपणे प्रवास करत असतो. प्रत्येक क्षणी मागील थेंब पुढील थेंबाची जागा घेतो. तसेच आपणही कणाकणाने बदलत असतो. आपल्या शरीरातील जवळजवळ दहा लाख पेशी दर सेकंदाला मरतात व नवीन तयार होऊन त्यांना पुनर्स्थित करतात. त्यामुळे आपण अक्षरश- रोज बदलत असतो. या बदलांमध्ये जागरूकता ठेवली तर व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो व आपली क्षमता उंचावत जाते. नाहीतर काही वर्षांनी अचानक जाग येते आणि मागे वळून पाहिल्यास ‘हे काय होऊन बसले,’ असे वाटू लागते. ‘‘मी नक्की काय साध्य केले,’’ असा प्रश्न नंतर पडायच्या आत, ‘‘मला साध्य करायचेय काय,’ यावर विचार आणि काम सुरू करा!

Resolutions don’t work unless you do!
नुसते लिहून उपयोग नाही, मोठ्या ध्येयांचे छोटे-छोटे भाग करून त्यांना पूर्ण करण्यासाठी टाइम लिमिट ठरवून घ्या. एका वर्षातील बारा महिने व त्या प्रत्येकातील चार आठवडे - अशा प्रमाणे यात काय साध्य करायचे ते निश्चित करून, ठरविलेल्या दोन ते चार गोष्टी रोज सातत्याने करा. ‘हे केल्याशिवाय मी झोपणार नाही,’ असे स्वत-ला ठणकावून सांगा. फेब्रुवारीपासून आपण ढिले पडणार नाही आणि पुन्हा प्रवाह पतितासारखे वाहत जाणार नाही, यासाठी आपल्या डायरीची साथ घ्या! तीन महिने एखादी गोष्ट सातत्याने केली तर ती रक्तात चांगली मुरते, अंगवळणी पडते, व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनते व तिची फलिते दृश्य स्वरूपात दिसू लागतात.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातु-श्री जिजाबाई या झोपण्यापूर्वी रोज स्वत-ची रोजनिशी लिहायच्या, अशी इतिहासात नोंद आहे. त्यामुळे शिवबांना घडवण्यात, शहाजी महाराजांना खंबीर साथ देण्यात व स्वराज्याचे अचूक नियोजन करण्यात त्या यशस्वी झाल्या. आपल्यापुढे एक स्त्री आयकॉन म्हणून त्या आजच्या काळातही सतत राहिल्या आहेत. ध्येयापर्यंत पोहोचण्यामध्ये यशस्वी झालेल्या अशा लोकांच्या अशा काही सवयी आपणही अवलंबल्या, तर त्या आपले जगणे आणखी सुंदर करतील. 

(लेखिका योगऊर्जा या संस्थेच्या संस्थापिका आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.