आला पावसाळा... आरोग्य सांभाळा..! अशी घ्या काळजी

नागरिकांनी काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन
Rain
Rainesakal
Updated on

नामपूर (जि. नाशिक) : यंदा जून महिन्यापासूनच दमदार पावसाने हजेरी लावल्याने परिसरात आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळत आहे. परंतु, पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यात होणारे बदल, रोगट हवामान, मंदावलेली पचनशक्ती, डासांच्या उत्पत्तीत झालेली वाढ यामुळे अनेक साथीचे आजार बळावतात. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभाग व निमा संघटनेने केले आहे. (Latest marathi news)

Rain
मुलीच्या पाठीचा वाकला होता मणका अन् डॉक्टरांनी लावला 'दोरी'चा नवा कणा!

नागरिकांनी काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

डबके, पाणी साचण्याच्या जागेत डासांची उत्पत्ती होते. यामुळे नागरिकांनी परिसर स्वच्छता, कोरडा दिवस पाळणे आणि घराजवळ पाणी साचण्याच्या जागा नष्ट कराव्यात, जेणेकरून डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल महाजन यांनी केले आहे. एडीस एजिप्ती डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गृहभेटीमध्ये प्रत्येक गावात घरांना भेटी देऊन कीटकशास्त्रीय सर्वेक्षण आरोग्य कर्मचारी, आशा सेविका यांच्या माध्यमातून तालुक्यात केले जात आहे. प्रत्येक घरातील वापरण्यासाठी भरण्यात येणारे पाणी साठे तपासले जाणार आहेत. पाणीसाठ्यात डेंग्यू डासाच्या अळ्या आढळून आल्यास ती भांडी रिकामी करावी लागतात. रिकामे करता न येणाऱ्या पाणी साठ्यामध्ये टेमिफॉस किंवा ॲबेटचे द्रावण टाकले जात आहे.

Rain
हेल्दी डाएट : रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीचा आहार

या प्रकारचे आजार उद्भवतात

डेंग्यू ताप, डेंग्यू रक्तस्रावी ताप, डेंग्यू शॉक सिंड्रोम अशा तीन प्रकारे होऊ शकते. डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून, यामुळे मृत्यू ओढवू शकतो. लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप असतो. सोबत डोके-डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, चव आणि भूक न लागणे, मळमळणे, उलट्या, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते.

अशी घ्या काळजी

* आठवड्यातून एक दिवस सर्वांनी कोरडा दिवस पाळावा

* घरासमोर पाणी साचू देऊ नका, घर व परिसर स्वच्छ ठेवा

* पाण्याचे टॅंक तथा बॅरेल स्वच्छ ठेवा, टॅंक उघडे ठेवू नका

* सायंकाळी दरवाजे, खिडक्या बंद करून ठेवाव्यात. खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात

* झाडांच्या कुंड्यांत पाणी साचू देऊ नका. त्या ठिकाणी स्वच्छता ठेवा

* घरातील फ्रिज, कुलरमधील पाणी वारंवार बदलावे

Rain
हेल्थ वेल्थ : पावसाळा आणि रोगप्रतिकारकता

साथीच्या आजाराची लक्षणे

* सर्दी, ताप आणि वारंवार खोकला येतो

* अंगावर लहान-लहान पुरळ येतात

* जेवल्यावर अथवा जेवण केलेले नसतानाही उलट्या अन्‌ मळमळ होते

* रक्तातील प्लेटलेट्‌स कमी होऊन अशक्त‌पणा जाणवतो

''घरासमोर झाडे लावल्यानंतर नागरिकांनी त्या कुंड्यांत पाणी साचू देऊ नये. डासांच्या बहुतेक अळ्या त्याच ठिकाणी आढळतात. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी म्हणून घर व परिसर स्वच्छ ठेवावा. पाणी उघडे ठेवू नये. काही लक्षणे आढळल्यास पाणी उकळून प्यावे.'' - डॉ. महेंद्र ठाकरे, संचालक, ठाकरे हॉस्पिटल

Rain
वजन झटपट कमी करायचं? आहारात खेकड्याचा समावेश करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.