हिवाळ्यात आंघोळ करताना घ्या काळजी; उद्भवू शकतात त्वचारोगाच्या समस्या

यासाठी सात गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
Bath in winter
Bath in winteresakal
Updated on

रोज आंघोळ करणे (Bath) हे आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असते. यामुळे तुमचे शरीर स्वच्छ आणि निरोगी ठेवते. अंगावर साचलेली घाण, घाम, दुर्गंधी यापासून आराम मिळण्यासाठी आंघोळ करणे आवश्यक आहे. त्वचेवर चिकटलेले बॅक्टेरिया शरीरात शिरून तुम्हाला अनेक गंभीर आजार (Health Problem) होऊ शकतात. नियमित आंघोळ केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो. श्वसनाचे तंत्र सुधारते. मांसपेशी आणि हाडांनाही फायदा होतो. पण आंघोळ केल्याचे काही तोटेही आहेत. खरं तर आंघोळ करताना लोकं अनेक चुका करतात. त्या त्यांच्या लक्षातही येत नाहीत. आंघोळीतील या चुकांमुळे एक्जिमा, सोरायसिस, कोरडी त्वचा यांसारखे त्वचारोग होऊ शकतात. (Bathing Care In Winter)

Bath in winter
द्राक्ष, डाळिंबाच्या सेवनामुळे Cancer चा धोका कमी, संशोधनातून झाले स्पष्ट

मॉडर्न डर्मेटोलॉजीचे फाऊंडर आणि सह-संस्थापक डर्मेटोलॉजिस्ट डीन मेराझ रॉबिन्सन यांच्या मते, त्वचा (Skin) निरोगी ठेवण्यासाठी आंघोळ (Bath) करणे आवश्यक आहे, पण, बहुतेक लोक अंघोळ करताना त्वचा पूर्णपणे धुतात, खूप वेळ आंघोळ करतात आणि चुकीचा साबण वापरतात.या छोट्या चुका त्वचेसाठी चांगल्या नाहीत. असे केल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते. हिवाळा हा ऋतू आहे आणि या ऋतूत आजारांचा धोका जास्त असतो, त्यामुळे अंघोळ करताना काही चुका टाळाव्यात. (Bathing Care In Winter)

Bath in winter
पुरूषांनो, चाळीशीत फिट राहायचंय, अशी घ्या काळजी|Men's Health
आंघोळ
आंघोळesakal

त्वचेची काळजी आवश्यक (Bathing care)

आंघोळ ही चांगली सवय आहे. पण रोज आंघोळ करणे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. त्वचा खूप धुतल्याने त्यातून निरोगी तेल आणि बॅक्टेरिया निघून जातात. यामुळेच आंघोळीनंतर त्वचा कोरडी पडून खाज सुटू शकते. खराब बॅक्टेरिया क्रॅक झालेल्या त्वचेतून शरीरात प्रवेश करू शकतात.

चुकीचा साबण

बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा साबण चांगले बॅक्टेरिया नष्ट करू शकतो. यामुळे प्रतिजैविकांना प्रतिरोधक असलेल्या वाईट जीवाणूंना प्रवेश करण्याची संधी मिळू शकते. जर तुम्हाला एक्जिमा किंवा त्वचेची संवेदनशीलता असेल तर सुगंधी साबण वापरू नका. आंघोळीनंतर मॉइश्चरायझर वापरण्याचा प्रयत्न करा. (Bathing Care In Winter)

Bath in winter
हिवाळ्यात तुमच्या मुलांचे लसीकरण करणे का गरजेचे? जाणून घ्या
bathing woman
bathing womanesakal

गरम पाण्याने आंघोळ

थंडीत गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे बरं वाटतं. पण, गरम पाण्यामुळे तुमची त्वचा नैसर्गिक तेल काढून टाकते आणि ती कोरडी होऊन खाज सुटू शकते. जर तुम्हाला एक्जिमा किंवा सोरायसिस सारखे त्वचा रोग असतील तर 5 ते 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ अंघोळ करू नका.

स्क्रबर साफ न करणे

आंघोळीसाठी लूफा स्क्रबर चांगले असतात. पण त्यात जंतू चिकटण्याचा धोका जास्त असतो. तुम्ही तुमचा लूफा पाच मिनिटे ब्लीचमध्ये भिजवून स्वच्छ धुवा. याशिवाय दर दोन महिन्यांनी लूफा बदलणे गरजेचे आहे.

टॉवेल सारखा धुवू नका.

ओलसर टॉवेल्स हे जीवाणू, यीस्ट, मूस आणि विषाणूंचे उगमस्थान आहे. टॉवेल घाण झाल्यामुळे नखात बुरशी, खरुज, मुरूम होऊ शकतात. हे टाळण्यासाठी, आठवड्यातून एकदा तरी तुमचा टॉवेल धुवा . तो वापरण्यापूर्वी ते कोरडे असल्याची खात्री करा. (Bathing Care In Winter)

Bath in winter
Weight loss: व्यायाम न करता वजन कमी करायचयं? कसे ते वाचा
face skin
face skin

छोटे-मोटे घाव झाकणे

आंघोळ करताना किरकोळ जखमा कोरड्या ठेवण्यासाठी त्या झाकून ठेवणे चांगले नाही. जर तुम्हाला किरकोळ जखम झाली असेल तर पट्टी काढून टाका आणि ती दररोज साबण आणि कोमट पाण्याने स्वच्छ करणे चांगले असते. हे करण्यासाठी शॉवर खाली आंघोळ करता येईल. आंघोळ झाल्यानंतर नवीन पट्टी लावा. तसेच बाथरूमचा पंखा चालू ठेवा. शॉवर घेतल्यानंतर शॉवरचा पडदा स्वच्छ करण्यास विसरू नका.

लगेच मॉश्चरायझर लावू नका

आंघोळीनंतर लगेच त्वचेवर लोशन, क्रिम असे कोणतेही मॉश्चरायझर लावू नका. त्यामुळे तुमच्या त्वचेमध्ये ओलावा तसाच राहू शकतो. तेलकट त्वचेमुळे बॅक्टेरिया वाढू शकतात. जेव्हा तुमचे शरीर पूर्णपणे कोरडे असेल तेव्हाच आंघोळीनंतर त्यांचा वापर करा. (Bathing Care In Winter)

Bath in winter
कोरोना काळात फुफ्फुसांची घ्या काळजी, 'हे' ५ पदार्थ खाणे टाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.