किरण खेर यांना झालेला दुर्मिळ ब्लड कॅन्सर कोणता? कशामुळे होतो मल्टिपल मायलोमा?

किरण खेर यांना झालेला दुर्मिळ ब्लड कॅन्सर कोणता? कशामुळे होतो मल्टिपल मायलोमा?
Updated on

भारतीय जनता पार्टीच्या चंदीगडच्या खासदार आणि अभिनेत्री किरण खेर यांना काही दिवसांपूर्वीच ब्लड कॅन्सर असल्याचं निदान झालं आहे. सध्या मुंबईत त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांना मल्टिपल मायलोमा प्रकारचा ब्लड कॅन्सर असल्याचं म्हटलं जात आहे. अभिनेता अनुपम खेर यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली होती. परंतु, त्यानंतर सोशल मीडियावर किरण खेर आणि मल्टिपल मायलोमा या कर्करोगाविषयी अनेक चर्चा रंगल्या आहेत.  मल्टिपल मायलोमा हे नाव अनेकांनी पहिल्यांदाच ऐकलं आहे. त्यामुळे कर्करोगाचा हा नवा प्रकार कोणता? किंवा तो नेमका कशामुळे होतो? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर अनेकांनी केवळ याच कर्करोगाविषयी सर्च केल्याचं समोर आलं आहे. म्हणूनच मल्टीपल मायलोमा म्हणजे काय? किंवा हा कर्करोग कशामुळे होतो?, त्याची लक्षणे कोणती? ते जाणून घेऊयात.

नेमकं काय आहे मल्टिपल मायलोमा

Multiple myeloma हा ब्लड कॅन्सरचा एक प्रकार आहे. हा आजार फार दुर्मिळ असून तो फार कमी जणांमध्ये पाहायला मिळतो. या कर्करोगामुळे शरीरातील प्लाज्मा पेशींवर  त्याचा थेट परिणाम होतो. भारतात या कर्करोगाचे फार कमी रुग्ण आढळून येतात. असं म्हटलं जातं की, दरवर्षी जागतिक स्तरावर जवळपास ५० हजार नागरिकांमध्ये या कर्करोगाची लक्षणं आढळून येतात. शरीरातील चांगल्या प्लाज्मा पेशी संक्रमण आणि विषाणू यांच्याशी लढून अॅटीबॉडीज तयार करण्यासाठी मदत करतात. परंतु, मायलोमा कर्करोगामध्ये प्रभावित झालेल्या पेशी चांगल्या पेशींवर आक्रमण करतात.

कशामुळे होतो मल्टीपल मायलोमा?

हा कर्करोग विषारी रसायने, रेडिएशन, व्हायरल किंवा विषाणूचा संसर्ग, विकार, अनुवंशिक यामुळे हा आजार होऊ शकतो.

मल्टीपल मायलोमाचा शरीरावर कसा परिणाम होतो?

मल्टीपल मायलोमाचं सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे शरीरातील एम प्रोटीनचं प्राण वाढणं. यात असामान्य, घातक पेशींमुळे चांगल्या पेशींच्या कार्यात अडथळा निर्माण होतो.  त्यामुळे सतत संसर्ग होणे, रक्ताचे विकार, हाड्यांविषयक समस्या,एनिमिया, प्रचंड रक्तस्राव यासारख्या समस्या जाणवतात.

मल्टीपल मायलोमाची लक्षणे कोणती?
 

१. हाडांमध्ये तीव्र वेदना होणे
२. भ्रम
३. सतत संसर्ग होणे.
४. वजन कमी होणे.
५. जेवतांना त्रास होणे.
६. सतत तहान लागणे, शरीरात पाण्याची कमतरता जाणवणे.
७. थकवा
८. पायातील ताकद कमी होणे.
९. लहान-सहान दुखापती होणे.
१०. पोटाचे विकार

उपचार -
मल्टीपल मायलोमा हा कर्करोग झाला असेल तर त्याचं निदान व्हायला वेळ लागतो. सुरुवातीच्या काही टेस्ट केल्यावर तो लगेच लक्षात येत नाही. परंतु, उशीरा निदान झाल्यामुळेही पुढे गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. यात ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट, बोन मॅरो बायोप्सी, इमेजिंग, स्कॅनिंग, एक्स-रे अशा अनेक चाचण्या कराव्या लागतात. परंतु, मायलोमा याच्यावरील ठोस उपचार अद्यापही उपलब्ध नाहीत. मात्र, यात स्टेम सेल थेरपी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, ट्रायल आणि थेरपी ट्रिटमेंट प्लान्स असे काही बेसिक उपचार केले जातात, असं सांगण्यात येतं.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()