श्वेतप्रदर होमिओपॅथी शास्त्राद्वारे विचार करत असताना अन्य आरोग्य स्थानापेक्षा निराळ्या स्वरूपात केला जातो.
-डॉ. विश्वजित मानकर, रत्नागिरी
स्त्रियांमध्ये (Women) उद्भवणारा श्वेतप्रदर अर्थात अंगावरून पांढरे जाणे. निसर्ग मानवावर कधीही अचानक घाला घालत नाही. खूप आधी काही रोग लक्षणे आणि रोगचिन्हे या माध्यमाद्वारे भविष्यातील गंभीर आणि घातक रोगाची शक्यता निसर्ग दर्शवत असतो. सर्वसामान्य माणसांना या रोग लक्षणांची आणि रोगचिन्हांचे गांभीर्य अथवा भविष्यातील धोका समजत नाही आणि ते स्वाभाविकही आहे; परंतु उपचार करता डॉक्टरांना (Doctor) यांचे गांभीर्य समजणे आणि तशा प्रकारे विचार करणे अपेक्षित आहे.
होमिओपॅथी (Homeopathy) शास्त्राद्वारे उपचार करत असताना प्राथमिक अवस्थेत उद्भवलेले रोग लक्षणे आणि चिन्हे यांचे पर्याव सोन कशामध्ये होण्याची शक्यता आहे, याबाबत विचार करून सदर रोगलक्षणे आणि चिन्हांचा विचार करून औषधयोजना की, ज्याचा भविष्यातील धोक्याबाबत प्रतिबंधात्मक उपाय करणे शक्य आहे. इंग्रजीमध्ये यासाठी एक छोटीशी पण छान म्हण आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर.
श्वेतप्रदर होमिओपॅथी शास्त्राद्वारे विचार करत असताना अन्य आरोग्य स्थानापेक्षा निराळ्या स्वरूपात केला जातो. होमिओपॅथी शास्त्र या संदर्भामध्ये खूप खोल विचार करतो. यातील वेगळेपण म्हणजे काय याचा सर्वसामान्य वाचकांना कळेल, असा उहापोह आजच्या लेखात आपण करायचा आहे. उदा. श्वेतप्रदर आणि मासिक पाळी यांचा विचार करता पाळीपूर्वी, पाळीनंतर, पाळी मध्येच रात्रं-दिवसाच्या २४ तासाचा विचार करता कोणत्या प्रहरांमध्ये हा स्राव जास्त होतो.
(दिवसा, रात्री, सकाळी, संध्याकाळी) स्रावाचे स्वरूप या बाबतीमध्ये खूप सखोल विचार करावा लागतो. स्रावाचा रंग कसा आहे, पाण्यासारखा, अंड्यातील पांढऱ्या बलकासारखा, दुधासारखा (Milk) पांढरा, पिवळसर त्याचप्रमाणे स्राव घट्ट आहे की पातळ. या स्रावाचा स्पर्श त्वचेला झाला असता तो त्वचा खाणारा अर्थात जमणारा आहे का? स्रावामुळे योनी भागामध्ये खाज येते का? ही खाज कोणत्यावेळी असते? अशा सर्व लक्षणांचा साकल्याने विचार करून या व्यतिरिक्त रुग्णांमध्ये असणाऱ्या अन्य लक्षणांबरोबर सांगड घालून औषधयोजना करणे हे शुद्ध होमिओपॅथी तत्त्वप्रणालीला अपेक्षित आहे.
गर्भप्रतिबंधक उपाय म्हणून कॉपर टी वापरली जाते. सर्व स्त्रियांना ती सहन होते असे नाही. बऱ्याच स्त्रियांमध्ये श्वेतप्रदराचे कारण हे कॉपर टी असते. गर्भाशयामध्ये होणारे इन्फेक्शन की, जे स्वच्छतेचा अभाव, गुप्तरोगाचा प्रादुर्भाव या प्रकारे असू शकतात. भविष्यात होणाऱ्या गंभीर स्वरूपाची पूर्वसूचना या द्वारे होऊ शकते. उदा. फार काळ ही लक्षणे स्त्रीमध्ये राहिल्यास गर्भाशयाचा कर्करोग, स्त्री जनेंद्रियाजवळील अनेक प्रकारचे त्वचाविकार. गर्भाशयात होणारे गॅंग्रीनचे मुख्य लक्षण प्रकारचा प्रदर असतो गॅंग्रिनची शक्यता स्रावाच्या रंगावरून करणे शक्य असते.
कारण, बऱ्याचदा गर्भाशयाच्या गॅंग्रिनमध्ये उद्भवणारा प्रदर काळपट आणि दुर्गंधीयुक्त असतो. स्त्री जीवनामध्ये अत्यंत सामान्य वाटणारे हे रोग लक्षण आपल्या समाजामध्ये गांभीर्याने घेतले जात नाही; परंतु त्याच्या पर्यावसनाचा विचार डॉक्टरांनी खूप सखोलपणे करणे गरजेचे आहे. हा लेख हा केवळ होमिओपॅथीशास्त्र आणि या शास्त्राचा होमिओपॅथिक विचारइतकाच संक्षिप्त नसून, लोकशिक्षण या मुख्य हेतूने लिहिला गेला आहे.
(लेखक होमिओपॅथी डॉक्टर आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.