भिजवून ठेवलेला कणकीचा गोळा फ्रीजमध्ये ठेवताय, थांबा हे वाचाच मग...

do not put ball of wheat flour in freeze at night must read
do not put ball of wheat flour in freeze at night must read
Updated on

नागपूर : सध्याच्या धावपळीच्या काळात स्त्री तुम्हाला केवळ गृहिणीच्या भूमिकेत दिसत नाही. तर घर, कुटुंबासोबतच ती नोकरी किंवा स्वत:चा छोटा-मोठा व्यवसायही सांभाळत असते. आजच्या स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नोकरी करतात आणि संसारालाही हातभार लावतात. आपण आर्थिक स्थैर्यासाठी जीवाचा आटापिटा करून नोकरी, व्यवसाय करतो. दिवस-रात्र मेहनत करतो. परंतु हे करताना आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. आपली दिनचर्या एवढी व्यस्त असते की एखाद्या कामाला पुरेसा वेळ देणे आपल्याला शक्‍य होत नाही. मग आपण दोन्ही वेळचे काम एकवेळा करण्यावर भर देतो. परंतु हे करताना आपण किती धोका पत्करतोय याकडे दुर्लक्ष करतो. मग निर्माण होतात आरोग्याच्या समस्या... 

आपण निरोगी रहावे, असे प्रत्येकाला वाटते. परंतु घाईगडबडीत एखादे काम लवकर करण्याच्या नादात आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. सकाळी मुलांची शाळा, नवऱ्याचे ऑफिस आणि स्वत:लाही नोकरीवर जायचे असल्याने बऱ्याच महिला सकाळच्या स्वयंपाकाची तयारी रात्रीच करून ठेवतात. बऱ्याच जणी सकाळची कामे सोपी होण्यासाठी कणिक रात्रीच भिजवून फ्रीजमध्ये ठेवतात आणि सकाळी त्याच कणकेला मळून त्याच्या पोळ्या टाकतात. यामुळे वेळेची बचत तर नक्‍कीच होते, परंतु तुम्ही जे मळलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवत आहात ते पीठ जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवल्याने आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते. 

रात्रीचे शिल्लक राहिलेले काही पदार्थ आपण नेहमी फ्रीजमध्ये ठेवत असतो. असे बरेच पदार्थ आहेत की जे कितीही वेळ फ्रीजमध्ये ठेवले तरी त्यावर काही विपरीत परिणाम होत नाही. परंतु असेही पदार्थ आहेत जे फ्रीजमध्ये ठेवताच त्यावर प्रक्रिया होणे सुरू होते. असे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी अपायकारक ठरतात. 

फ्रीजमध्ये पीठ ठेवताना या चुका करू नका

भिजवून ठेवलेल्या कणकीचा गोळा फ्रीजमध्ये कधीही उघडा ठेवू नका. भिजलेला गोळा हवाबंद डब्यातच ठेवा. यामुळे कणीक काळी पडत नाही. काळे पडलेल्या पिठाच्या पोळ्या आरोग्यासाठी अपायकारक असतात. रात्री फ्रिजमध्ये ठेवलेल्या संपूर्ण पिठाच्या पोळ्या सकाळी नक्‍कीच करा पुन्हा रात्री तोच गोळा वापरण्याच्या नादात राहू नका, यामुळे आरोग्याच्या मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

या समस्यांचा करावा लागेल सामना 

कोणताही पदार्थ फ्रीजमध्ये जास्त काळ ठेवल्यास तो आंबण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे पीठ जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवू नका. शिवाय भिजलेल्या पिठात काही बॅक्‍टेरिया आणि हानिकारक रसायन तयार होतात. त्यामुळे पोळ्या लवकर खराब तर होतातच त्याचबरोबर आपल्याला पोटाच्या समस्या देखील उद्भवतात. फ्रीजमध्ये ठेवलेले पीठ जास्तीत जास्त 48 तासांपर्यंत वापरा. त्यापुढे जाऊन ते खराब होते. शिवाय शिळ्या पिठाच्या चपात्या तशा चवीला चांगल्या लागत नाही. आरोग्याच्या दृष्टीने त्या अपायकारकच असतात. 

ताजे मळलेले पीठ उत्तमच

तुम्हाला अगदीच शक्य होत नसेल तर रात्री भिजवून ठेवलेल्या पिठाच्या पोळ्या करा. परंतु तुम्ही आरोग्याबाबत सजग असाल आणि तुमच्याकडे वेळ असेल तर लगेच भिजवून केलेल्या पिठाच्या पोळ्याच चवीलाही उत्तम लागतील शिवाय आरोग्यही चांगले राहील. फ्रीजमधील पीठाच्या पोळ्या कडक येतात. लहानपणापासूनच तुमच्या कानावर एक शब्द पडला असेल की शिळे अन्न खाऊ नये. शिळे अन्न खाल्ल्याने विविध प्रकारचे आजार होतात. तसेच वारंवार खाणेही शरीरासाठी अपायकारक ठरू शकते. म्हणून थोडा उशीर झाला तरी चालेल, पण ताज्या मळलेल्या पिठाच्या पोळ्या बनवा. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()