हेल्दी डाएट : आहारात सप्लिमेंट्सची गरज किती?

ऊर्जा पातळी, झोपेची गुणवत्ता सुधारणे आणि वर्कआउट्सनंतर स्नायू दुखणे कमी करण्यासाठी मदत करण्याव्यतिरिक्त, बरेच लोक मानसिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी देखील सप्लिमेंट्स वापरतात.
Food Suppliment
Food SupplimentSakal
Updated on
Summary

ऊर्जा पातळी, झोपेची गुणवत्ता सुधारणे आणि वर्कआउट्सनंतर स्नायू दुखणे कमी करण्यासाठी मदत करण्याव्यतिरिक्त, बरेच लोक मानसिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी देखील सप्लिमेंट्स वापरतात.

- डॉ. रोहिणी पाटील

सप्लिमेंट्स हा फिटनेसच्या जगात एक चर्चेचा विषय आहे, पण तुम्हाला त्यांची खरोखर गरज आहे का?

थोडक्यात ‘नाही’. मात्र, तुम्हाला तुमच्या वर्कआउटमधून जास्तीत जास्त फायदा घ्यायचा असेल आणि तुमच्याकडे नवीन व्यायामाचा प्रयोग करण्यासाठी वेळ नसेल, तर काही प्रमाणात सप्लिमेंट्सचा वापर करणे मदत करू शकते. तुम्ही पुरेसा आहार घेत नसाल किंवा खाल्लेले अन्न चांगल्या पद्धतीने शरीराद्वारे शोषून घेतले जात नसेल, तेव्हा तुमच्या शरीराला पोषक तत्त्वे पुरवण्यासाठी सप्लिमेंट्सची मदत होते. त्यामध्ये आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात आवश्यक असलेली, परंतु नैसर्गिकरित्या पुरेसे मिळत नसलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.

ऊर्जा पातळी, झोपेची गुणवत्ता सुधारणे आणि वर्कआउट्सनंतर स्नायू दुखणे कमी करण्यासाठी मदत करण्याव्यतिरिक्त, बरेच लोक मानसिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी देखील सप्लिमेंट्स वापरतात - जसे की सतर्कता किंवा एकाग्रता वाढवणे. परंतु हे फायदे अद्याप सिद्ध झालेले नाहीत आणि यासह काही विपरीत परिणाम देखील होऊ शकतात.

सप्लिमेंट्स तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा आणू शकतात, परंतु ते नेहमीच चांगले आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी किंवा रोग टाळण्यासाठी आवश्यक असतात असे नाही. सप्लिमेंट्स तुम्ही तुमच्या आहारासह कधीतरी घ्यावा त्याच्याऐवजी नाही. ते काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थिती असलेल्या किंवा कमी वजन असलेल्या, गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांद्वारे वापरले जाऊ शकतात. लक्षात ठेवण्याची सर्वांत महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की सप्लिमेंट्स तुम्ही नियमितपणे आणि सातत्याने घेत असाल, तरच ते काम करतात. तुम्ही ते घेणे थांबवल्यास, ते यापुढे तसेच कार्य करणार नाहीत.

पूरक आहारांच्या गरजचे संकेत

  • सतत थकवा जाणवणे

  • पौष्टिकतेची कमतरता

  • हार्मोनल असंतुलन

  • अचानक वजन वाढणे/ कमी होणे

टीप : आरोग्य सल्लागाराचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारची सप्लिमेंट्स सुरू करू नका. कोणत्याही माहितीशिवाय ते घेणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.