आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची आधीही सवय होतीच; पण कोरोनामुळे इतर सगळ्याच क्षेत्रांतल्या लोकांना याची सवय करून घ्यावी लागली. आता कार्यालये व्यवस्थित सुरू झाली असली, तरी भविष्यातही ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचा कल वाढू शकतो. शिवाय, स्वतःचा काही उद्योग वगैरे सुरू करायचा असेल, तर त्याचीही सुरुवात घरातूनच होते. म्हणूनच, ‘होम ऑफिस’चा विचार करायला हवा.
दिवसातले आठ-दहा तास आपण ऑफिसचे काम करत असतो. त्यामुळे जागा निवडताना काळजीपूर्वक निवडावी, तडजोड करू नये. घरातला कुठला तरी एखादा कोपरा पकडून टेबल मांडले, असे करू नये.
जागा निवडताना वायुविजन आणि प्रकाश दोन्ही व्यवस्थित आहे ना, याची खात्री करावी.
ऑफिस म्हटल्यावर काही किमान आवश्यक फर्निचर लागेलच. त्यामध्ये टेबल, खुर्ची, सामान ठेवण्यासाठी एखादे कपाट किंवा शेल्फ या गोष्टींची व्यवस्था करावी लागेल. बसायची जागा आरामदायी असावी.
बसायची जागा खिडकीपाशी असेल, तर अधिक उत्तम.
खुर्चीबरोबर एखाद्या फूटरेस्टचीही सोय करावी, म्हणजे फूटरेस्टवर पाय आरामात टेकवून काम करता येईल.
रोज लागणाऱ्या वस्तूंनीच टेबल सजविता येईल. स्टेशनरी ठेवण्यासाठी पेनस्टँड, कागद ठेवण्यासाठी एखादा ट्रे या गोष्टी टेबलावरच ठेवता येतील.
स्टेशनरी वगैरे लागत नसेल, केवळ लॅपटॉपवरूनच काम होत असेल, तर केबल ऑर्गनायझर्सचा वापर करावा. लॅपटॉपचा चार्जर, माऊस, की-बोर्ड यांच्या वायर्स, मोडेमची वायर अशा असंख्य वायर्समध्ये टेबल हरवून जाते. केबल ऑर्गनायझर्स वापरल्यामुळे वायर्स एकमेकांत अडकणार नाहीत आणि टेबलालाही प्रोफेशनल लुक येईल.
टेबलवर टेबललँपसाठी जागा करावी. रात्री उशिरापर्यंत काम करण्याची वेळ आली, तर टेबललँपमुळे काम सोपे होईल.
टेबलवर एखादी छोटीशी कुंडीही ठेवता येईल. काम करून कंटाळा आला, की हिरव्यागार झाडाकडे पाहून प्रसन्न वाटेल.
टेबलवर पाण्याचा एक कोस्टर, त्यावर पाण्याचा ग्लास आणि ग्लासवरही एक कोस्टर ठेवावा, छान दिसते. पाण्याची बाटली टेबलवर न ठेवता बाजूला ठेवावी.
टेबल कॅलेंडरचाही वापर करता येईल. अपॉइंटमेंट्स ठरविण्यासाठी, कामाचे नियोजन आखण्यासाठी प्लॅनरही टेबलवर ठेवता येईल.
वर दिलेल्या सगळ्याच गोष्टी एकदम टेबलवर ठेवू नयेत. गरजेनुसार आणि आवडीनुसार टेबल सजवावे.
ऑफिसमध्ये ठेवाल तशीच घरातील वर्कप्लेसही स्वच्छ, नीटनेटकी ठेवावी. नाहीतर घरचे ऑफिस आवरण्याचे आणखी एक अतिरिक्त ‘काम’ मागे लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.