मधुमेहच काय इतर रोगही होतील दूर; मेथीचे दाणे आहे रामबाण औषध

मधुमेहच काय इतर रोगही होतील दूर; मेथीचे दाणे आहे रामबाण औषध
Updated on

नागपूर : मधुमेह (Diabetes) या आजाराला इंग्रजीमध्ये डायबेटिस असे म्हणतात. या आजाराने ग्रासलेले माणसं शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलीन तयार करू शकत नाही. तसेच शरीरात तयार झालेल्या इन्शुलीनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. दोन्ही प्रकारात पेशींमध्ये ग्लुकोज शोषण्याच्या क्रियेत अडथळा येतो. (Fenugreek seeds) मधुमेहाच्या रुग्णांमध्ये मूत्रविसर्जनास वारंवार जावे लागणे, थकवा, सतत तहान आणि भूक लागणे, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात. फिजिओथेरपिस्टकडे जाऊन वयानुसार किंवा जीवनशैली अनुसार व्यायामाचे प्रकार समजावून व्यायाम केला तर मधुमेह बऱ्याच प्रमाणात आटोक्यात ठेवला जाऊ शकतो. (Fenugreek-seeds-are-a-panacea-for-health)

मधुमेह हा आजार अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी केवळ वृद्ध व्यक्तींमध्ये हा आजार आढळून येत होता. मात्र, आता बदललेल्या जीवनशैलीमुळे सर्वच वयोगटात आढळून येत आहे. या आजारावर मेथीदाणे हे रामबाण औषध आहे. मेथीदाणे विविध आजारांवर कसे उपयोगी आहेत. मधुमेह हा दीर्घकालीन उपाय करावा लागणारा आजार आहे.

मधुमेहच काय इतर रोगही होतील दूर; मेथीचे दाणे आहे रामबाण औषध
वाघाचा थरार! एकाला मानेला पकडून नेले ओढत, तर दुसऱ्याला झाडावरून खेचले खाली

मुळात मधुमेह हा वयानुरूप येणारा आजार आहे. जसे माणसांचे सांधे थकतात, धावण्याची, काम करण्याची ताकद कमी होते, तशाच इन्श्युलीन बनवणाऱ्या बीटा पेशींची क्षमतादेखील मंदावत जाते. आपण आपल्या वागण्याने बीटा पेशींना वेळेआधीच म्हातारं करतो आणि मधुमेहाला निमंत्रण देतो. वय कमी करणं कुणाच्याच हातात नाही. त्यामुळे मधुमेह पूर्ण बरा होण्याची शक्यता निदान नजीकच्या भविष्यात तरी दिसत नाही.

इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते

मेथीच्या दाण्यात भरपूर फायबर आणि स्टेरॉइड असते. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना आवश्यक असलेल्या इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते. कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो. तसेच रोग प्रतिकारशक्तीतही वाढते. एक ग्राम मेथीदाण्यांची पावडर आणि सुंठ पावडरचे मिश्रण गरम पाण्यातून दिवसात दोन ते तीन वेळा घ्यावे. तसेच एक चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घेतल्यास अपचनाची समस्या दूर होते.

केसातील कोंडा होतो दूर

केसातील कोंडा दूर करण्यासाठी मेथीदाण्यांची पेस्ट डोक्याला लावा. अर्धा तासाने केस धुऊन सुती कापडाने कोरडे करा. यामुळे कोंडा दूर होण्यास मदत होईल. तसेच मेथीचे दाणे रात्रभर नारळाच्या गरम तेलात भिजवून ठेवा. सकाळी या तेलाने डोक्याला मसाज करा. यामुळे केसगळती कमी होईल.

मधुमेहच काय इतर रोगही होतील दूर; मेथीचे दाणे आहे रामबाण औषध
नातेवाईक आले एकाच्या अंत्यसंस्काराला आणि करून गेले तिघांवर; तीन तासांच्या फरकाने मृत्यू

बद्धकोष्ठता, अपचनाची समस्या होते नष्ट

संधिवाताचा त्रास असल्यास मेथी आणि सुंठ समान प्रमाणात घेऊन पावडर तयार करा. यानंतर गूळ टाकून हे चूर्ण खा. पोटात गॅस, छातीत कफ होणे या समस्या दूर करण्यासाठी दररोज ५ ग्रॅम मेथीचे चूर्ण सकाळ व सायंकाळी खावे. अर्धा चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घेतल्याने बद्धकोष्ठता, अपचनाची समस्या नष्ट होते.

महिलांसाठी लाभदायक

उच्चरक्तदाबाचा त्रास असल्यास अर्धा चमचा मेथीदाणे रात्रभर गरम पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठून हे पाणी प्या. तसेच भिजलेले मेथीदाणे चावून खा. तसेच नियमित सेवन केल्यास वजन कमी होते. हार्मोन संतुलित राहते. दररोज तीन ग्रॅम मेथीदाण्याचे सेवन महिलांसाठी लाभदायक ठरते.

(Fenugreek-seeds-are-a-panacea-for-health)

संकलन व संपादन - नीलेश डाखोरे

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.