भारतातील कोरोनाबाधितांची संख्या, पटकन संक्रमित होणार नवा ओमीक्रॉन व्हेरिअंट हे अभूतपूर्व वेगाने वाढत आहे. देशात रविवारपर्यंत आठवड्याला तिप्पटीने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत असून आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ आहे जी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिसली नव्हती. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, राज्य सरकराने नागरिकांना कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क वापरणे ,सामाजिक अंतर पाळणे आणि सार्वजनिक भेटी गाठी टाळण्याचे आवाहन केले आहे.
महामारीचा प्रथम उदय झाल्यापासून जवळजवळ दोन वर्षे पूर्ण झाल्यापासून त्याच्याबरोबर संक्रमणाच्या वाढत्या आणि घटत्या लाटा, लसीकरण मोहिमेचे पुनरुज्जीवन आणि काहीवेळा पूर्वीपेक्षा वाईट स्थिती निर्माण झाली. ''अशा परिस्थितीत साथीच्या रोगामुळे लोकांना कंटाळा येणे आणि ताण निर्माण होण्याची दाट शक्यता असते. कोरोना महामारीचा कंटाळा म्हणजे साथीच्या रोगाशी संबंधित सुचित केलेल्या खबरदारी आणि निर्बंधांमुळे वैतागल्याची स्थिती. अनेकदा दिर्घकाळ निर्बंधामुळे आणि वेगवेगळ्या अॅक्टिव्हीटमधील सहभाग कमी झाल्यामुळे परिणामी कंटाळवाणेपणा, नैराश्य, मन सुन्न होणे आणि इतर समस्या उद्भवतात. ''जर कोणी खबरदारीचे उपाय टाळल्यास रोगाचा संसर्ग होण्याचा धोका आहे''असे अहवालात नमूद केले आहे.
नागरिक कोरोना महामारीच्या काळात प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीच्या नियमांचे पालन करत नसून नवीन वर्षाचे स्वागत करत आहे. त्यामागील एक कारण कोरोना महामारीचा कंटाळा हे असू शकते. तज्ञांचे म्हणणे आहे की, इतर घटकांसह यामुळे कोरोना संक्रमणाची संख्या वाढू शकते.
जसजसे ओमिक्रॉन व्हेरिअंट निर्माण झाले, तसतसे हॉस्पिटलायझेशनचे दर कमी करणे आणि आजाराचे प्राणघातक स्वरूप यावर जास्त लक्ष केंद्रित केले गेले आहे. तथापि, भारताचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्यासह तज्ञांनी इशारा दिली आहे की, ''दक्षिण आफ्रिकेत प्रथम नोंदवले गेलेल्या व्हेरिअटचे संसर्गजन्य स्वरूप वैद्यकीय व्यवस्थेला वेठीस धरू शकते. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या वैद्यकीय पायाभूत सुविधांचा वेग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून 'ओमिक्रॉनच्या लाटेपासून बचाव व्हावा'.
गेल्या वर्षी एप्रिल आणि मे मध्ये जेव्हा भारताला कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला तेव्हा मास्क वापरण्यासह इतर कोरोना प्रादुर्भाव टाळण्याच्या खबरदारींच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याचे दिसून आले. पण रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे आणि लसीकरणाच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्यामुळे संक्रमणाचा दर काही महिन्यांत कमी झाला. परंतु ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे पुन्हा रुग्णसंख्या वाढत आहे आणि अधिकारी लोकांना त्यांच्या ‘Covid armour'म्हणजे कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबदारी घेण्याच्या सूचना देत आहेत.
