पुरूषांनो, चाळीशीत फिट राहायचंय, अशी घ्या काळजी|Men's Health

काही करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे
MEN
MENESAKAL
Updated on
Summary

आजच्या धावपळीच्या जगात तसेच खराब लाईफस्टाइलमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेक पुरुष आजारांना बळी पडत आहेत. वाढत्या शारीरिक दुर्बलतेमुळे पुरुषांची चिंता वाढत आहे

चाळीशी जवळ आली की महिलांप्रमाणेच पुरूषांच्या तब्येतीवरही (Men's Health) परिणाम व्हायला लागतो. एकदम अॅक्टीव्ह असलेल्यांना अचानक थकवा (Stress) यायला लागतो, काहींचे केस गळतात. असे काहीना काही सुरू झाले की चाळीशी जवळ आल्याची जाणीव व्हायला लागते. पण सगळ्याच पुरूषांना या समस्या भेडसावतात असे नाही.

आजच्या धावपळीच्या जगात तसेच खराब लाईफस्टाइलमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेक पुरुष आजारांना बळी पडत आहेत. वाढत्या शारीरिक दुर्बलतेमुळे पुरुषांची चिंता वाढत आहे. यामुळे पुरूषांना निरनिराळी औषधे घ्यावी लागत आहेत. पण त्याने फायदा मिळण्यापेक्षा नुकसान होत आहे. पुरूषांच्या तब्येतीवर झालेल्या परिणामाचा त्यांच्या लैंगिक जीवनावरही प्रभाव पडत आहे. अशा परिस्थितीत, काही करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. तुम्ही काही घरगुती उपाय करून चाळीशीत तंदुरूस्त राहायचा विचार नक्की करू शकता.

MEN
महिलांनो, योनीतून दुर्गंधी येतेय,अशी घ्याल काळजी Vaginal Health

हे घरगुती उपाय करा ( Home Remedies For Male)

१) कॅल्शियम, फायबर, झिंक मॅग्नेशिअम आणि आयर्नने परिपूर्ण असणाऱे खजूर खाऊन पुरूष त्यांचा स्टॅमिना वाढवू शकतात. शारीरिकदृष्ट्या दुर्बल आणि बारीक लोकांसाठी खजूर खाणे फायदेशीर आहे. याशिवाय रोज सुका खजूर खाल्ल्याने तुमची पचनशक्ती चांगली राहते. तुम्ही दुधात खजूर घालून प्यायल्यास त्याचे आणखी चांगले परीणाम दिसतील.

MEN
वजन कमी करण्यासाठी इंटरव्हल वॉकिंग फायद्याचा! जाणून घ्या नवा प्रकार

२) मखाणा पुरूषांसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती असून त्यातील कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, मिनरल्स, फॅट्स, फॉस्फरस हे घटक तुम्हाला निरोगी ठेवतात. दररोज मखाणे खाल्ल्यास शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोनचे उत्पादन वाढते. त्यामुळे पुरूषांची शारीरिक कमजोरी बर्‍याच प्रमाणात कमी होण्यास मदत होते. मखाण्यात कॅलरी कमी प्रमाणात तर फायबरचे प्रमाण योग्य असते. त्यामुळे शरीराला भरपूर कॅल्शियम मिळते. शरीराला अनेक फायदे होत असल्याने पुरूषांनी नियमित मखाणे खाल्ले पाहिजेत.

३) दूध पिणे पुरूषांसाठीही फायद्याचे आहे. दररोज दुधाचे सेवन केल्यास स्टॅमिना वाढू शकतो. त्यामुळे शरीराला भरपूर ऊर्जाही मिळते.

MEN
अंजीर खा, वजन कमी करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()