Health-Fitness: पोलिसांनो, ‘डेडिकेशन’सोबत हवे ‘मेडिटेशन’

तणाव दूर करण्यासाठी योग, व्यायामावर द्यावा भर
Police
PoliceSakal
Updated on

नागपूर - शहरातील कायदा-सुव्यवस्था, गुन्ह्यांची उकल, सणासुदीस कडेकोट बंदोबस्त, निवडणुका, मोर्चे-आंदोलनांत व्यग्र असणाऱ्या पोलिस विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजातील वाढत्या बोज्याप्रमाणेच ताणाचाही मुद्दा गंभीर आहे.

अशावेळी केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्य जपण्यासाठी दररोज कामातील डेडीकेशन सोबत अर्धा तास मेडिटेशन आणि योगही तितकाच महत्त्वाचा आहे.

कोणत्याही आस्थापनात साधारणपणे आठ तासांची ड्युटी हे प्रमाण मानले जाते. पूर्वी ओव्हरटाइमचा काळ असताना त्यापेक्षा जास्त ड्युटी केल्यास त्याबदल्यात जादा पैसे मिळायचे. पण, पोलिस हा घटक नियमानुसार १२ तासांची ड्युटी बजावतो आणि त्याबदल्यात कोणतेही जादा मानधन मिळत नाही.

Police
Mumbai News : पालिकेच्या केंब्रिज शाळेच्या शहरी शेतीची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर

कॉर्पोरेट क्षेत्रात दररोज ९ तासांच्या हिशेबाने पाच दिवसांचा आठवडा असतो. पण राज्यात १२ तासांच्या ड्युटीनंतरही पोलिसांना आठवड्यातून एक दिवस साप्ताहिक सुट्टी मिळेल याची शाश्वती नाही. त्यामागे वेळीअवेळी ड्युटी, बंदोबस्त, कायदा-सुव्यवस्थेचा प्रसंग, सणासुदीचे दिवस, ३१ डिसेंबर, व्हीआयपी भेटी,

मोर्चे-आंदोलनांसारख्या घटनांमध्ये रात्रंदिवस ड्युटी बजावण्यात पोलिसांची हयात निघून जाते. त्यामुळे येणारा ताण, चिडचिड आणि त्यातून आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

त्यामुळे कामाचे नियोजन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या कामाच्या वेळेतून नियमित अर्धा तास काढून मेडिटेशन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. शिवाय नियमित व्यायाम आणि योग केल्यास शारीरिक आरोग्यही सदृढ राहण्यास मदत होते.

Police
Mumbai Metro: मुंबई महानगरातील मेट्रोचे पहिले जाळे मुंबईकरांच्या पसंतीस

कुटुंबाने समजून घ्यावे

पोलिसाची नोकरी म्हणजे कुटुंबाला कमी वेळ देणे, मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष, कर्मचारीस्तरावर एकट्यावरच कुटुंब अवलंबून असल्यास आर्थिक कुंचबणा अशा साऱ्या गोष्टी एकामागोमाग असतात.

वेळाकाळाचे बंधन नसणाऱ्या ड्युटीत ताणतणाव येण्यामागे घरांची समस्या, बदल्या, वार्षिक अहवालातील नोंदी, वरिष्ठांची गैरमर्जी, अंतर्गत राजकारण, एकमेकांविरोधातील काटशह अशा असंख्य कारणांची मीमांसा होते. अशा परिस्थितीत कुटुंबानेही पोलिसांना समजून घेण्याची गरज आहे. घरच्यांनी त्याचा तणाव दूर करण्यात मदत केल्यास अनेक समस्या सुटतात.

पोलिसांच्या कामाच्या वेळा फारच अनिश्‍चित असल्याने त्यातून पुरेशी झोप न होणे यामुळे शारीरिक आणि मानसिक आजार वाढतात. त्यासाठी वेळेचे नियोजन करून त्यांनी योग, मेडिटेशन आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.

डॉ. प्रविण नवखरे, मानसोपचार तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.