कोरोना महामारी कंटाळा लक्षणे
पीडमॉन्टच्या एका अहवालानुसार, संसर्गजन्य रोग चिकित्सक ग्वेनेथ फ्रान्सिस यांनी महामारीमुळे आलेल्या कंटाळ्याची लक्षणे
मास्क वापरणे आणि सोशल डिस्टसिंग पालनामध्ये घट
तुम्ही मास्क न घातलेल्या एखाद्या व्यक्तीच्या जवळून गेल्यास चिंता वाटणे
पुरेशी झोप घेतल्यानंतरही थकवा जाणवणे
निरउत्साही किंवा काहीच न करावे वाटणे
प्रियजनांवर ओरडणे
उदासीनता आणि एकटेपणा जाणवणे
'डूमस्क्रॉलिंग' थांबवा, कंटाळा दूर करण्यासाठी तज्ज्ञांचे म्हणणे आहे
UCHealth च्या अहवालात असे नमूद केले आहे की, तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर किती वेळ घालवता हे मर्यादित करणे हा महामारीचा सामना करण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग आहे. एक मानसशास्त्रज्ञ जो साथीच्या आजारामुळे आलेला कंटाळा आणि परिणामांचा अभ्यास करणाऱ्या जस्टिन रॉस यांच्या मतानुसार, " 'डूमस्क्रॉलिंग किंवा नकारात्मक कथा टीव्ही किंवा सोशल मीडियावरील नकारात्मक गोष्टींकडे जाण्याचा कल असल्यामुळे भीती, अनिश्चितता, चिंता आणि कंटाळा वाढवतो."
नेहमी सक्रिय (Active) असणे अत्यंत फायदेशीर ठरणारी दुसरी पद्धत होती हे त्यांच्या अभ्यासातून समोर आले . “तुम्ही प्रयत्न करत राहिला तर तुम्हाला ते घडवून आणण्याचा मार्ग सापडेल. तुमच्या वेळापत्रकात व्यायाम आणि ध्यान करण्यासाठी वेळ देणे आणि तो वेळ काढण्यासाठी प्रयत्न केल्याने तुमच्या मानसिक आरोग्यामध्ये लक्षणीय फरक पडेल.
ग्वेनेथ फ्रान्सिस सांगतात की, जर तुम्हाला एकटेपणा वाटत असेल किंवा विलग केल्यासारखे वाटत असेल तर, कुटुंबातील समविचारी सदस्य किंवा समान खबरदारी घेणाऱ्या मित्रांच्या गटासह एक 'कोव्हीड बबल" तयार कर शकता. या 'बबल'ला "सोशल पॉड" किंवा "क्वारंमटीम' म्हणूनही ओळखले जाते. "क्वारंटीम" हा तुमच्या जवळच्या घराबाहेरील लोकांशी संवाद साधण्याचा एक सुरक्षित मार्ग असू शकतो.
"मानसिक आरोग्याचा त्रास जाणवत असेल तर आणि हे अंशतः सामाजिक संबंध तुटल्यामुळे होत आहे असेल, पण त्याचा आतल्या आत त्रास होत असेल तर याचा अर्थ असा होतो की महामारीचा कंटाळा येत आहे, " एमडी अॅना यॅप यांनी AMA मधील एका लेखात स्पष्ट केले की, ही एक पूर्णपणे सामान्य प्रतिक्रिया आहे आणि तुम्हाला मानसिक आरोग्यासाठी मदतीची गरज वाटत असेल तर नक्की घ्या "
"तुम्ही भावनिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिकदृष्ट्या थकला आहात. तुम्ही फक्त थकलेले आणि प्रेरणाहीन आहात," डॉ. कार्ल लॅम्बर्ट, एमडी AMA अहवालात म्हणतात. ''हा कंटाळा दूर करायचा असेल तर आशा बाळगा म्हणजे सुधारणा होईल,'' असे तज्ञ म्हणतात. "त्यामुळे लसीकरणाबाबत आत्ता जे काही सूरू आहे आणि इतर सर्व गोष्टींमुळे आशा निर्माण होत आहे ,ही आशा जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही काही करू शकता, तर हाच मार्ग आहे." असे त्यांनी स्पष्ट केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.