फायब्रोमायल्जिया : रुग्ण हरवून बसतो स्वत:वरचे नियंत्रण

फायब्रोमायल्जिया : रुग्ण हरवून बसतो स्वत:वरचे नियंत्रण
Updated on

नागपूर : फायब्रोमायल्जिया नावाचा एक विकार आहे. हा विकार पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक प्रमाणात होतो. ३० ते ५० वयोगटातल्या महिलांना हा विकार जडण्याचा धोका जास्त असतो. ब्रिटनमधल्या एका संशोधनानुसार २५ पैकी एक व्यक्तीला हा विकार होऊ शकतो. ब्रिटनमध्ये १५ ते २० लाख लोकांना हा विकार झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. चला तर जाणून घेऊ या विकाराविषयी...

फिब्रोमायल्जिया ही एक तीव्र स्थिती आहे. ज्यामुळे स्नायू, कंडरा आणि सांध्यामध्ये वेदना, कडकपणा आणि कोमलता येते. ही लक्षणे सहसा अस्वस्थ झोप, तीव्र थकवा, चिंता, नैराश्य आणि आतड्यांसंबंधी कामात अडथळा येण्यासह असतात. औषधे आणि वैकल्पिक उपचारांमुळे लक्षणे कमी होण्यास मदत होते. फायब्रोमायल्जियाला कधीकधी फायब्रोमायल्जिया सिंड्रोम म्हणून ओळखले जाते.

फायब्रोमायल्जिया : रुग्ण हरवून बसतो स्वत:वरचे नियंत्रण
३ कोटी ३३ लाखांनी फसवणूक; कर बुडविणाऱ्याविरुद्ध गुन्हा

फायब्रोमायल्जियाची समस्या कोणत्याही वयात होऊ शकते. शारीरिक समस्यांसोबतच रुग्णाला मानसिक समस्याही जाणवतात. बऱ्याचदा त्याची लक्षणे साजत नाही. फायब्रोमायल्जिया या विकारात स्नायूंमध्ये प्रचंड वेदना जाणवतात. याच्या वेदनांमुळे माणूस अक्षरशः कळवळतो. आपल्या मानसिक स्थितीवर याचा परिणाम होतो.

या विकारामुळे मेंदूच्या कार्यपद्धतीवरही परिणाम होण्याची शक्यता असते. दुखापत, शस्त्रक्रिया, जंतुसंसर्ग आणि नैराश्यामुळेही ही व्याधी जडू शकते. या विकारात रुग्ण स्वत:वरचे नियंत्रण हरवून बसतो. त्यामुळे अत्यंत धोकादायक असा हा विकार आहे. ही व्याधी पूर्ण बरी होऊ शकत नसली तरी त्यावर औषधांद्वारे नियंत्रण मिळवता येते.

विकाराची लक्षणे

  • अशक्तपणा

  • थकवा

  • सततचे आजारपण

  • झोप न येणे

  • काळजी

  • नैराश्य

  • संवेदनशीलता वाढणे

  • शरीरात प्रचंड वेदना जाणवणे

  • दृष्टी अधू होणे

  • मळमळणे

  • अचानक वजन वाढणे

  • चक्कर येणे

  • सर्दी-खोकला

  • त्वचेशी संबंधित समस्या

  • श्‍वसनाशी संबंधित समस्या

फायब्रोमायल्जिया : रुग्ण हरवून बसतो स्वत:वरचे नियंत्रण
केशर खूप गुणकारी; जाणून घ्या त्याच्या लाभांविषयी...

उपचार

  • वेदना दूर करणारी औषध

  • दररोज ताकद वाढवण्यासाठी व्यायाम

  • झोप सुधारण्याची तंत्रे

  • योग किंवा ध्यानधारणा

  • ताण व्यवस्थापन

एकाग्रता होते नष्ट

हा विकार जडलेल्या लोकांना सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवतो. रात्रीची भरपूर झोप झाली असली तरी ताजतवान वाटत नाही. या विकारामुळे एकाग्रताही नष्ट होते. एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करू शकत नाही. या विकाराचा धोका अधिक असल्यामुळे महिलांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. प्रचंड शारीरिक वेदना आणि अपुरी झोप यामुळे दैनंदिन कामे करताना बऱ्याच अडचणी येतात.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()