एका महिन्यात पोटाची चरबी होणार कमी, जाणून घ्या या सोप्या टिप्स

खालील टिप्स पाळा आणि एका महिन्यात तुमची चरबी कमी होईल.
belly Fat
belly Fatsakal
Updated on

कोरोना काळात वर्क फ्रॉम होम असो की घरीच तासान्-तास आराम आणि बसत राहल्याने याचा दुष्परिणाम लोकांच्या आरोग्यावर दिसून आला. यात मुख्यत: लोकांचे वजन वाढले आहे. यात पोटाच्या चरबी वाढल्याचे प्रमाण अधिक आहे. पोटाची चरबी घालवण्यासाठी आपण डायटींग करतो. पण अनेकदा त्याचाही काहीही फायदा होत नाही मग चरबी कमी करण्यासाठी नेमकं काय करता येईल? काळजी करण्याचे कारण नाही. या खालील टिप्स पाळा आणि एका महिन्यात तुमची चरबी कमी होईल.

belly Fat
उन्हाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश

प्रोटीनयुक्त जेवण करावे- तुमच्या आहारात अधिकाधिक प्रथिनांचा (protein) समावेश करावा. जास्तीत जास्त भाज्या खाण्याचा प्रयत्न करावा.

थोडं- थोडं खावं - भरपूर जेवण्याची सवय असेल तर ही सवय सोडावी लागेल. आपला आहार 3 ते 4 भागांमध्ये वाटून घ्या. प्रत्येकावेळी पोटभर न जेवता थोड्या प्रमाणात खा. यामुळे तुमची पोटाची चरबी कमी होईल

गरम पाणी: पहाटे रिकाम्या पोटी गरम पाणी पिल्यास चरबी कमी होते. कारण गरम पानी पिल्याने कॅलरीज कमी होतात. याव्यतिरिक्त जर आपण गरम पाण्यात लिंबू आणि मधाचा समावेश केला तर तुम्हाला याचा अधिक फायदा होईल.

belly Fat
तणावग्रस्त आयुष्य तुम्ही जगताय, करा हे उपाय

व्यायाम करणे: व्यायाम करणे हे पोटातील चरबी कमी करण्यासाठी उत्तम उपाय आहे याने हळुवार फॅट्स कमी होतात आणि पचनतंत्र सुद्धा सुरळीत होते.

रात्री उशिरा जेवू नये: रात्री उशिरा जेवणे हे पोटातील चरबी वाढण्याचं प्रमुख कारण आहे. रात्री झोपण्याच्या 2 तासाआधी जेवून घ्यावं. किंवा रात्री काही हलका आहार घ्या. याव्यतिरिक्त जेवल्यानंतर शतपावली करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.