Health Tips : हिरड्यांचा आजार म्हणजे नक्की काय? 'या' कारणामुळे होते दातांभोवतीच्या हाडांची झीज

आजच्या युगात पांढरेशुभ्र दात व सुंदर दंतपंक्ती कोणाला नकोत?
Gums Teeth
Gums Teethesakal
Updated on

डॉ. नेहा पाटील, रत्नागिरी

निरोगी हिरड्या (Gums) हा मजबूत दातांचा (Teeth) पाया आहे. आजच्या युगात पांढरेशुभ्र दात व सुंदर दंतपंक्ती कोणाला नकोत? इमारत उभारताना जसा त्याचा पाया भक्कम बनवणे गरजेचे आहे तसेच हिरड्या मजबूत असतील तर दात दीर्घकाळ टिकतील. हिरड्यांचा आजार म्हणजे नक्की काय? हिरड्यांचा आजार प्रामुख्याने दातांवर साचणाऱ्या पिवळ्या थरामुळे होतो. या जंतूच्या थराला प्लॅक्यू (Plaque) म्हणतात.

Gums Teeth
Hemorrhoids Symptoms : मूळव्याधीतही होमिओपॅथीचा सम्यक विचार; 'या' लोकांना ही व्याधी उद्भवण्याची शक्यता जास्त!

हे जंतू दाताभोवतीच्या हिरड्यांची व हाडांची झीज करतात. प्लॅक्यूचा थर ब्रश करताना पूर्णपणे न निघाल्यास त्याचे रूपांतर टळक, घट्ट व काळसर स्वरूपात होते. त्याला कॅलक्यूलस (Calculus) म्हणतात. प्लॅक्यू व कॅलक्युलस सतत दाताभोवती जमून हिरड्यांची पातळी घसरायला लागते. जेव्हा हा आजार हिरडीपुरती सीमित असतो तेव्हा त्याला गिनगिनिटिस म्हणतात; पण पुढे हा आजार पसरून दाताभोवतीच्या हाडाची झीज होते तेव्हा त्याला असं म्हणतात. साधारणपणे ३० ते ६० वयोगटात याचे प्रमाण जास्त आढळून येते.

हिरडीच्या आजाराची बरीच वेगवेगळी लक्षणे आहेत. जसं की हिरडीतून रक्त येणे, हिरडीला सूज येणे, पू येणे, तोंडाला दुर्गंधी येणे, हिरड्यांची झीज होणे, दात पुढे-मागे सरकणे, दातांमध्ये फट तयार होणे, दात हलणे आदी. दाताला कीड लागली की, दात दुखतो आणि रुग्ण त्वरित डेंटिस्टकडे जातो; पण हिरडीच्या आजारामध्ये दात सहसा दुखत नाहीत. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते; पण वेळीच लक्ष दिल्यास उपचारांना उत्तम प्रतिसाद मिळतो आणि योग्य वेळेत उपचार न घेतल्यास दात हळूहळू पडून जातात. हिरडीच्या आजाराचे प्लॅक्यू व कॅलक्युलस जमणे हे मुख्य कारण आहेच; पण या व्यतिरिक्त अनेक कारणे आहेत.

Gums Teeth
Health Tips : साथीच्या रोगाप्रमाणे वाढतोय हाडांचा ठिसुळपणा; दगडासारखी हाडं होताहेत काचांसारखी नाजूक

जसं की, दात घासण्यासाठी टूथ पावडर वापरणे, चुकीच्या पद्धतीने ब्रश करणे, दातांमध्ये टूथपिक वापरणे, तंबाखू-गुटखा याचे सेवन करणे, ताण घेणे, अनुवंशिकता, वेगवेगळे आजार जसं की आर्थराइटिस, मधुमेह, कॅन्सर, हृदयरोग, काही जीवनसत्त्वांची कमतरता, महिलांमध्ये (Women) असणारे हार्मोनल इन्बॅलन्स आदी. मधुमेह होण्याचे प्रमाण तर आजच्या घडीला बरेच वाढलेले आहे. नवीन संशोधनातून सिद्ध झाले आहे की, मधुमेह आणि हिरडीचा आजार यांचा परस्पर संबंध आहे. मधुमेह असल्याने जसा हिरडीचा आजार बळावू शकतो. तसेच विनाउपचारित हिरडीचा आजार प्रदीर्घ काळ राहिल्यास अशा रुग्णास मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

हिरडीचा विकार वाढत राहिल्यास मधुमेहाप्रमाणे हार्टअॅटॅक, स्ट्रोक किंवा गरोदर स्त्रियांमध्ये बाळ कमी दिवसाचे होण्याची शक्यता वाढते. गिनगिनिटिस आणि पीरीओदोंटीटीससाठी विविध उपचारपद्धती उपलब्ध आहेत. दात हिरड्या स्वच्छ करणे (scaling), काही ठरावीक दातांच्या हिरड्या खराब झाल्या असतील तर त्या ठिकाणी औषध ठेवणे, सगळ्याच दातांच्या हिरड्या खराब झाल्या असतील तर पीरीओदोंटल फ्लॅप शस्त्रक्रिया करता येतात. कृत्रिम हाडाची पावडर (bone graft), स्वतः रुग्णाच्या रक्तातील एक घटक (पीआरएफ) घालून दातासभोवती नवीन हाड व हिरडी तयार करण्याच्या प्रक्रियेस मदत करता येते.

पीओएफद्वारा हिरडीचे उपचार हे हिरडी उपचारशास्त्रातील एक आधुनिक शास्त्र आहे. या पद्धतीने अगदी सहजरित्या रुग्णांच्या हिरड्यांचे व हाडांचे उपचार करता येतात. अशाच या अत्याधुनिक सुविधांचा भाग म्हणजे लेसरद्वारे हिरड्यांचे उपचार हा सुद्धा आहे. विविध उपचारपद्धती उपलब्ध असल्या तरी रुग्ण तपासणी व जबड्याचा एक्स-रे याद्वारे रुग्णासाठी योग्य उपचार पद्धती ठरवली जाते.

Gums Teeth
Children's Health Tips : नाचू किती नाचू किती : मुलांमधील अति चंचलता

दातांचे आयुष्य हे पूर्णपणे हिरडीच्या स्वास्थ्यावर अवलंबून आहे. पडून गेलेले दात लावण्यासाठी बऱ्याच उपचारपद्धती आहेत; पण प्रत्येक पद्धतीचे फायदे व तोटे आहेत. त्यामुळे नैसर्गिकरीत्या मिळालेले दात टिकवून ठेवणे हे नेहमीच फायद्याचे ठरेल. त्यासाठी लागणारी सुरुवात आपण स्वतः करू शकतो. योग्य ब्रश वापरणे, योग्य पद्धतीने ब्रश करणे, टूथपिकचा वापर न करणे, सकस आहार घेणे, कमी ताण घेणे, दर सहा महिन्यांनी दंत तपासणी करून घेणे आवश्यक आहे. हिरड्यांच्या उपचारपद्धतीने दातांचे आयुष्य वाढवता येते त्यामुळे दातांच्या व हिरडीच्या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष न करणे गरजेचे आहे. ‘स्वच्छता नांदे ज्याच्या मुखी तो सदासर्वदा सुखी.’

(लेखिका स्वस्तिक हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दंतविकार व हिरडी शल्यचिकित्सक तज्ज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.