नोकरी (Job) करणारे लोकं ऑफिसमधून घरी आले कि थोडसं खातात आणि मग सगळं आवरून साडेआठनंतर जेवतात (Meal). पण तुम्ही केव्हा आणि काय खाता यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते. पण तुम्ही जर रात्रीचे जेवण (Dinner)सातच्या आत घेतलेत तर तुमच्या आरोग्याला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. गेल्या अनेक वर्षांपासून जगभरातील आहारतज्ज्ञ रात्री लवकर जेवण्याचा सल्ला देत आहेत. आपल्या शरीरात प्रत्यक्ष घड्याळ नसते. पण आंतरिक ऱ्हिदम असतो. त्यानुसार शरीराच्या कार्याचे वेळापत्रक बनते, त्याला सर्केडियन रिदम म्हणतात. ते शरीराला पर्यावरणातील बदल, झोप, पचन आणि खाण्याशी जुळवून घेण्यास मदत करते. म्हणून तुमच्या जेवणाच्या वेळेचा तुमच्या शरीराचे वजन, चयापचय, हृदयाचे आरोग्य आणि झोपेच्या चक्रावरही परिणाम करते.
वजन कमी करणे (weight loss)
संध्याकाळी ६ ते ७ च्या दरम्यान जेवणाचा (Meal) सल्ला आहारतज्ज्ञ देतात. त्यामुळे तुम्ही तीव्रपणे कॅलरीज कमी करू शकता. या वेळेत जेवल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी नाश्ता करता. त्यामुळे जो दिर्घ वेळ जातो त्याने तुमची चरबी कमी होण्यास मदत होते. याविषयी क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. रुपाली दत्ता म्हणतात की, रात्री लवकर जेवणे पचनासाठी चांगले असते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. कारण आपण जितक्या उशीरा खातो तितके अन्न आतड्यांमध्ये अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे पचनावर परिणाम होतो. हे सगळं बघता वजन कमी करायचे असेल तर लवकर जेवणे चांगलेच.
चांगली झोप लागते (good sleep)
जेवल्यावर लगेच झोपल्याने (Sleep) छातीत जळजळ, अपचनाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे झोप लागणे कठीण होते. रात्री उशीरा जेवल्याने तुमचे शरीर हाय अॅलर्ट स्थितीत येते. त्यामुळे सर्कॅडियन लयीवर मोठा परिणाम होतो. तसेच शरीराची शक्ती कमी होते. पण जर तुम्ही लवकर जेवलात तर ते पचतेही चांगले, तुम्ही निवांत झोपू शकता आणि उत्साहाने दुसऱ्या दिवशी उठू शकता.
हृदय उत्तम राहील ( Better Heart Health)
आहारतज्ज्ञ मेहर राजपूत सांगतात की, तुम्हाला मधुमेह, पीसीओडी आणि हृदयसंदर्भात समस्या असतील तर त्यांनी लवकर जेवणे अतिशय गरजेचे आहे. आपण भारतीय लोक रात्री जेवताना वरण, पापड, भाज्यांपासून मासाहारापर्यंत सोडियम युक्त आहार घेतो. या पदार्थांत मीठ जास्त असते. जर हे पदार्थ आपण रात्री जास्त प्रमाणात खाल्ले तर शरिरात पाणी टिकून राहते. त्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. लवकर खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार दूर राहण्यात मदत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.