जगभरात ज्या शारीरिक (Health) आजारामुळे लोकांचे सर्वाधिक मृत्यू होतात त्यात कॅंसरमुळे (Cancer) मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. शास्त्रज्ञ त्याच्या आरोग्याच्या (Health) आत्याधुनिक उपचाराविषयी जाणून घेण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. त्याचे उपचार गुंतागुंतीचे आहेत तसेच, महागही आहेत. यामुळेच सर्व लोकांना त्यांची जीवनशैली (Lifestyle) आणि आहार (Food) योग्य ठेवण्याचा सल्ला दिला जातो. (Cancer Cure Fruits)
अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्च (AICR) च्या मते, कोणत्याही गोष्टीचे सेवन कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी (Cancer Care) पूर्णपणे योग्य असल्याचे अद्याप आढळलेले नाही, मात्र विशिष्ट पदार्थांचे सेवन करून तुम्ही कॅन्सरचा धोका कमी करू शकता. काही फळांमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी ही फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. अशाच काही फळांबद्दल जाणून घेऊया. (Cancer Cure Fruits)
संशोधक काय म्हणतात (What Researchers Say?)
एआयसीआर चे एक संशोधक डॉ. नवीद सालेह सांगतात की, संशोधनात (Reserch) असे दिसून आले आहे की, विविध प्रकारच्या भाज्या, फळे, धान्य, कडधान्य, आणि वनस्पतीवर आधारित खाद्यपदार्थांमुळे (Food) कर्करोगाचा धोका कमी करणारे गुणधर्म असू शकतात. प्रयोगशाळेत केलेल्या अभ्यासात असे आढळले आहे की, खनिजे, जीवनसत्त्वे आणि फायटोकेमिकल्स कर्करोगविरोधी गुणधर्मांनी समृद्ध असू शकतात. त्यामुळे ते खाल्ल्याने गंभीर रोगांचा धोका कमी होऊ शकतो. (Cancer Cure Fruits)
द्राक्षे खाल्ल्याने फायदे (Grapes Benefits For Health)
AICR नुसार, द्राक्षांमध्ये (Grapes) बायोएक्टिव्ह कंपाऊंड बर्गामोटिन असते. हे ज्याचा कर्करोग विरोधी गुणधर्मामुळे त्याला ओळखले जाते. इंटरनॅशनल जर्नल ऑफ मॉलिक्युलर सायन्सेसमध्ये प्रकाशित केलेल्या समिक्षेत, द्राक्षांमध्ये फ्युरानोकोमारिन्स असतात जे अँटी-ऑक्सिडेटिव्ह, अँटी-इंफ्लेमेटरी आणि कर्करोग विरोधी गुणधर्मांना प्रोत्साहन देऊ शकतात, असे स्पष्ट केले आहे.(Grapes Benefits For Health)
डाळिंब खा, आराम मिळवा (Pomegranate Benefits For Health)
हार्वर्ड येथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डाळिंब (Pomegranate) आरोग्य चांगले राखण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. क्वीवलेंड क्लिनिकने केलेल्या अभ्यासात वैज्ञानिकांनी सांगितले की, डाळींब हे तुमची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयोगी ठरते. त्याचबरोबर याव्यतिरिक्त, त्यात असलेल्या अँटीऑक्सिडंट्स प्रदूषण आणि सिगारेटच्या धूरामुळे शरीरात निर्माण त्रासापासून संरक्षण करण्यास मदत करतात. तसेच डीएनएचे नुकसान टाळते. (Pomegranate Benefits For Health)
ब्ल्यू बेरीतही अनेक गुणधर्म (BlueBerry Benefits For Health)
अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्च (AICR) नुसार, ब्लूबेरीमध्ये (BlueBerry)अनेक फायटोकेमिकल्स आणि पोषक तत्वे असतात. अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे की ब्लूबेरी खाल्ल्याने रक्तातील अँटिऑक्सिडंट्सची क्रिया वाढते, तसेच डीएनएचे नुकसान टाळण्याची क्षमता वाढते. अतिनील किरणोत्सर्गाच्या दीर्घकाळ संपर्कामुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढवतो, ब्लूबेरी त्यासाठी फायदेशीर असल्याचे आढळले आहे. (BlueBerry Benefits For Health)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.